नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे त्रासलेल्या दिल्लीकरांना आज (शनिवार) सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला. या पावसामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून, अनेक भागांत पाणी साचले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सर्वत्र पाऊस झाला असून, अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून ३२ डिग्री तापमान असलेल्या दिल्लीमध्ये आज २७ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. दक्षिण दिल्लीतील शेख सराई, चिराग दिल्ली या भागात वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी दिल्लीत १३.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. आतापर्यंत दिल्लीत २४२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.