हैदराबाद - आंध्र प्रदेशातील तेलंगणात विधानसभेच्या बारा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) उमेदवारांनी बारा जागांपैकी अकरा जागा जिंकून वर्चस्व मिळविले. उरलेली एकमेव जागा भारतीय जनता पक्षाने (भाजप) मिळविली. या पोटनिवडणुकीत "टीआरएस'ने वर्चस्व मिळविल्याने वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीला आणखी जोर मिळणार आहे. शुक्रवारी रात्री लागलेल्या या निकालांपैकी उरलेल्या काही निकालांची आज (शनिवारी) पहाटे घोषणा करण्यात आली.
हुजुराबाद येथील 'टीआरएस'चे उमेदवार ई. राजेंद्र यांनी तेलगू देसम पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ५५, ३६० मतांनी पराभव केला. कोरतला मतदारसंघात के. विद्यासागर यांनी काँग्रेसचे उमेदवार जे. रत्नाकर राव यांच्यावर ४५,८९५ मतांनी विजय मिळविला. 'टीआरएस'चे अध्यक्ष चंद्रशेखऱ राव यांचे पुत्र के टी रामाराव यांनी सिरकिल्ला येथून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.
सिद्धपेट, रिसपूर, चेन्नूर, मंचेरियाल, धर्मपुरी, वेमुलवाडा हे मतदारसंघ "टीडीएस'ने आपल्याकडेच राखले, तर निजामाबाद ग्रामीणमध्ये भाजपने विजय मिळविला.
Follow
Us on
Twitter