Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मग काय मी तुरुंगात जाऊ? - शीला दीक्षित
पीटीआय
Saturday, July 31, 2010 AT 12:25 AM (IST)

नवी दिल्ली - "केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाची मला कल्पना आहे; पण म्हणून काय मी तुरुंगात जावे, असे तुमचे म्हणणे आहे का,'' अशी संतप्त विचारणा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केली.

"स्पर्धेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल आला आहे. तुम्ही याची नैतिक जबाबदारी स्वीकारता का,'' असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भडकलेल्या शीला दीक्षित पुढे म्हणाल्या, ""मी आताच काही बोलणार नाही. आम्हाला अद्याप अहवाल मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर गरज पडल्यास आम्ही कारवाई करू. सध्या काम सुरू आहे. वेळ पडल्यास स्पर्धा संपल्यानंतरच कारवाई केली जाईल.''
प्रतिक्रिया
On 31/07/2010 23:28 Pratik Kasture, Satara said:
"साठी बुद्धी नाठी" जबाबदारी घ्यायची होत नसेल तर शीला दिक्षितांनी घरी बसावं, या वयात त्यांनी आराम करावा.
On 7/31/2010 7:00 PM Vijay said:
सन्यास घेउन वानप्रस्थाश्रमात जा, हरी हरी करा. तुमचे हि तुरुंगात जाणे टळेल आणि जनतेचे हि कल्याण होईल.
On 7/31/2010 3:16 PM Aniket said:
मलई खाताना लाज वाटली नाही काय?बिल्लीने घी देखा लेकीन बडगा नाही देखा.
On 7/31/2010 1:20 AM akira said:
नेता कधी तुरुंगात जातो का??


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: