Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सरकारला जनतेच्या आरोग्याची काळजी नाही
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 31, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून राज्य सरकारने कापून खायचे ठरविले आहे. सरकार 'एफएसआय' वाढवून कोट्यवधी रुपये कमवीत आहे. मात्र, सरकारला जनतेच्या आरोग्याची काळजी नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मलेरिया निर्मूलनविषयक आवश्‍यक उपाययोजना न करणाऱ्या बिल्डरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शाखाप्रमुखांना दिले आहेत.

मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात आज महापौरांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. महापौर श्रद्धा जाधव, आमदार दीपक सावंत, सभागृहनेते सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, आरोग्य समितीच्या अध्यक्ष अश्‍विनी मते, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीषकुमार सिंह, मनीषा म्हैसकर, असीम गुप्ता, संचालक (प्रमुख रुग्णालये) डॉ. संजय ओक आदी या बैठकीला उपस्थित होते.

मुंबईत मलेरियाचे प्रमाण वाढत असून, या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजकीय पक्षांनी मतभेद विसरून मलेरियाच्या निर्मूलन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेला आम्ही सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. शाळा, महाविद्यालयांच्या पाण्याच्या टाक्‍या तपासाव्यात, बांधकामांच्या ठिकाणी मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बिल्डरांना बंधनकारक करावे, नगरसेवकांनी आपापल्या विभागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
Follow
Us on
Twitter
प्रतिक्रिया
On 7/31/2010 12:56 PM prashant said:
भारीच गम्मत आहे ...ह्यांचेच सत्ता महापालिकेत आहे आणि हेच काही करू शकत नाहीत शंख फुकण्या शिवाय...
On 7/31/2010 12:56 PM sandip said:
कॉंग्रेस सरकार आसो कि कुठले कि सरकार आसो ...सर्व सामान्य जनतेची कोणालाही काहीच पडलेली नसते फक्त सत्ता हवी असते
On 7/31/2010 12:32 PM madhura said:
सरकार कोणाचे हि असो....पण सगळेच खुर्ची भेटली कि आपले कर्तव्य विसरतात ... मला तर हल्ली असे जाणवायला लागले आहे कि कोणतेही सरकार असले तरी हि लोक जी आनितिक कामे आहेत ती नैतिक समजून करत ...आणि जो सरळ मार्गे चालत असतो त्याला वेड्यात काढतात ........ पण हे खरे आहे कि मलेरिया वर मत करणे गरजेचे आहे नाहीतर परीस्तीती हात बाहेर जाईल....
On 7/31/2010 10:51 AM krishna said:
उद्धवसाहेब खरे बोलले!!!
On 7/31/2010 3:07 AM shrikant landge said:
कॉंग्रेस सरकारला खुर्चीशिवाय कशाचीच चिंता नाही !!!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: