Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कृत्रिम पावसासाठी वापरणार चिनी पद्धत
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Thursday, July 29, 2010 AT 12:54 AM (IST)

बंगळूर -  मॉन्सूनच्या लहरीपणावर मात करण्यासाठी कर्नाटक सरकारने ढगांमध्ये बीजारोपाणासाठी चिनी पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ टाळला जावा आणि शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडावा, यासाठी रॉकेटद्वारे ढगांमध्ये बीजारोपण करणारी यंत्रणा लवकरच सुरू केली जाणार आहे.
येत्या रब्बी हंगामात कर्नाटकमधील लिंगनमक्की व थिप्पागोंडनहळ्ळी जलाशयांसह नारायणपुरा धरण प्रदेशात या यंत्रणेच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने 35 कोटी रुपये खर्च करून सात "रॉकेट लॉंचर' खरेदी केले आहेत. राज्यात ही यंत्रणा योग्य ठिकाणी उभारली जात असल्याची माहिती महसूलमंत्री करुणकरा रेड्डी यांनी दिली. ते म्हणाले, ""यापूर्वी कर्नाटकमध्ये छोट्या विमानाच्या साह्याने ढगांमध्ये बीजारोपण केले जात असे. मात्र, ही पद्धती अपेक्षित पाऊस पाडण्यात अयशस्वी ठरल्याचा अनुभव आहे. या नव्या पद्धतीमुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील. त्यातून शेतीचे उत्पादन वाढेल, असा विश्‍वास आहे.''

यंदा कर्नाटकमध्ये सरासरी 12 टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील 29 तालुके व 49 विभागांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, तेथे दुष्काळसदृश स्थिती आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्येच समाधानकारक पाऊस आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले.

असे होते बीजारोपण...

उपयुक्त पाणी असलेल्या ढगांमध्ये रॉकेटद्वारे "पोटॅशियम नायट्रेट'युक्त (ऑक्‍सिडायझर) घनरूपातील "प्रोपेलंट' व इंधन सोडले जाते. हे रॉकेट म्हणजे एक "कंबशन चेंबर' असतो. या "प्रोपेलंट'ची घनता अधिक असते व त्याचे ज्वलनही त्वरित होते. ढगात हा "प्रोपेलंट' सोडला गेला, की लगेचच पाऊस पडण्याची शक्‍यता वाढते. मॉन्सूनवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनमध्ये या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 2008मध्ये ऑलिंपिक स्पर्धेवेळी चीनने या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर केला होता.
 
Follow
Us on
Twitter

 
प्रतिक्रिया
On 7/29/2010 10:02 AM Vikramaditya said:
आता पाऊस पण मेड इन चीन .........


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: