भुवनेश्वर - केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाच्या आक्षेपानंतरही ओरिसातील बहुचर्चित पोलाद महाप्रकल्पासाठी राज्य सरकारने पॅराद्विप परिसरात जमीन संपादनास सुरवात केली आहे. सरकारची ही कृती बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत "पॉस्को प्रतिरोधसंग्राम समिती'ने आपले आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
गडा कुंजजंगा पंचायत भागात जमीन संपादनास सुरवात केल्याची माहिती जगतसिंगपूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सरोज के. चौधरी यांनी दिली आहे. भुयानपल जिल्ह्यातील गावकऱ्यांना प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले असून, ही प्रक्रिया शांततेत पार पडल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वने, तसेच आदिवासी कायद्यांचे उल्लंघन करून राज्य सरकार जमीन संपादनाची प्रक्रिया राबवू शकत नाही, असे मत केंद्राच्या वने व पर्यावरण समितीतील सदस्यांनी व्यक्त केले आहे. तर, राज्य सरकारने "पॉस्को'साठी जबरदस्तीने जमिनी संपादित करू नये, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे.
Follow
Us on
Twitter