जळगाव - जिल्ह्यातील गुढे (ता. भडगाव) येथे पहाटे दोनच्या सुमारास एका कुटुंबावर दरोडा टाकण्यात आला. मात्र, घरात काही न मिळाल्याने दरोडोखोरांनी घरातील व्यक्तिंना जखमी केले.
पहाटे दोन सुमारास भावसिग लाला माळी व त्यांचे कुटुंबिय झोपले असता दरोडेखोरांनी त्यांना बेशुद्ध केले. यानंतर दरोडेखोरांनी घरात काही न मिळाल्याने कुटुंबियांवर शस्त्राने वार केले. कुटुंबातील सहा जणांच्या कानांवर वार झाले असून, त्यांच्यावर चाळीसगाव येथे उपचार सुरु आहेत. अर्धा तासानंतर जाग आली. त्याने आरडाओरडा केल्यानंतर ते सर्वजण पळून गेले. जाताना दरोडेखोरांनी गळ्यातील सोन्याची पोत चोरून नेली.
Follow
Us on
Twitter