Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कोकण रेल्वे ठप्पच ; 9 गाड्या रद्द
सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 29, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - निवसर येथील खचलेल्या रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीत व रेल्वे मार्गावर पडलेल्या दरडी बाजूला करण्याच्या कामात जोरदार पावसामुळे अडथळे येत असल्यामुळे रत्नागिरी - मडगाव मार्गावरील वाहतूक उद्या (ता.29) ठप्पच राहणार असून तीन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत, तर 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. निवसर येथील खचलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी कोकण रेल्वेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र कोकणात होत असलेल्या जोरदार पावसामुळे या कामात सातत्याने अडथळे येत आहेत; तसेच रेल्वे मार्गावर अन्यत्र कोसळलेल्या दरडी उपसण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रत्नागिरी - मडगाव वाहतुकीसाठी उद्याही खुला होणार नाही. त्यामुळे रेल्वेने दिवा - सावंतवाडी पॅसेंजर रत्नागिरीपर्यंत चालविण्यात येणार आहे. सीएसटी - मडगाव मांडवी एक्‍स्प्रेस, मडगाव - सीएसटी मांडवी अप, कोकणकन्या एक्‍स्प्रेस, सीएसटी - मडगाव जनशताब्दी, मडगाव - सीएसटी जनशताब्दी, मत्सगंधा एक्‍स्प्रेस अप, मत्सगंधा एक्‍स्प्रेस डाऊन, मडगाव - सावंतवाडी पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोचूवेल - अमृतसर, चंडीगड - कोचूवेल, हजरत निजामूद्दीन - त्रिवेंद्रम राजधानी एक्‍स्प्रेस या गाड्या पनवेल कर्जत, पुणे मार्गे मडगाव वळविण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

कोकण रेल्वेमार्गावरील दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन मार्ग केव्हा खुला होणार, याबाबत कोकण रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आपत्कालीन स्थितीत प्रवाशांनी 022-10722 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
Follow
Us on
Twitter
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: