Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

चव्हाण-रोसय्या यांची सोमवारी दिल्लीत बैठक
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Saturday, July 31, 2010 AT 12:15 AM (IST)

हैदराबाद  -   महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बैठक 2 ऑगस्टला नवी दिल्लीत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात आंध्राचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेतली होती.

आंध्राच्या सीमेजवळ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी धर्माबाद येथे केलेल्या आंदोलनामुळे दोन्ही राज्यांमध्ये परस्परविरोधी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रश्‍नी पंतप्रधानांनी लक्ष घातले असून, त्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्लीतील रेस कोर्सवरील आपल्या शासकीय निवासस्थानी सोमवारी बोलावले आहे. दरम्यान, आंध्रचे मुख्यमंत्र्यांनी रविवारी (ता. 1) येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Follow
Us on
Twitter


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: