Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गर्भवतीसह चौघांचा "स्वाइन फ्लू'ने मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 28, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: swine flu,   h1n1,   pune

पुणे -पुण्यात "स्वाइन फ्लू'मुळे एका गर्भवती महिलेसह चार रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे एक एप्रिलपासून या रोगाने शहरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 68 झाली. स्वाइन फ्लूने आत्तापर्यंत 279 रुग्णांचा मृत्यू झाला.

महादेव जगन्नाथ पवार (वय 50, रा. उत्तमनगर, कोंढवा) वीस जुलैपासून आजारी होते. त्यांना श्‍वसनाचा त्रास होत होता. उपचारादरम्यान रविवारी रात्री ससून रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. राणी चंद्रकांत काकडे (वय 30, रा. जेजुरीगाव) या गर्भवती महिलेवर अठरा जुलैपासून उपचार सुरू होते. त्या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ दत्तात्रेय शिंदे (वय 23, रा. शिंदेवाडी, बेलवंडी बुद्रुक, नगर) नऊ जुलैपासून आजारी होते. ससूनमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कुट्टी गोरगे थॉमस (वय 55, रा. साकरवाडी, कोपरगाव, नगर) दहा जुलैपासून आजारी होते. सतरा जुलै रोजी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

Follow
Us on
Twitter


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: