शब्दांत मांडा तुमचे मैत्र...

आपल्या मनातील गुपितं ज्याच्यासमोर विश्वासानं सांगता येतात, ज्याला आपण जीवा-भावाचा सखा समजतो, जो आपल्या सुख-दुःखात सहभागी होतो, आपल्या अडीअडचणीला धावून येतो, अशा मित्राचं ऋण फेडण्याचा दिवस...फ्रेंडशिप डे...
एक ऑगस्टला 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने मित्रांबद्दल वाटणारी कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त करण्याची संधी 'सकाळ टाईम्स' आपल्याला देत आहे. एक ऑगस्टच्या अंकात तुमच्या भावनांना प्रसिद्धी देण्यात येईल.
त्यासाठी आपण फक्त एवढंच करायचं की, आपल्या मित्राचे पूर्ण नाव, इंग्रजी भाषेत ५० शब्दांत आपला संदेश आणि आपलं पूर्ण नाव अशा स्वरूपात ३० जूलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आमच्याकडे पाठवा.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आपण पाठविलेल्या संदेशाला विनामूल्य प्रसिद्धी दिली जाईल. तेव्हा आपला संदेश लगेचच लिहा आणि आमच्याकडे पाठवा
messages@sakaaltimes.com या ई मेलवर.