पुणे - बावधन परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दर्शना देविदास टोंगरे (वय २१) या युवतीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. या युवतीच्या खूनप्रकरणी तिच्या भावाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांत हिंजवडी परिसरात महिलांच्या खूनाच्या घटना घडल्या आहेत. यात या घटनेमुळे आणखी भर पडली आहे. या परिसरात खून होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांचे खास पथक स्थापन करून या भागात गस्त घालण्यात येते. मात्र, या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Follow
Us on
Twitter