नागपूर - संगिता देवताळे (वय ३०) या महिला पोलिस कॉन्स्टेबलने शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शहरातील नंदनवन भागात राहणाऱ्या या पोलिस कॉन्स्टेबलच्या राहत्या घरी आज (शनिवारी) सकाळी ही घटना उघडकीस आली. ती अंजनी पोलिस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती.