Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

2124 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 5 सप्टेंबरला
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 31, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 2124 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पाच सप्टेंबरला होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. अर्ज 16 ते 21 ऑगस्ट या कालावधीत सादर करता येतील. मतमोजणी सोमवारी, 6 सप्टेंबरला होईल.

निवडणूक होणाऱ्या 2124 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 763 जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल उस्मानाबाद 430, चंद्रपूर - 321, औरंगाबाद-258 असा संख्याक्रम आहे.

दरम्यान, 18 जिल्ह्यांतील 1701 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान आज सर्वसाधारण शांततेने पार पडले, अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली.
Follow
Us on
Twitter


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: