Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मुरली आणि कुंबळेची ऍकॅडमीसाठी "युती'
वृत्तसंस्था
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि भारताचा अनिल कुंबळे हे कसोटी क्रिकेटमधील विक्रमी फिरकी गोलंदाज नवोदितांसाठी ऍकॅडमी काढण्याच्या विचारात आहेत. मुरलीधरन गेल्याच आठवड्यात निवृत्त झाला. दोन वर्षांपूर्वीच त्याने कुंबळेशी या संदर्भात चर्चा केली होती. मुरलीने एका दैनिकाला सांगितले, ""आमची संकल्पना आता मूर्त स्वरूपात येण्याची शक्‍यता आहे. मला प्रशिक्षणात कारकीर्द करायची नाही, पण कुंबळे ऍकॅडमी काढणार असेल तर मी आनंदाने त्यात सहभागी होईन. सध्या चर्चा सुरू आहे, पण निर्णय कुंबळेचा असेल. बंगळूरमध्ये ऍकॅडमी काढण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.''
या संदर्भात कुंबळेने सांगितले, ""मी मुरलीधरनच्या संपर्कात असतो. तो कसोटीतून निवृत्त झाल्यापासून मात्र मी त्याच्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही. सध्या तो सत्कार समारंभांमध्ये व्यस्त असेल आणि ते स्वाभाविकच आहे. यातून तो मोकळा झाल्यावर मी बोलेन. माझ्याकडे वेळ आहे. त्यामुळे आम्ही एकत्र बसून सविस्तर योजना तयार करू.''


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: