बंद कोकण रेल्वेचा विषय विधान परिषदेत
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, July 27, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - जोरदार पावसामुळे कोकण रेल्वेच्या निवसर स्थानकावर जमीन खचण्याच्या आणि लोहमार्ग वाहून जाण्याचा प्रकार झाल्याने कोकण रेल्वे वाहतूक बंद झाल्याच्या घटनेकडे शिवसेनेचे परशुराम उपरकर यांनी आज विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधले. हा अपघात समजून रेल्वे सुरक्षा आयुक्तामार्फत त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोकण रेल्वेची बंद वाहतूक पुन्हा त्वरित सुरू व्हावी आणि लोहमार्गाची संपूर्ण दुरुस्ती व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाला तातडीने कळविण्याचे निर्देश सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सभागृहातील उपस्थित मंत्री अनिल देशमुख यांना दिले.