Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

घर पेटविणाऱ्यास तीन वर्षांची सक्तमजुरी
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Saturday, July 31, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: rigourious imprisonment,  fire,  home,  orissa,   national,  snn

भुवनेश्‍वर -  ओरिसात दोन वर्षांपूर्वी झालेल्या कंधमाल जातीय दंगलीत एका महिलेचे घर पेटवून देणाऱ्या आरोपीस तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. द्रुतगती न्यायालयाने या प्रकरणी आज निकाल दिला.

कंधमाल जिल्ह्यात ऑगस्ट 2008 मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी दक्रिगीर गावात काही तरुणांनी एका महिलेचे घर पेटवून दिले होते. या प्रकरणी एका तरुणाला तीन वर्षे सक्तमुजरी आणि दोन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. अन्य दहा आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडून देण्यात आले. दरम्यान, दंगलीत सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी काल गताभहाली गावातील आणखी नऊ जणांना अटक केली. त्या सगळ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Follow
Us on
Twitter
  
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: