Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दीपिका जोसेफ, आर्या आंबेकरला हरिभाऊ साने पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 28, 2010 AT 12:00 AM (IST)

पुणे - क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा तिसरा क्रीडामहर्षी हरिभाऊ साने पुरस्कार आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफ व लिटल चॅम्प आर्या आंबेकरला दिला जाणार आहे.  प्रतिष्ठानच्या वतीने कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव केला जातो.

सुवर्णयुग स्पोर्टस क्‍लबची खेळाडू असलेल्या दीपिका जोसेफची नुकत्याच इटलीमध्ये झालेल्या पहिल्या जागतिक कबड्डी स्पर्धेसाठी तसेच मदुराई येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. ती चार वर्षे राष्ट्रीय स्तरावर खेळत आहे.

याआधी 2008 मध्ये डॉ. मधुसूदन झंवर व पार्श्‍वगायक रवींद्र साठ्ये यांना, तर 2009 मध्ये विठ्ठल काटे व शिल्पकार डी. एस. खटावकर यांना पुरस्कार दिला होता.

पुरस्कार वितरण हरिभाऊ साने यांच्या स्मृतिदिनी तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी मंदिर येथे महिला हॉकी संघटक अर्नवाझ दमानिया यांच्या हस्ते होणार आहे. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. नयना निमकर अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव सुनील नेवरेकर यांनी दिली.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: