Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

काश्मीर खोऱ्यात पुन्हा कर्फ्यू
वृत्तसंस्था
Saturday, July 31, 2010 AT 11:52 AM (IST)

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा हिंसाचार भडकल्याने काही गावांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलक आणि पोलिस यांच्यात हिंसाचार सुरु असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे.

 

खोऱ्यात अद्यापही काही ठिकाणी हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्याचे वृत्त आहे. काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेत ७० जण जखमी झाले आहेत. तर बारामुल्ला जिल्ह्यात मोहम्मद रफीक आणि मोहम्मद सिद्दीकी या दोघांचा मृत्यू झाल्याचे, पोलिसांनी सांगितले. पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांकडून संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पहारा देण्यात येत असून, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा काश्मीर खोऱ्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे.

 

Follow
Us on
Twitter
   



आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: