Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

करार नसल्याची कबुली; पण गैरव्यवहार नाही
पीटीआय
Sunday, August 01, 2010 AT 12:00 AM (IST)

ब्रिटनच्या "एएम' कंपनीचा खुलासा
नवी दिल्ली -  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजन समितीशी कोणताही करार झाला नव्हता, अशी कबुली "एएम फिल्म्स यूके लिमिटेड' या कंपनीने दिली आहे; मात्र कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचा दावाही करण्यात आला.

"एएम'चे मालक आशिष पटेल यांनी हा खुलासा केला. या कंपनीला गेल्या वर्षी लंडनमध्ये "क्वीन्स बॅटन रिले'च्या वेळी सेवा पुरविल्याबद्दल लाखो पौंडची रक्कम देण्यात आली आहे. हा व्यवहार शंकास्पद नसल्याचा दावा करून ते म्हणाले, ""कोणताही नियमबाह्य किंवा बेकायदा व्यवहार झालेला नाही. आम्ही सेवा पुरविल्याबद्दल रक्कम देण्यात आली. माझ्याकडे व्यवहाराचा सर्व तपशील आहे आणि गरज पडल्यास तो देऊ शकेन.''

कंपनीकडे कराराची कागदपत्रे दाखविण्यासाठी आहेत का, या प्रश्‍नावर त्यांनी सांगितले, ""तेव्हा करार करता आला नव्हता; कारण सर्व गोष्टी वेगाने घडल्या. आता महसूल खात्याला कराराची माहिती हवी आहे. मी वकील येण्याची वाट पाहात आहे. ते नऊ ऑगस्टला येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मी निर्णय घेईन. गरज पडल्यास मी भारतातसुद्धा येऊ शकेन.''

या कंपनीला दरमहा 25 हजार पौंड रक्कम संयोजन समितीकडून देण्यात येत आहे; मात्र याचा इन्कार करीत पटेल यांनी केवळ 2,47,000 पौंड इतकीच रक्कम मिळाली असून, 1,23,000 पौंड रक्कम बाकी असल्याचे सांगितले.

"कोणतीही रक्कम लेखी नोंद झाल्याशिवाय माझ्या खात्यात आलेली नाही. मी तुम्हाला कागदपत्रे दाखवू शकतो. आमच्याकडे रक्कम जमा झाल्याच्या नोंदी आहेत. मी याविषयीची सर्व कागदपत्रे संयोजन समितीला दिली आहेत.
 

 
प्रतिक्रिया
On 24/09/2010 02:19 PM vikkeks said:
सर्व कांही थोतांड आहे. यात भरपूर जणांचे हात रंगलेले आहेत. बाकी सर्व सावरासावर.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: