मुंबई - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यास येथील काही राजकीय नेत्यांची मदत होती, या महसूलमंत्री नारायण राणे यांच्या विधानात काहीही तथ्य नाही, असे मुंबई पोलिसांतर्फे उच्च न्यायालयास सांगण्यात आले. या संदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी केली. मात्र राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे या हल्ल्यास राजकीय नेत्यांचे साह्य असल्याचे आढळून आले नाही, असे मुख्य सरकारी वकील पांडुरंग पोळ यांनी सांगितले. त्यामुळे खंडपीठाने या प्रकरणीचा निकाल राखीव ठेवला.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यास येथील काही राजकारण्यांनी मदत केली होती, असे राणे यांचे म्हणणे होते. त्यामुळे या संदर्भात राणे यांची पोलिसांनी चौकशी करावी आणि या राजकारण्यांना शोधून त्यांनाही शिक्षा करावी, अशी मागणी करणारी याचिका सोलापूरचे शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी उच्च न्यायालयात सादर केली होती. तिच्यावर न्या. श्रीमती रंजना देसाई व न्या. श्रीमती विजया कापसे ताहिलरामानी यांच्यासमोर नुकतीच सुनावणी झाली.
Follow
Us on
Twitter