Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

महाराष्ट्राच्या शेजारी 'पाकिस्तान' आहे...?
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 31, 2010 AT 02:03 PM (IST)
बेळगावप्रश्‍नी सारा महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी उभा आहे, याबद्दल दुमत नाही. सीमाभागातील दंडेलशाही कर्नाटक सरकारने थांबवली पाहिजे आणि भाषिक आधारावर बेळगाव, कारवार, बिदर आणि गुलबर्गा जिल्ह्यातील ८१४ गावांना महाराष्ट्रात समाविष्ट केले पाहिजे, ही महाराष्ट्राची आग्रही भूमिका राहिली आहे.

अर्थातच, हा देश भारत आहे आणि लोकशाही इथे सदृढ आहे, या दोन्ही गृहितकांवर आधारित या मागण्या आहेत. त्यासाठी सनदशीर, आंदोलनात्मक लढा सुरू आहेच.

शनिवारी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही गृहितकांना छेद देणारे वक्तव्य करीत 'पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्‍मीरला आपण पाकव्याप्त काश्‍मीर म्हणतो, तसेच बेळगावलाही कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हटले पाहिजे', अशी मागणी केली आहे.

कर्नाटकची तुलना थेट पाकिस्तानशी...?
बेळगावची तुलना थेट काश्‍मीरशी...?

टाळ्या मिळविण्याच्या छंदापोटी केलेल्या अशा विधानांमुळे प्रादेशिकता वादाला भीषण रुप मिळणार नाही का...?

एक जबाबदार 'महाराष्ट्र' म्हणून तुम्हाला काय वाटते...? जरूर नोंदवा.

प्रतिक्रिया
On 8/28/2010 12:01 PM neha gaikwad said:
चला उद्धव राज कडून काहीतरी शिकला !
On 8/6/2010 9:01 PM rohaan said:
शिवसेनेमुळे मराठी माणूस बेळगावमध्ये स्वाभिमानाने जगतोय. बरोबर आहे साहेबांचे बोलणे from SMT
On 06-08-2010 06:00:36 sandeep said:
दोन महान राष्ट्रे घुसमटतायत... एक पाकव्याप्त काश्मीरमुळे....आणि दुसरे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र... कधी थांबणार हि घुसमट..
On 8/4/2010 6:16 PM satish-nagpur(9822369198) said:
काय चुकीचे बोलले उद्धव? प्रतिक्रिया लिहिण्याआधी बेळगावच्या एखाद्या मराठी माणसाला विचार कि त्याची काय स्थिती आहे ते? अहो शिवसेना निदान रस्त्यावर उतरायला तयार आहे! बाकी कोण आहे सीमावासीयांच्या सोबत? महाराष्ट्र एकीकरण समिती स्वतः मान्य करते कि शिवसेनेने खूप सपोर्ट केला आहे म्हणून! उद्धव ठाकरे हे माणुसकी जपणारे नेते आहेत! 'राज' कारण करणारे नाहीत! शिवसेना लढणार! तुम्ही आलात तर सह नाही तर तुमच्या विना!
On 8/3/2010 11:04 PM Uday said:
चपटी मारून आला आहे का हा लेखक ??? काश्मीरचा काय संबंध बेळगावशी ?? त्याला कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र यासाठी म्हणायचे कारण बेळगाव हा महाराष्ट्राचा हिस्सा आहे व यासाठी न्यायालयात आम्ही लढत आहोत . तुम्हाला जर असे वाटत नसेल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारचा विरोध तरी करा . दोन दगडांवर पाय कशाला ठेवत आहात ?
On 02/08/2010 11:57 PM Sarang Madgulkar said:
शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे, त्यामुळे उध्दव असेच मसालेदार पण उथळ बोलणार. ... त्यांचा मित्र पक्ष भाजप चे या विधानावर काय मत आहे, हे पाहीले पाहिजे. वंदेमातरम !
On 8/1/2010 3:09 PM MAHENDRA JAIN said:
koni khari bolle ki tika hote
On 01/08/2010 00:13 amol said:
उद्धव ठाकरे जरा जास्तच बोलले, पण कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक, योजनाबद्ध रीतीने मराठी लोकांचे खच्चीकरण केले आहे सीमाभागात. जिथे आधी १०-११ मराठी आमदार होते तिथे आज किती आहेत? मागच्या आठवड्यात इंडिअन एक्स्प्रेस मध्ये आलेला लेख वाचा. मग कळेल. पैठणी पैठणी म्हणून मिरवतात ती पैठणी बेळगावात तयार होते, आणि त्या ठिकाणी मराठी कामगारांना रोजगारासाठी फिरकू देखील दिले जात नाही. आपण मात्र फक्त कन्नड नव्हे तर सर्व इतर भाषिकांचे सर्व चोचले पुरवतो. BG shirke बेळगावात विधानसौध बांधायला निघाले आहेत..
On 7/31/2010 11:50 PM sagar said:
आम्ही भोगतोय .... तिकडे मुंबई पुण्यात बसून बुद्धी पाजायला काय जातंय ??? बिहारी भैईये आणून ... मराठीची वाट लावलीत .. निदान आम्ही कर्नाटकात असून मराठी जपतोय ... एक बेळगावकर
On 7/31/2010 11:44 PM sagar said:
@ अतुल जोशी .. तुमच्यासारखे मराठी आहेत म्हणून बेळगाव कर्नाटकात आहे ... इथल्या मराठी लोकांची प्रतिक्रिया ऐकून आम्हाला लाज वाटत आहे कि आम्ही महारास्त्र का मागत आहोत ! - एक बेल्गाववकर ...
On 7/31/2010 11:36 PM GK said:
बेळगाव च्या लोकांनो तुम्हाला एक संदेश आहे. तुम्हाला महाराष्ट्रात येऊन काहीच फायदा होणार नाही. महाराष्ट्र काय पूर्ण सुधारला आणि कर्नाटक मागासलेला राहिला असं आहे काय? उगाच ह्या राजकारण्यांच्या नादी लागू नका. हे लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी असे विषय आयुष्यभर चालू ठेवतील... आपला विकास आपणच करून घ्या. कर्नाटकात राहून कानडी शिका पण मराठी विसरू नका.
On 7/31/2010 10:52 PM fox said:
१. महाराष्ट्राचे पोलीस घुसवून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र मुक्त करायला हवा. २. Border वर NH4 lock करायला हवा. ३. कर्नाटकच्या ST बसेस ना महाराष्ट्रात एन्ट्री करू दिली नाही पाहिजे. कर्नाटकातल्या बर्याच बसेस महाराष्ट्रात business करतात. ४. कृष्णेचे पाणी वेगळा कालवा काढून महाराष्ट्रा मधल्या दुष्काळी भागाला पुरवायला हवे. महाराष्ट्रा मधून १ थेंब हि पाणी कर्नाटक ला जाणार नाही हे पाहिले पाहिजे (अतिवृष्टी झाली तर सोडा मग हवे तेवढे). नाही तरी आंध्र तहानलेला आहेच.
On 31/07/2010 22:51 Dhirubhai said:
आहो कशाला आपला वेळ वाया घालवताय... हे या लोकांचे नेहमीचेच आहे.. जर कर्नाटक किंवा महाराष्ट्र मध्ये काही अंतर्गत राजकारणी भानगडी झाल्या तर बेळगावचा प्रश्न उचलून धरायचा म्हणजे लोक येड्या सारखे त्याच्या मागे धावतात आणि मुख्य मुद्दा विसरून जातात. जाऊ दे.. पण मला एक सांगा कि साहेबाना हि तुलना करायला ५० वर्षे का लागली..
On 7/31/2010 10:45 PM Balasaheb said:
I think Udhhav has lost his marbles. His comparison of Belgaun with Kashmir and Karantaka with Pakistan is childish and clearly indicates that Shiv Sena does not have constructive and progressiv agenda that would help solve problems of common Maharashtrians. He now-a-days just opens his mouth and, without thinking utters silly things. Wake up Maharashtrians! Shiv Sena and Uddhav are a lost cause. They are rapidly beoming irrelevant to Maharashtra. Sooner it happens better it will be for all.
On 7/31/2010 10:33 PM MP said:
he vidhan mhnje fukatchi TV Serial...
On 31/07/2010 21:52 Davendu Kulkarni said:
त्यातून आजकाल 'सेनेवर' टीका करणार्याचे वेड निघाले आहे. ज्यांना शेजारचा माणूस ओळखत नाही, ज्यांचे स्वत:च्या घराबाहेर काही काम नाही, ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे आणि ज्यांना स्वत:चे मानसिक संतुलन राखता येत नाही, अशा लोकांपुढे संगणक आला असल्यामुळे काय वाट्टेल ते लिहून "सेनांची" बदनामी करणे हेच यांच्या हातात उरले आहे. बेळगाव आणि सोलापुरही कर्नाटकात होते असे बोलणार्यांनी एकतरी उदाहरण दाखवावे, कि ज्यामध्ये महाराष्ट्रातील भाषिक अल्पसंख्यांकांवर अन्याय होतो आहे.
On 31/07/2010 21:40 Davendu Kulkarni said:
वा वा! महाराष्ट्रातील नेत्यांना जाग येऊ लागली म्हणायची. कमीतकमी तोंड उघडून स्पष्ट भूमिका घेणे याबाबतीत नक्कीच शिवसेना पुढे आहे. बाकी सर्व प्रकारच्या कोन्ग्रेसनी जर आता स्पष्ट भूमिका घेतली नाही तर पुढच्या निवडणुकीत त्यांचे काही खरे नाही. दुसरा मुख्य आक्षेप आहे तो "महाराष्ट्रद्रोही मराठी" लोकांवर. मूळ प्रश्न समजावून न घेता अकारण, नको तिथे उतू जाणारे देशप्रेम, लोकेछेचा अनादर आणि त्यात माहिती नसणार्यांची भर यामध्ये सीमाप्रश्नाच्या मराठी अनास्थेची बीजे आहेत. सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे.
On 7/31/2010 9:36 PM G. R. Banale said:
हे विधान अत्यंत बेजाबाब्दार्पानाचे व अकलेचे दिवाळे काढणारे आहे . बेळगावात मराठी माणसावर अन्याय होत आहे व आपण महाराष्ट्रीयांनी अविरुद्ध लढा दिला पाहिजे पण त्याचबरोबर आपण प्रखर भारतीय आहोत आणि महाराष्ट्राने सदैव जबाबदार भूमिका बजावलेली आहे. ज्या लोकांनी एकही विधायक कार्य केलेलं नाही त्यांनी स्वतः बरोबर महाराष्ट्राला बदनाम करू नये.
On 7/31/2010 9:32 PM yogesh said:
येथे एका वाचकाने पंढरपूर-कोल्हापूर कर्नाटकात होते असे लिहिले ते चुकीचे आहे. कन्नड वृत्तपत्रे चुकीची माहिती देतात. अशीच एकदा - "मराठी लोकांनी कोकणातील लोकांवर दडपशाही केल्याचे वृत्त आले", प्रत्यक्षात मी स्वता रत्नागिरीत जन्मलो, पनवेलपासून वेंगुर्ला-म्हापसा सर्वत्र गेलो, सगळीकडे मराठी भाषेसाठी प्रेम आणि जिव्हाळा पाहिला, कन्नड पेपरांनी असा "दडपशाहीचा" शोध कसा लावला त्यांनाच ठाऊक. - योगेश जोशी
On 7/31/2010 9:14 PM marathi manus said:
शिवसेनेमुळे मराठी माणूस बेळगावमध्ये स्वाभिमानाने जगतोय
On 7/31/2010 8:46 PM Sudheer said:
आम्ही सोलापूर, वळसंगच्या कानडी शाळेच्या एका विटेलासुद्धा धक्का लावला नाही आणि कर्नाटकने मात्र बेळगावच्या मराठी भाषिकांची, त्यांच्या शिक्षणाची जास्तीत जास्त गैरसोय केली. काही मासांपुर्वी बेळगावच्या "डी एड" च्या मराठी मुलांना सरसकट नापास करण्यात आले, अनेक मराठी शाळांवर १९९० च्या आधीच बंदी आणली.
On 7/31/2010 8:30 PM VAIJU said:
अरे वेडायानो असे काय भांडताय !
On 7/31/2010 7:52 PM ek puNekar said:
मी उर्मिला-बाईन्शी सहमत आहे.
On 7/31/2010 7:48 PM ek puNekar said:
मला वाटते की "बेलगाम" विषयी "बेलगाम" बोलायलाच पाहिजे असे नाही. ठाकर्यांना नाही उद्योग आणि हातात नाही सत्ता. सनसनीखेज विधाने करायला काही पैसे पडत नाहीत. नुसती भाषणबाजी करण्यापेक्षा काही विधायक कार्य करा. हातात सत्ता आपोआप येईल. कॉंग्रेस-सारख्या नीच पक्षाकडे जेव्हा सत्ता परत गेली तेव्हाच कळायला हवे होते. लोक नुसत्या भडक बोलण्याला लवकरच कंटाळतात. आणि तुमचा मुद्दा बरोबर असला तरी तुमच्याकडे पाठ फिरवितात. भूतकळातून काहीई शिका.
On 7/31/2010 7:47 PM Marathi from USA said:
उद्धव ठाकरे you need different agenda now. Don't sweat over Belgaon, Karnataka.
On 7/31/2010 7:16 PM maratha said:
shiva tillu, looks you are mentally disturbed person to call any maharashtrain desh drohi. The most dedication and sacrifice is done by Mahatrashtrian. There are Hindus and you are one of them is because of Great Marathas who fought for nation. Save your thoughts for your corrupt, expired, rotten brain
On 7/31/2010 7:04 PM Jai Ho! said:
Mr. Rahul you are correct!!! Mr. Uddhav Thakare and Hon. Mr. Rajaji Thakare should check their brains throughly.... Maharashtra may sponser Medical help to them....
On 7/31/2010 6:59 PM उर्मिला अशोक शहा said:
असे विचार म्हणून तर सेना सीमा ओलांडत नाही आणि गल्लीतही मर्दुमकी गाजवू शकत नाही अध्यक्ष उद्धव आपण आता मोठे झाला आहात पोरकटपणा का करिता?कर्नाटक मध्ये शिवसेनेचा मित्र पक्ष शासन करतो आहे याचे भान आहे का?अशीच भंपकगिरी चालू ठेवली तर तुमच्या हयातीत सेना शासन करू शकणार नाही.pakshache nete hone mhanaje shivaral pana karane navhe.
On 7/31/2010 6:58 PM sachin said:
श्रीमंत पेशवा आपली अक्कल पाजळू नका. सोलापूरचा वाद कधीच झाला नव्हता. वाद आहे तो बेळगाव बद्दल आहे. सोलापूर शहरात कन्नड बोलणारे लोक आहेत पण ते कधीच कर्नाटकात जावूद्या म्हणत नाहीत. बेळगाव चे लोक महाराष्ट्राबद्दल आग्रही आहेत. सरकार नाही. सोलापूरचा आणि सीमा प्रश्नाचा काही संबंध नाही.
On 7/31/2010 6:39 PM Punekar said:
कोणी काहीही बोलण्य ची गरज नाही बेलगाम वाले ठरवतील न त्यना क्या पाहोजे?
On 7/31/2010 6:24 PM श्रीमंत बाजीराव पेशवा said:
कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तेणे मज लावियला वेधू.... पंढरपूर कर्नाटकात होते हे सिद्ध होते.... नव्हे पूर्ण सोलापूर जिल्हाच कर्नाटकाचा भाग होता.... महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस तत्कालीन राज्यकर्त्यांनी textile mill सोलापुरात होत्या (बेळगावात अन्नान्न दशा होती, विकास नव्हता) म्हणून बेल्गाविच्या बदल्यात सोलापूर पदरी पडून घेतला.... मग आता बेळगावी कर्नाटकात आहेच तर तेथील भूमिपुत्रांचा विकास कन्नड भाषेतून झाला काय किंवा मराठीतून झाला काय? विकास होण्याला प्राधान्य देण्याचे महान मन महाराष्ट्र दाखवेल काय?
On 7/31/2010 6:16 PM Hari said:
एक जबाबदार 'महाराष्ट्र' म्हणून तुम्हाला काय वाटते...? तर याला माझे उत्तर असे राहील कि सध्या आपण 'महाराष्ट्र' म्हणून बहुभाषिक राष्ट्राचे (भारताचे) सदस्यत्व भूषवत आहोत. त्यामुळे असे फालतू वाद उगाळत बसण्यापेक्षा देशासमोर ज्या मुख्य समस्या आहेत त्याकडे लक्ष्य दिले तर अधिक बरे! डा. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषेच्या मुद्द्यावरून राज्य निर्मितीला विरोध केला होता, तो याच कारणांनी!!!
On 31/07/2010 17:43 milind bibave said:
Ha ek bhavnik mudda aahe, tyamule asha vidhanancha ugach bau karu naye. Je kharach belgaon shi ekrup aahe tyana asha vidhanancha jhala tar phaydach hoil. V jyana bel.gaon shi kahi dene ghene nahi te phakta charcha kartil kinva ghadun aantil. Aani aajparyant aapan soujanyacha zenda ektach hati gheun kahi nobel milavale nahi. Ani koni hi aso maharashtra babat kadal bhumika ghetli tar aatachya kalat tyala saathch dyayla havi. Nahitar kirana rajasthani kadun, nashta udpyakade, gharachi, ATM chi dekh
On 7/31/2010 5:40 PM ek puNekar said:
Despite of Belgaum issue, Shiv Sena has become desperate lately and has been making provocative statements such as this one and "will bury the archeological survey dept." bal thackrey has grown old and uddhav thackrey has nothing constructive to do. plus he is under political stress as MNS has almost same agenda as Shiv Sena. he would o himself and Shiv Sena a favor if he tones down his language and does somthing constructive -- even in case of Belgam issue.
On 7/31/2010 5:32 PM SAC said:
काहीही म्हणण्या पूर्वी एकदा विचार करा प्लीस, आम्ही काही द्विभाषीय लोक आज कर्नाटकात राहत आहोत. अशा भांडणा मध्ये आम्ही भरडले जाऊ.आम्हाला एखाद्या वेळेस दोन्हीही राज्यात गणले जाणार नाही. आज बंगलोर मध्ये माझी स्थिती अशी आहे कि मला घरी बाबांच्या बरोबर मराठी नाही कन्नड मधून बोलाव लागत लोकांच्या भीतीने. तसेच माझ्या आई वडिलांना कन्नड मध्ये बोलायला भीती वाटते. मला गर्व आहे मी स्वतंत्र भारतात राहून मला माझ्या देशातल्या भाषा बोलायला भीती वाटते
On 7/31/2010 5:19 PM KUMAR BHASKAR RAO said:
its very important and critical issue,but as all of you know all all maharashtrian political and social leaders useless.
On 7/31/2010 5:07 PM Shiva Tillu said:
I'm not with other Deshdrohi Maharashtrians.... Belgavi is now given to Karnataka in turn Maharashtra got the Chaddar City Solapur and Chappal City Kolhapur.... Now keep quiet!!! Sant Gyandev said in 13th Century.... Kanada ho Vitthalu Karnataku.....
On 7/31/2010 5:06 PM SAC said:
काहीही म्हणण्या पूर्वी एकदा विचार करा प्लीस, आम्ही काही द्विभाषीय लोक आज कर्नाटकात राहत आहोत. अशा भांडणा मध्ये आम्ही भरडले जाऊ.आम्हाला एखाद्या वेळेस दोन्हीही राज्यात गणले जाणार नाही. आज बंगलोर मध्ये माझी स्थिती अशी आहे कि मला घरी बाबांच्या बरोबर मराठी नाही कन्नड मधून बोलाव लागत लोकांच्या भीतीने. तसेच माझ्या आई वडिलांना कन्नड मध्ये बोलायला भीती वाटते. मला गर्व आहे मी स्वतंत्र भारतात राहून मला माझ्या देशातल्या भाषा बोलायला भीती वाटते
On 7/31/2010 4:41 PM Prakash Shankar Jadhav said:
याला फक्त नेहरू आणि कोन्ग्रेसच जबाबदार आहे. महाराष्त्य्राविषयी आकस असल्यामुळे हे सर्व घडले. मुंबई महाराष्ट्राला दली पण मुद्दाम बेळगाव, कारवर, निपाणी कर्नाटकला देऊन मराठी माणसांना कायमची डोकेदुखी दिली.
On 7/31/2010 4:06 PM CHINTU said:
आधी ताब्यातील महाराष्ट्राचा विकास करा.
On 7/31/2010 4:03 PM sagar said:
tya uddhav la vichara yuti shasanachi satta astana ka prayatna kele nahit belgao maharashtrat anayche??????? tyanche he bolne murkhpanache ahe
On 31/07/2010 15:55 बाळा नाडकर्णी (balanad27@hotmail.com) said:
Upendra , अगदी बरोबर बोललात. सीमाभागातील मराठी जनतेने गेली ५० वर्षे लोकशाही मार्गाने लढा चालवून त्यांचा लोकशाही मार्गावरील विश्वास व्यक्त केला आहे. लोकशाही मार्गाने प्रस्तुत केलेले लोकांचेच म्हणणे जर सत्ताध-यांकडून ऐकले जात नसेल तर दुसरा कुठला मार्ग लोकांनी अवलंबावा? तुम्ही म्हणता ते अगदी खरेय की जेव्हा महाराष्ट्र बोलतो त्यावेळेसच काही लोकांना नेमका so called " राष्ट्रवादाचा " कंठ फुटतो. लोकशाही आणि तथाकथित राष्ट्रवाद परस्पर विरोधी असतील तर कोणास प्राधान्य द्यावे याविषयी काही संकेत आहेत का?
On 7/31/2010 3:50 PM Suhas said:
हे वक्त्यव्य फार उशिरा आले असे वाटते आहे. भाषावर प्रांत रचना करायची म्हणून महाराष्ट्रा चा जन्म झाला न मग बेळगाव महाराष्ट्रा बाहेर कसे. त्या वेळच्या दर्जाहीन आत्मघातकी अविचारी pudharya मुले हे भोग भाळी आले आपल्या. आता कोणी पुढाकार घेत असेल तर आपलीच माणसे आवसान घात करणार. टिपिकल आहे. माझे स्वच्छ मत आहे कि तेथील लोक नि सविनय कायदे भंग करावा असहकाराची भूमिका घाव्यी आणि महाराष्ट्रा ने सर्वतोपरी मदत करावी त्या लोकांची. Shivasenechya karyakari अध्यक्षाचे अभिनंदन.
On 7/31/2010 3:48 PM abhijit narawade said:
शिवसेना अध्यक्षांचे बोलणे बरोबर आहे
On 7/31/2010 3:43 PM Deepak Sonar said:
अशा आततायी विधानांची किंमत पुढच्या पिढ्यांना भोगावी लागेल याची जाणीव राजकारणी मंडळीना नसावी हे पटत नाही
On 7/31/2010 3:29 PM sanjay sabale said:
भारत सरकारला छोट्या गोष्टीवरही राजकारण हवाय , म्हणूनच ते बेलगावचा विषय ताणु देत आहेत. मराठी प्र्हदेश महाराष्ट्रात आलाच पाहिजे. पण जो आता महाराष्ट्रात आहे , तो तुटू नये म्हणजे मिळवली. मराठवाड्याकडे दुर्लक्ष करू नका, नाही तर महाराष्ट्र तुटायला वेळ नाही लागणार!!
On 7/31/2010 3:28 PM sanjay sabale said:
अगदी बरोबर. तुम्ही बेलगाम मध्ये जावून बघा म्हणजे कळेल तुम्ही मुलाखती साठी गालात तरी अगदी तुम्ह्च्या समोर म्हणतात ह्यला सेलेच्त करू नका कन्नड मध्ये )
On 7/31/2010 3:26 PM Vikas Rode said:
शिवसेना अध्यक्षांचे बोलणे बरोबर आहे ..... कारण सध्या बेळगावात जी परिस्थिती आहे ती काश्मिरपेक्षाही भयानक आहे..... सरकार सुद्धा यात लक्ष देत नाही.
On 7/31/2010 3:26 PM karan mule said:
राहुल चे संतुलन बिघडले आहे
On 31/07/2010 15:23 Jay gokhale said:
उद्धव ला राउतांनी सांगितले असेल असे बोलायला नाहीतर त्याला कोठून सुचले.
On 7/31/2010 3:16 PM solvey USA said:
There is one simple way to solve the problem.Just split the India and make all states as a saperate COUNTRY. No one can fight for border.
On 7/31/2010 3:12 PM Rahul said:
उद्धव ठाकरे बरोबर बोलत आहेत.
On 7/31/2010 3:10 PM nair said:
शिवसेनेचे सर्व नेते कायम फालतू बडबड करतात आणि कृती शून्य. त्यांना कोणीही seriously घेत नाही. त्यांचे calibre वडापाव, स्वस्त भाजी ह्या पुढे गेली अनेक वर्षे गेले नाही आणि जाणार नाही. पाच दहा रिकामटेकडी आणि टारगट माणसे एकत्र आली कि संघटना कशी होणार?
On 7/31/2010 3:07 PM ashokmogal said:
अशी वाक्य केवळ टाळ्या मिळवण्या साठी वापरण्या पेक्षा सीमा भागातील आपल्या बांधवाना प्रत्यक्ष न्याय मिळवून देणे फार महत्वाचे आहेत ! नाहीतरी कर्नाटक सरकारची भूमिका देखील पाकिस्तान सारखीच आहेत !! शिव सेनेने आपल्या सीमा प्रश्नीच्या आंदोलनाचे स्वरूप आता बदलले पाहिजे आता ह्यापेक्षा आक्रमक झाले पाहिजे तरच कर्नाटकची दंडेलशाही थांबेन ! जय महाराष्ट्र !!!!!
On 7/31/2010 3:04 PM Meghna said:
प्रश्न खरच मोठा आहे तो योग्य विचारविनिमय करून घेतला पाहिजे
On 7/31/2010 3:02 PM VK said:
अगदी बरोबर. तुम्ही बेलगाम मध्ये जावून बघा म्हणजे कळेल तुम्ही मुलाखती साठी गालात तरी अगदी तुम्ह्च्या समोर म्हणतात ह्यला सेलेच्त करू नका कन्नड मध्ये )
On 31-07-2010 15:02:08 EK marathi said:
शिवसेना अध्यक्षांचे बोलणे बरोबर आहे. राहुल चे संतुलन बिघडले आहे.
On 7/31/2010 3:01 PM Amit said:
ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार तेथील मराठी जनतेशी दडपशाही व्यवहार करीत आहे ते पाहता ही तुलना फारशी चुकीची वाटत नाही...
On 7/31/2010 3:00 PM laxman marane said:
याप्रश्नी केंद्र सरकारने लक्ष घालावे ..
On 7/31/2010 2:57 PM Upendra said:
महाराष्ट्र बोलतो त्यावेळेसच काही लोकांना नेमका so called " राष्ट्रवादाचा " कंठ फुटतो .......कर्नाटक जे काही ५० वर्ष करतेय तो काय मग राष्ट्रवाद आहे का ....??? आणि सनदशीर, आंदोलनात्मक लढा हे सर्व ठीक आहे पण त्याचा काहीही परिणाम या गेंड्याची कातडी असणाऱ्या सरकारवर मग दोन्ही भाजप आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिल्लीतले सरकारवर होणार नाही शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे ........
On 7/31/2010 2:56 PM yuvraj said:
but........what is the action?? how many days it will take to solve this dispute??
On 7/31/2010 2:54 PM अतुल जोशी said:
दिवस भरलेत शिवसेनेचे....लवकरच घरी बसण्याची वेळ येणार आहे.
On 7/31/2010 2:54 PM Arjun Hadge said:
Mi Mage pun pratikriya lihli hoti, Karnataka madhe rahanya peksha pakistanat rahilele bare. Udhav sahebhche bolne agdi barober aahe. Those who are from belgaum & those who know about marathi people of belgaum they will honour the statement of Mr. Udhav Thakkare.
On 7/31/2010 2:51 PM pradyumna said:
भारत सरकारला छोट्या गोष्टीवरही राजकारण हवाय , म्हणूनच ते बेलगावचा विषय ताणु देत आहेत. मराठी प्र्हदेश महाराष्ट्रात आलाच पाहिजे. पण जो आता महाराष्ट्रात आहे , तो तुटू नये म्हणजे मिळवली. मराठवाड्याकडे दुर्लक्ष करू नका, नाही तर महाराष्ट्र तुटायला वेळ नाही लागणार!!
On 7/31/2010 2:49 PM प्रशांत वाळके said:
युद्ध होणार... भारत पाक नाही... महाराष्ट्र कर्नाटक.. महाराष्ट्र हरणार... कारण मराठी माणसात नेहमी दुफळी राहिली आहें... ती ईथे हि राहणार... आमचा विधर्भ.. आमचा पश्चिम महाराष्ट्र.. आमची मुंबई... आता आमचा बेळगाव... मराठे (मराठी माणूस) कायम भारता साठी लढला आणि आता भारता विरुद्ध महाराष्ट्रासाठी लढतोय.. थोड्या दिवसांनी आमचा महाराष्ट्र कुठे आहें असा बोलावं लागेल... फोड आणि राजकारण करा.. करा..करा..
On 7/31/2010 2:46 PM sk said:
जर आधी बेळगाव महाराष्ट्र मध्ये होते. नंतर ते राजकारण्य मूळे कर्नाटक मध्ये गेले. आणि उद्धव ठाकरे काही हि चुकेचे बोलत नाहीत.
On 7/31/2010 2:40 PM sujay kanawade said:
अगदी बरोबर आहे काय चुकीचे बोलले गेली कित्तेक वर्ष अगदी सौम्य भूमिका घेऊन काय मिळाले ????....लाठ्या, काठ्या, फुटलेली डोकी ,रक्ताबबळ झालेली "मराठी" ...अजून किती वर्ष वात पहायची ..अगदी कडक भूमिका घेतली ...हार्दिक अभिनंदन ....जय महाराष्ट्र
On 7/31/2010 2:31 PM marthi said:
शिवसेना अध्यक्षांचे बोलणे बरोबर आहे .
On 31/07/2010 14:11 Mayur Pawar Pimpari said:
शिवसेना अध्यक्षांचे बोलणे बरोबर आहे ..... कारण सध्या बेळगावात जी परिस्थिती आहे ती काश्मिरपेक्षाही भयानक आहे..... सरकार सुद्धा यात लक्ष देत नाही.
On 7/31/2010 2:10 PM Rahul said:
उद्धव ठाकरे याचं संतुलन बिघडला आहे मते मिळवण्या साठी काही वक्तव्य करत आहेत ते !!!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: