Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कोकण रेल्वेच्या सेवेचे प्रवाशांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: rain,  flood,  konkan railway,  passanger,   ratnagiri,   konkan

रत्नागिरी  -  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या काळात कोकण रेल्वेचे नुकसान होऊनही गोवा राज्यातून काही गाड्या रत्नागिरी-आडवली स्टेशनपर्यत आणून प्रवाशांना सुखरूप रत्नागिरी रेल्वेस्टेशनपर्यत आणण्यात येत असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहेत.

परराज्यातून अजूनही अनेक प्रवासी प्रवास करत असताना निवसर स्टेशन जवळ झालेले नुकसान आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सक्षम असताना लोकांच्या हितासाठी रत्नागिरी आडिवली येथे काही गाड्या आणण्यात येत आहे. गोवा राज्यातून येणाऱ्या महिलांशी बातचीत करताना कोकण रेल्वे प्रशासनाने या काळात दिलेली वागणूक चांगली होती. आडवली येथे आल्यानंतर कोकण रेल्वेने एसटीच्या 20 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. प्रत्येक डब्यातून प्रवाशांना उतरवून त्यांना एसटीत बसविण्यात येत होते. कोकण रेल्वेतून मिळालेली वागणूक चांगली असल्याचे महिला प्रवासी मृण्मयी पांचाळ यांनी सांगितले. गोवा राज्यातून काल (ता. 28) दुपारी 1 वाजता नेत्रावती एक्‍स्प्रेस आडवलीपर्यत सोडण्यात आली. सायंकाळी 8 वाजता सर्व प्रवासी सुखरूप पोहचले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: