नवी दिल्ली - भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिची शुक्रवारी क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा'साठी निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरात बॅडमिंटनच्या क्षेत्रात साईनाने केलेल्या कामगिरीचा विचार करून तिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीतील सदस्यांनी पी. टी. उषा यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी साईनाची भेट घेतली आणि तिचे अभिनंदन केले. "पुरस्कारामुळे मला खूप आनंद झाला. खरंतर माझा यावर विश्वासच बसत नाही. माझे स्वप्नच साकार झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कारामुळे मोठी प्रेरणा मिळते. या पुरस्कारामुळे मला देशासाठी आणखी उत्तुंग कामगिरी करण्याची स्फूर्ती मिळाली आहे.'', अशी प्रतिक्रिया साईनाने पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.
Follow
Us on
Twitter