Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मॉर्गनचे दणकेबाज नाबाद शतक
वृत्तसंस्था
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: cricket,  england,  pakistan,   ion morgan,   sports

कॉलिंगवूडच्या साथीत 213 धावांची भागीदारी; इंग्लंड 4 बाद 331

ट्रेंट ब्रिज (इंग्लंड)  -  वेगवान गोलंदाज महंमद आमीरने दिलेल्या सुरवातीच्या दणक्‍यांनंतरही मधल्या फळीत इयॉन मॉर्गन आणि पॉल कॉलिंगवूड यांनी केलेल्या जबरदस्त नाबाद 213 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेरीस 4 बाद 331 धावांची मजल मारता आली.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फॉर्मात असणाऱ्या महंमद आमीरच्या गोलंदाजीसमोर त्यांचा निर्णय चुकल्यासारखा वाटला. ऍण्ड्य्रू स्ट्रॉस, ऍलिस्टर कूक, जोनाथन ट्रॉट असे त्यांचे तीन प्रमुख फलंदाज त्याने गारद केले. महंमद असिफने केविन पीटरसनला स्थिरावूदेखील दिले नाही. त्यामुळे इंग्लंडचा डाव 4 बाद 118 असा अडचणीत आला होता.

त्या वेळी एकत्र आलेल्या पॉल कॉलिंगवूड आणि एकदिवसीय सामन्यातील तज्ज्ञ असा शिक्का बसलेला इयॉन मॉर्गन यांनी एकत्र येऊन इंग्लंडच्या डावाला आकार दिला. या जोडीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना साफ निष्प्रभ केले. खेळ थांबला तेव्हा मॉर्गन 18 चौकार आणि एका षटकारासह 125, तर कॉलिंगवूड 11 चौकारांसह 81 धावांवर खेळत होता. ही जोडी फोडण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार सलमान बट्ट याने आठ गोलंदाजांचा वापर केला.

पाकिस्तानला सुरवातीच्या यशाचा फायदा उठविण्यात अपयश आले. पहिल्या सत्रानंतर त्यांच्या गोलंदाजांना दिशा आणि टप्पा राखण्यात अपयश आले. यष्टीमागे कामरान अकमल पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने सुरवातीलाच स्ट्रॉसचा झेल सोडला. अर्थात, तो फारसा महाग पडला नाही. पंचांच्या निर्णयाला दाद मागण्याचा अवलंब या सामन्यात करण्यात आला. पहिल्या दोन सत्रांत तब्बल चार वेळा पंचांच्या निर्णयाला आव्हान मिळाले. पाकिस्तानच्या दोन, तर इंग्लंडचा एक निर्णय तिसऱ्या पंचांनीही फेटाळून लावला. ट्रॉटने पायचित बाद दिल्यावर निर्णयाला आव्हान दिले. मात्र, तिसऱ्या पंचांनी तो बाद असल्याचा निर्णय दिला.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) 4 बाद 331 (इयॉन मॉर्गन खेळत आहे 125, पॉल कॉलिंगवूड 81, महंमद असिफ 3-39) 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: