Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

ओरिसात "पॉस्को'साठी भूसंपादनाला सुरवात
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Saturday, July 31, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: land aquisition,  posco,  orissa‎,   national,  snn

भुवनेश्‍वर  -  ओरिसा राज्य सरकारतर्फे बहुचर्चित पॉस्को पोलाद प्रकल्पासाठीच्या जमीनसंपादनाला पॅरादीप या सागरी भागात आज प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा अजूनही मोठ्या प्रमाणात विरोध आहे.

जमीनसंपादन अधिकारी नृसिंह स्वाई यांनी सांगितले, की पॉस्को प्रकल्पासाठी आम्ही आज विड्याच्या पानांची शेती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या भागात आठ शेतकऱ्यांची प्रकल्पासाठी जमीन संपादित करावी लागणार आहे. या शेतकऱ्यांना "पॉस्को'कडून प्रतिएकर 11 लाख रुपये देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. आज त्यापैकी प्रतिएकराला सहा लाख 70 हजार रुपये देण्यात आले.

Follow
Us on
Twitter
  
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: