Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सचिनचे पाचवे द्विशतक, पदार्पणातच रैना चमकला
पीटीआय
Friday, July 30, 2010 AT 12:15 AM (IST)

भारत 9 बाद 669, दुसरी कसोटी अनिर्णित अवस्थेकडे

कोलंबो  -  सचिन तेंडुलकरचे द्विशतक आणि सुरेश रैनाने पदार्पणाच्या कसोटीत झळकविलेल्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाला दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेची पहिल्या डावातील धावसंख्या मागे टाकता आली. अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या या कसोटीत गुरुवारी चौथ्या दिवशी भारताने 9 बाद 669 असा धावांचा डोंगर उभारून पहिल्या डावात 27 धावांची आघाडी मिळविली.

आजच्या दिवसाचे हीरो होते, ते मास्टर ब्लास्टर तेंडुलकर आणि नवोदित रैना. या दोघांनी महत्त्वाच्या क्षणी मोठी भागीदारी करून टीम इंडियाला फॉलोऑनच्या नामुष्कीपासून सहजपणे वाचविले. त्यांच्या खेळामुळे श्रीलंकेची 4 बाद 642 घोषित, ही धावसंख्याही भारताला मागे टाकता आली.

सचिनने कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकविताना 37व्या वर्षीही दीर्घवेळ खेळण्याची आपली क्षमता आणि दर्जा किती जबरदस्त आहे, हे दाखवून दिले, रैनाने युवराजसिंगच्या जागी मिळालेल्या संधीचे सोने केले. या कसोटीचा आता एकच दिवस बाकी आहे आणि सिंहलीज स्पोर्टस मैदानाची खेळपट्टी अजूनही फलंदाजीसाठीच अनुकूल आहे. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहणार, हे निश्‍चित आहे.

सचिनने आज एकाग्रता ही काय चीज असते, हे दाखवून दिले. त्याने रैनाबरोबर पाचव्या विकेटसाठी 256 धावांची विक्रमी भागीदारी करून भारताला सुस्थितीत नेले. कालच्या 4 बाद 382 धावांवरून या जोडीने आज खेळावयास सुरवात केली, तेव्हा भारताला फॉलोऑन वाचविण्यासाठी आणखी 61 धावांची आवश्‍यकता होती. सचिन आणि रैनाने ही कामगिरी अगदी सहजपणे पार करीत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले. पदार्पणाच्या कसोटीत शतक नोंदविणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसताना रैनाने श्रीलंकेच्या वेगवान आणि फिरकी माऱ्याचा समर्थपणे सामना केला. सचिन आणि रैनाची भागीदारी अजंता मेंडीसने संपवली, तेव्हा श्रीलंकेने सुटकेचा निःश्‍वास टाकला. मेंडीसला कव्हरच्या दिशेने चौकार मारल्यानंतर रैना बाद झाला. तो शॉर्ट मिडविकेटला संगकाराकडे सोपा झेल देऊन परतला. त्याने 120 धावांच्या खेळीत बारा वेळा चेंडू सीमापार केला, तर दोन षटकार ठोकले.

रैनाच्या जागी आलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीला स्थिरावण्यास फार वेळ लागला नाही. त्याने सूरज रणदिवला दोन लागोपाठ चौकार ठोकले. त्यानंतर त्याने मेंडीस आणि धम्मीका प्रसाद यांचाही समाचार घेतला. दुसऱ्या बाजूने सचिनचाही तडाखा सुरू होता. त्याने दिल्हारा फर्नांडोचा ताशी 147 किलोमीटर वेगाने आलेला चेंडू लीलया फटकावून आपला दर्जा दाखवून दिला. चहापानानंतर लगेचच तो बाद झाला. 347 चेंडूंत 23 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 203 धावा करणारा हा चॅंपियन फलंदाज दिल्शानच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेलबाद झाला. दिल्शानने त्यापाठोपाठ हरभजनला परतविले. त्यानंतर धोनीने अभिमन्यू मिथुनच्या साथीत श्रीलंकेची धावसंख्या मागे टाकली.

धावफलक
श्रीलंका - पहिला डाव - 4 बाद 642, घोषित
भारत - पहिला डाव
मुरली विजय पायचीत गो. मेंडीस 58
वीरेंद्र सेहवाग यष्टीचीत प्रसन्ना जयवर्धने गो. रणदिव 99
राहुल द्रविड पायचीत गो. रणदिव 3
सचिन तेंडुलकर झे. प्रसन्ना जयवर्धने गो. दिल्शान 203  (516 मिनिटे, 323 चेंडू, 23 चौकार, एक षटकार)
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण पायचीत गो. मेंडीस 29
सुरेश रैना झे. संगकारा गो. मेंडीस 120 (294 मिनिटे, 228 चेंडू, 12 चौकार, दोन षटकार)
महेंद्रसिंह धोनी झे. व गो. दिल्शान 76  (164 मिनिटे, 138 चेंडू, सात चौकार)
हरभजनसिंग झे. संगकारा गो. दिल्शान 0
अभिमन्यू मिथुन त्रि. गो. मेंडीस 41 (109 मिनिटे, 97 चेंडू, सात चौकार)
इशांत शर्मा खेळत आहे 10
प्रग्यान ओझा खेळत आहे 0
अवांतर 30
एकूण 198 षटकांत 9 बाद 669
बाद क्रम - 1-165, 2-169, 3-173, 4-241, 5-497, 6-592, 7-592, 8-643, 9-668

गोलंदाजी
धम्मीका प्रसाद 19-1-96-0
दिल्हारा फर्नांडो 31-1-116-0
एंजलो मॅथ्यूज 9-1-24-0
रणदिव 64-14-212-2
अजंता मेंडीस 54-7-157-4
दिल्शान 21-4-50-3
प्रतिक्रिया
On 7/30/2010 10:10 PM Mahendra said:
Sachin tula salam
On 7/30/2010 8:54 PM bhagavan nasik said:
sachin sarkha kheladu parat milnar nahi
On 7/30/2010 6:01 PM suryakant Kale said:
सचिन खरच महान क्रिकेटपटू आहे...
On 7/30/2010 4:33 PM TUSHAR BONDALE said:
Sachin la "Bharat Ratna" khitabachi kahi garaj nahi.........to aahech muli Bharatache "Anmol Ratna"
On 7/30/2010 4:02 PM Aniket Kamthe said:
सचिन you are simply great.........................................
On 7/30/2010 2:02 PM pallavi kothawade said:
सचिन हि भारताची ओळख आहे. तुला सर्व भारतीयांकडून मानाचा मुजरा .
On 7/30/2010 12:24 PM Shrikrishna said:
SACHIN IS GREAT एव्हडेच मी म्हणू शकेन, त्याला जेव्हा मनात येईल तेव्हा तो खेळू शकतो हा त्याचा आत्मविश्वास आहे. आभार,श्रीक्रीष्णा
On 7/30/2010 12:03 PM Kunal said:
even Google Accepted Sachin as a God of Cricket then who others are... unbelievable naa...search on google as GOD OF Cricket... कुणाल लोळगे
On 7/30/2010 11:43 AM sandeep said:
मिलिंद...., सचिन हा तुझा बाप माणूस असेल तुच मुजरा कर ...... वाचतोस काय मुजरा कर ...... मनसे
On 7/30/2010 11:18 AM harshal sorte said:
डॉ.सचिन तेंडूलकर साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात .........
On 7/30/2010 11:17 AM Balla Chavya said:
Sachin is Sachin, Asa Punha hone shakya nahi. Sachin tujhe Sallam.
On 7/30/2010 11:10 AM harshal sorte said:
सचिन खरच महान क्रिकेटपटू आहे...
On 7/30/2010 10:56 AM Machindra said:
सचिन खुप छान
On 7/30/2010 10:56 AM Machindra said:
सचिन खुप छान
On 7/30/2010 10:50 AM rahul c said:
शब्द नाहीत तुझ्यासाठी .......
On 7/30/2010 9:51 AM JOSHI SHRIPAD VASANTRAO said:
SACHIN YOU ARE NOT ONLY INDIAN IDOL, BUT YOU ARE A WORLD IDOL SHRIPAD JOSHI & AJAY AWALGAONKAR
On 7/30/2010 9:27 AM vinay said:
क्रिकेट देव आहे सचिन
On 7/30/2010 9:24 AM Mic 123 said:
सचिन एके सचिन, सचिन दुने सचिन
On 7/30/2010 9:09 AM Milind said:
बगतोस काय प्रतिक्रिये कडे सचिन बाप माणूस आहे ...मुजरा कर लवकर...
On 7/30/2010 7:37 AM Dara Buland said:
वा !!!! सचिन तू एकच ........
On 7/30/2010 5:24 AM Rohit said:
सचिनला क्रिकेट मधला देव उगाच का म्हणतात? फार सुंदर खेळी!!!
On 7/30/2010 3:58 AM vikas said:
सचिन तुला मनाचा मुजरा!! गर्व आहे आम्हाला तुझा.
On 7/30/2010 2:10 AM MP said:
Sachin and Raina,Sehwag,Dhoni-Congratulations.....Great Job...Sachin Congratulations in advance for the 50th Century!
On 7/30/2010 1:42 AM ~HeMant~ said:
डॉ.सचिन तेंडूलकर साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात .........
On 7/30/2010 1:14 AM sangram said:
सचिन इस d best


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: