Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

माझ्या वयाबाबत आता कोणी बोलू नये
वृत्तसंस्था
Saturday, July 31, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: cricket,  sachin tendulkar,  age,   sports

कोलंबो - वयाच्या 37 व्या वर्षी पाचवे कसोटी द्विशतक झळकावण्याची क्षमता सिद्ध करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आता कोणीही आपल्या वयाबाबत बोलू नये, असे सांगताना वय आणि कामगिरी यांचा संबंध नसतो हे आपण दाखवून दिले आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

"जोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम राहून कोणतेही आव्हान स्वीकारण्याची क्षमता बाळगून असता, तोपर्यंत वयाचा काहीही संबंध येत नसतो. त्यामुळे आता प्रत्येकाने वाढत्या वयाबाबत बोलणे टाळावे. जर मी 37 व्या वर्षीही एकदिवसीय सामन्यात द्विशतक करू शकतो, तर वाढत्या वयाचा मुद्दाच उपस्थित होऊ शकत नाही,'' असे सचिनने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीनंतर झालेल्या पारितोषिक वितरणाच्या वेळी सांगितले.

श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत आलेला असताना सचिनने झळकवलेले द्विशतक आणि त्याने शतकवीर सुरेश रैनासह केलेली द्विशतकी भागीदारी भारताला सामना अनिर्णित ठेवण्यास बहुमोल ठरली.

 
प्रतिक्रिया
On 8/1/2010 5:18 PM Sanjeevkumar said:
उत्तम..............
On 7/31/2010 3:10 PM Santosh said:
@dgp तुम्हाला क्रिकेट बद्दल काहीही माहिती नाही. म्हणजे तुह्मी सून्य आहात.सचिनच्या बोलण्याचा अर्थ हा होतो कि जो पर्यंत तो धावा चागल्या काढू शकतो मैदानांत इतर खेळाडू प्रमाणे चांगले क्षेत्ररक्षण करू शकतो तो पर्यंत त्याचा वयाचा उलेख करू नये. आपल्याला धावा आणि मैदानांवर चपळ पण पाहिजे. मग वय कांही असो. तो आज २० वर्ष खेळत आहे ते लोकांच्या(00.00001 ) मनांत सलत आहे. तुमच्या सारखा संजय मांजरेकर असाच तुमच्या सारखा मूर्खा सारखा सचिन बद्दल बोलत असतो.माफ करा dgp कृपया शेंबड्या पोरा सारख कांही बकू नका.
On 31/07/2010 13:59 Kiran said:
Sachin is great
On 7/31/2010 11:59 AM aniket said:
तू खरच खूप महान आहेस. तुझे वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे पडतील. तुला कोटी कोटी प्रणाम...................
On 7/31/2010 11:39 AM Arvind said:
Yes Sachin U have said it and all cricket lovers agree with U that Age is not factor for retirement if one scores run or takes Wickets.Sachin is far far better fielder than present young cicketers.Whenever he is on fhe field then he is guru to all specially while he is batting at other end.I am sure Sachin is going play with his present form for minimum 3 years. He is going to retire before some one asks him why not to retire Sachin.
On 7/31/2010 11:37 AM dgp said:
वयाचा आणि कामगिरीचा संबंध नक्कीच आहे? ६० वयाचे माणसाला पळताच येणार नाही? हे शेंबडे पोर सांगू शेकलं. पण सचिन ग्रेट आहे.
On 31/07/2010 11:34 AM प्रिया said:
सचिन तेंडूलकर बद्दल काही बोलताना आधी आपण काय आहोत हे पाहावे..तो श्रेष्ठ आणि महान खेळाडू आहे..तो भारताच्या टीम मध्ये आहे आणि त्याचे नावच खूप आहे दुसर्या टीम ला हरविण्यासाठी..
On 7/31/2010 10:32 AM Vishwanath Jambhulkar said:
जय हो सचिन !! जय हो !! जय महाराष्ट्र
On 7/31/2010 9:32 AM MILIND said:
सचिन तू बिनधास्त खेळ रे. पाहू कोण्याला बापाची मजल आहे बोलयची तुला.जय महाराष्ट्र.
On 7/31/2010 8:54 AM PRASAD NIMHAN said:
सचिन तू क्रिकेट चा श्वास आहेस तुझ्यामुळे क्रिकेटला संजीवनी मिळाली आहे आणि जेथे जेथे क्रिकेट आहे तेथे तेथे सचिनच सर्वांचा आदर्श आहे .
On 7/31/2010 7:37 AM dheeraj said:
तू साठाव्या वर्षी निवृत्त होई पर्यंत तुझा खेळ पाहत राहीन, तू चिंता नको करू.
On 7/31/2010 7:29 AM dheeraj said:
सच्या तूच आहे.
On 7/31/2010 1:38 AM Vinay said:
सचिन तुला लाख लाख सलाम ! तू हे दाखवून दिलेस कि आपण ठरवले तर कायम तरुण असतो. आणि अफाट गुणवत्ता आणि इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नसते. खरच तू सर्व चांगल्या लोकांसाठी प्रेरणादायी आहेस. असाच खेळत राहा!
On 7/31/2010 1:20 AM akira said:
तू खेळ र्रे.. कंबर वाकेपर्यंत खेळ. बघू कोण अडवते तुला...
On 7/31/2010 1:13 AM Sandip Kamble said:
जे लोक असफल असतात तेच लोक वयाचा विचार करतात.
On 7/31/2010 12:54 AM sasonkar yardena israel said:
उत्तम लेख आहे
On 7/31/2010 12:19 AM vikas said:
खर आहे वयाचा आणि कामगिरीचा काहीही संबंध नाही . उत्कृष्ट उदाहरण म्हणजे N D TIWARI


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: