नवी दिल्ली - "महाराष्ट्रातील खासदारच प्रश्न विचारण्यात पुढे' हे (ता. 30) प्रसिद्ध झालेले वृत्त "व्होट फॉर इंडिया' या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालाच्या आधारे आहे. माहितीच्या अधिकाराखाली व लोकसभेतील कार्यवृत्तांताच्या अहवालावरून या संस्थेने खासदारांचा निधी, प्रश्न, वादविवाद याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. या अहवालाच्या प्रकाशनासंबंधातील हे वृत्त असून, "सकाळ'चा या माहितीशी काही संबंध नाही.
या वृत्तात खासदारांच्या निधीबाबत प्रसिद्ध झालेल्या माहितीबाबत केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि खासदार समीर भुजबळ यांनी खुलासा केला आहे. हा खुलासा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत "सकाळ'ला पाठविण्यात आला आहे. वासनिक यांच्या खासदार निधीतून दोन कोटी 12 लाख रकमेची 40 कामे प्रस्तावित असून, त्यापैकी एक कोटी 49 लाख इतक्या रकमेच्या 28 कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचा खुलासा नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. तर, समीर भुजबळ यांनी त्यांच्या खासदार निधीतून 62 लाख 12 हजार रुपये खर्च करून 21 विविध प्रकारची कामे केली आहेत. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी पुरविणे, सार्वजनिक कम्युनिटी सेंटर स्थापन करणे, बसथांबा बांधणे आदी कामांचा समावेश असल्याचा खुलासा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.
Follow
Us on
Twitter