भारत -पाकिस्तान शांती यात्रा सुरू (फोटो फिचर)
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 28, 2010 AT 09:50 PM (IST)
मुंबई - हिंदु, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई... भाई! ... भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध सुधारावेत यासाठी बुधवारी नाना चौकातील मणिभवन येथून पाकिस्तानच्या वाघा सीमेपर्यंत शांतता यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सुरवात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. मुंबईतून सुरू झालेली ही यात्रा गुजरात, राजस्थान, दिल्ली, अमृतसरमार्गे वाघा सीमेपर्यंत जाणार आहे. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ.शांती पटेल, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, कुलगुरू डॉ.राजन वेळूकर यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरवात झाली. (दिनेश भडसाळे - सकाळ छायाचित्र सेवा).  Follow Us on Twitter
फोटो गॅलरी
|
|