Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पावभाजी खा आणि 'रिलॅक्‍स' व्हा...!
विश्वनाथ गरुड (wishwanath.garud@esakal.com)
Tuesday, August 03, 2010 AT 03:00 AM (IST)

आषाढी वारी कव्हर करण्यासाठी १५-२० दिवस बाहेरगावी असल्यामुळे गेले तीन आठवडे खमंग कॉलममध्ये काही लिहू शकलो नाही. काही वाचकांनी 'खमंग'मध्ये नवं काही नाही का, अशी विचारणा करणारे मेल पाठवले. तसं वारीमध्येही काही नवीन आणि चविष्ट पदार्थ चाखायला मिळाले, त्याबद्दल स्वतंत्रपणे एखादा ब्लॉग चालवता येईल. असो... गेल्या काही वर्षांत पावभाजी आणि खवय्ये यांचं दृढ नातं निर्माण झालंय. पावभाजी आवडत नाही, असा खवय्या सहजासहजी सापडणार नाही. पावभाजीचा नुसता विषय जरी निघाला, तरी मला आठवण येते 'रिलॅक्‍स'ची. सहकारनगरला सारंग सोसायटीत असलेलं हे हॉटेल गेल्या २६ वर्षांपासून खवय्यांच्या सेवेत रुजू आहे.


व्यवसायचं करायचा, या जिद्दीने नितीन गोसावी यांनी १९८४ मध्ये भाड्याने दुकान घेऊन 'रिलॅक्‍स' सुरू केलं. आज हे हॉटेल इथल्या पदार्थांच्या चवीमुळं चांगलचं नावारुपाला आलंय. सहकारनगर, पद्मावती, शिवदर्शन, मित्रमंडळ, धनकवडी, कात्रज परिसरातील तरुणाई संध्याकाळच्यावेळी इथं मिळणाऱ्या विविध
पदार्थांची चव चाखण्यासाठी हटकून येतेच. 'रिलॅक्‍स' फेमस आहे, ते इथं मिळणाऱ्या पावभाजी आणि तवा पुलावसाठी. इथली पावभाजी खाल्ल्यापासून मला
दुसऱ्या कुठल्या पावभाजीची चव आवडतच नाही. 'रिलॅक्‍स'‍सच्या पावभाजीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पावभाजीत कोणताही कृत्रिम रंग मिसळत नाहीत.  त्यामुळं इथली पावभाजी लालबुंद दिसत नाही. तरीही चवीला ती इतरांपेक्षा वेगळी आहे. दुसरं म्हणजे इथल्या पावभाजीला लसणाचा मस्त स्वाद आहे. पावभाजी खाताना एखाद्या नवख्यालाही ते जाणवते. पावभाजीसोबत इथं मिळणारा मसाला कांदाही पावभाजीची लज्जत वाढवणाराच आहे. कृत्रिम रंग वापरण्यापेक्षा आम्ही पावभाजीत काश्मिरी मिरची पावडर वापरतो. ज्यामुळे पावभाजीला थोडा वेगळा रंग येतो आणि ती चवीलाही छान लागते, असे नितीन गोसावी सांगतात.

भरपूर अमूल बटर, मटार, ढोबळी मिरची, टोमॅटो, बटाटा घालून केलेला तवा पुलावही 'रिलॅक्‍स'मध्ये टेस्ट करायलाच हवा. तवा पुलावसाठी इथं खास मसाला वापरण्यात येतो. त्यामुळे त्याची चव पावभाजीच्या चवीला सूट होणारी आहे. हवं असेल, तर तुम्ही तवा पुलाव थोडासा तिखट करायला सांगू शकता.  'रिलॅक्‍स'च्या गरमागरम तवा पुलावची चव बराच वेळ जीभेवर रेंगाळत राहणारी आहे. तुम्हाला अगदी कडकडून भूक लागली असेल, तरी पावभाजी आणि तवा पुलाव हा मेनू अगदी पोटभर होऊ शकतो.

'रिलॅक्‍स'मध्ये महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज इत्यादी विविध चवीचे खाद्यपदार्थ मिळतात. मसाला पाव, ओल्या काजूची उसळ, व्हेज पतियाला, व्हेज कढाई, स्प्रिंग रोल हे पदार्थही इथं फेमस आहेत. गेल्या १६ वर्षांपासून 'रिलॅक्‍स'चे बल्लवाचार्य कायम आहेत. त्यामुळे कधीही गेलात, तरी 'रिलॅक्‍स'मध्ये पदार्थांच्या चवीत किंचितही बदल झालेला जाणवत नाही. दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत 'रिलॅक्‍स' खवय्यांच्या सेवेसाठी सुरू असतं. हॉटेलमध्ये गर्दी असेल, तर फार वाट बघत न बसता सरळ पार्सल घेऊन घरी जाऊन खाणं माझ्यामते फायद्याचं ठरतं. कारण इथं पार्सलमध्ये क्वांटिटीही थोडी जास्तच मिळते. फोनवरून
ऑर्डर देऊनही तुम्ही पार्सल कलेक्ट करू शकता.

भाड्याचं दुकान घेऊन सुरू केलेल्या 'रिलॅक्‍स'च्या यशामागे नितीन गोसावी यांचे कष्ट आहेत. आज त्यांचा मुलगा विराज त्यांच्या मदतीसाठी तयार झालाय.  विराजनं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय. बिबवेवाडीत भारतज्योती बसस्टॉपजवळ सुरू करण्यात आलेली 'रिलॅक्‍स'ची नवीन शाखा तोच सांभाळतो. भविष्यात कोथरुड, औंधमध्ये नवीन शाखा सुरू करण्याची नितीन गोसावी यांची इच्छा आहे. खरंच, प्रत्येक खवय्यानं इथल्या पावभाजी आणि तवा पुलावची टेस्ट घेऊन 'रिलॅक्‍स' व्हावं, असंच हे ठिकाण आहे.

पत्ता -
सहकारनगर, ८४/२ दर्पण,
सारंग सोसायटी,
पुणे.
दूरध्वनी - २४२३१११०

प्रतिक्रिया
On 8/18/2010 6:11 PM soham said:
amchya BEED chi BHOLENATH PAVBHAJI ASHICH KHOOP famous ahe.
On 8/18/2010 12:51 PM nilam thorat said:
please sent your pav bhaji recipies
On 8/5/2010 6:19 PM Rajesh T. Gaikwad said:
wah मजा आली वाचून. पुण्यात असताना Relax च्या पाव भाजीची चव चाखली नाही असा एकही महिना जात नाही. college च्या वेळचा हा आमचा अड्डा पण अजूनही कोणीतरी ओळखीचा भेटतच relax ला. पाव-भाजी, तवा पुलाव, पिठलं भाकरी, कॉफ्फी, कोल्ड कॉफ्फी, मसाला पाव एकदम तोडच नाही!
On 8/5/2010 8:53 AM Swati@Toronto,Canada said:
we all like the taste of Relax Pav Bhaji since 90's,recently got chance to eat pav bhaji in 2009,our daughter liked it too on our visit to India, looking forward to taste it soon
On 8/4/2010 5:45 PM मुंबईकर said:
खमंग मालिकेत पुणे-पुणे अति झाले..मुंबईच्या खाद्य ठिकाणांचा उल्लेख असणारी मालिका सुरु करा..ईसकाळ विश्वभर वाचल्या जातो..
On 04/08/2010 16:15 raju said:
पत्ता सांगा कि राव
On 04/08/2010 16:08 Sarandeepsing said:
आमच्या "राजगोपालाचारी" कि पावभाजी तो आख्खे परभणी मे वल्ड फेमस है............
On 8/4/2010 3:59 PM Salla said:
बहुतेक सर्व हॉटेल्स मध्ये पावभाजी करिता लोण्या ऐवजी देओनारचे कत्तलखान्यातून येणारे Animal Fat वापरण्यात येते, जे तुलनेने अत्यल्प किमतीचे असते. ही गोष्ट अगदी खरी आहे. nऑन veg खाणारी मंडळीही Animal फट खात नाहीत. वापरण्यात येणाऱ्या लोण्याचे पकेट चेक करावे. भरपूर लोणी वापरणारे हॉटेल्स तर हमखास Animal Fat च वापरतात. ग्राहक भरपूर लोणी पाहून खूष होतो. एखाद्या जवळच्या ओळखीच्या हॉटेलमालक / वेटरला विश्वासात घेवून विचारा, माझ्या म्हणण्यात तथ्य आहे का नाही जरूर बघा.
On 8/4/2010 3:53 PM To Akshay said:
आरे बाळ अक्षय, तुला हे ठिकाण किती आवडत कळाल आम्हाला, बास कि आता, आणि काय वाट्टेल ते इंग्लिश लिहिलंय या माकडांनी. इंग्लिश येत नसेल तर मराठीत लिही कि, का मनसे चा धसका दाखवू?
On 8/4/2010 2:29 PM Siddharth said:
Relax ची पाव भाजी पेक्षा पुण्यात अजून खूप ठिकाणी चांगली पाव भाजी मिळते. (पिझ्झा आणि पुलाव पण) Try सुप्रेमे कॉर्नर JM रोड शिवसागर चा बाजूला. रात्री ८ ते ११. या ठिकाणी मी गेले २० years पाव भाजी खातो आहे..तीच चव आहे .इकडे पुलाव अंड पिझ्झा पण खूप मस्त मिळतो. नक्की जाऊन या.
On 8/4/2010 2:00 PM Akshay said:
i love rilax's bhaji pav. i like the test when i come from collge directly to rilax, i will really rilax their. test is very good & peoples will only rilax forgetting what will happen outside if i will be eating in rilax. It is really relax to human being. but their r other centers also in pune where u will get good food & u will rilax. thank e-sakal for info on Relax & i wanted to go to rilax today only to get rilaxed & to eat masala pav their. during school i will go to rilax with friends 4 it
On 8/4/2010 1:51 PM Pant said:
आरे माणसा, जेन्वा टिळक रस्त्यावरील 'जयश्री' चालत होत तेंवा या रील्याक्स च नाव तरी माहित होत का कुणाला? हे हॉटेल वाईट आहे असा म्हणत नाही मी परंतु 'जयश्री' पण मस्त होत.
On 8/4/2010 1:51 PM Jay said:
सर्व पाव भाजी प्रेमीना, जर खरच पाव भाजी खायचं असेल तर औरंगाबादला क्रांती चौकात या... तिथे पाव भाजी खाल्या नंतर जगात कुठे हि गेलात तरी या पाव भाजी ची चव तुम्ही विसरू शकणार नाहीत...
On 8/4/2010 12:26 PM Paddy said:
जरी मी पुणेकर असलो तरी मी ह्या पाव भाजी ला जास्तीत जास्त ५ मार्क देवू शकतो. बेस्ट पावभाजी एवर होती सरदार पाव भाजी. कोणीही पाव भाजी शौकीन नि इकडची पाव भाजी खावी. मुंबई मध्ये ताडदेव ला आहे. open challenge.....
On 8/4/2010 12:16 PM Rahul said:
RELAX ची पावभाजी म्हणजे Number one इन पुणे कोथरूड ला लवकर ब्रान्च सुरु करा . eagerly waiting .
On 8/4/2010 11:54 AM Sanipi said:
कोणाविषयी काही वाईट बोलायचे नाही,कृपा करून गैरसमज करून घेऊ नये. इथली पावभाजी चांगली आहे.पण इतर अनेक हॉटेल्समध्ये यापेक्षा हजार पटीने भारी पावभाजी मिळते. प्रीती ज्यूस बार,सारसबाग इथली पावभाजी आणि मसालापाव relax च्या पावभाजीला कुठेच मागे सोडेल.२०/३० वर्षांपासून चालू आहे म्हणजे भारी का?
On 04-08-2010 09:48:04 girish said:
Its Very Good For helth Thats nice
On 8/4/2010 9:04 AM sneha said:
यमी !!!!!!! पावभाजी आणि ती पण रेलक्ष ची असा आईकाल तरी तोंडाला पाणी सुटत खच अप्रतिम असते..............
On 8/4/2010 7:03 AM Deshpande from USA said:
खरच मस्त असते इथली पावभाजी ... खूप वर्ष झाली खाऊन .. आता इंडिया ट्रीप चा वेळी नक्की खाणार .... आणि हो जयश्री ची चांगली असते ..पण इथे खमंग मध्ये मोठ्या हॉटेल बद्दल नाही छापून येत .. नाहीतर परत लोक comment करायला मोकळे ..पैसे घेऊन चापले का वगेरे ... आणि पावभाजी खायला जवळचा जवळ relax मस्त आहे ..
On 04/08/2010 03:33 sarang said:
मला विटी ची पाव भाजी आठवली. ती मोठ्या तव्यावर भरपूर लोणी टाकून त्यात पाव भिजलेले आणि भाजी बरोबर सुद्धा लोणी, मस्त लुसलुशीत पाव आणि भाजी, लई भारी.
On 04/08/2010 01:55 sarang said:
The Most Ordinary Hotel !!! The most Ordinary Taste !!! Still its the best just because its in Pune !!! कूपमंडूक पुणेकरांना कोणी तरी सांगा हो !!!
On 8/4/2010 1:30 AM Suhas said:
Please New Sangvi yethe Relax chi branch lavkar chalu kara
On 8/4/2010 1:16 AM Beena said:
Here in Chicago at Devon Street there are various Indian restaurants, we get everything Pav Bhaji, Dosa, Vada, Idli …authentic desi food...When you are around Chicago please stop by at Devon Street…to enjoy delicious Indian food .. Thank You
On 8/4/2010 12:51 AM punekar said:
relax is pretty ordinary... used to go there 8-9 years back.
On 04/08/2010 00:15 sumedha said:
relax माझे favourite आहे! इंडिया ला आले कि पहिली चक्कर relax ला!
On 8/3/2010 8:31 PM vijay said:
Very pleased to read and see the photograph of PAV-BHAJI of RELAX. I had a previlage of testing d PAV-BHAJI way back in 1988 and again in 2010. There was no difference in the test. That is the secret behind the success of the management. I wish Mr. Nitin Gosavi and his Son Mr.Viraj all the best.
On 03-08-2010 19:18:15 umanand@dubai said:
मस्त. रिलॅक्‍स च्या सुरवाती पासून आम्ही खात आलो आहोत. चव अजून तीच आहे. पुडच्या भारत भेटीत नक्की खाणार. ALL THE BEST.
On 8/3/2010 5:08 PM Swapnil said:
आम्ही इन्जिनीअरिन्ग ला असताना रोज रात्री १२ वाजता कॉफी प्यायला जायचो बिबवेवाडी च्या रीलाक्स वर... रात्री १-१.३० वाजे पर्यंत उघडे सापडणारे हॉटेल म्हणजे रीलाक्स... पी. एल. मध्ये रात्री १२.३० वाजता इथली कॉफी प्यायल्या शिवाय आमचा अभ्यास पुढे साराकायाचाच नाही... इथली पाव भाजी तर छानच आहे, पण इथला दाल तडका (स्पाईसी) ट्राय करून बघा... जन्मात न विसरता येण्या सारखी टेस्ट आहे... थंक यु सकाळ, जुन्या दिवसांची आठवण करून दिल्या बद्दल...
On 8/3/2010 4:32 PM malak,Melbourne said:
एकदा भारतात आल्यावर try करायलाच पाहिजे....
On 8/3/2010 4:29 PM sonu said:
Ha राजश्री Chal aapan jau.
On 8/3/2010 4:25 PM manjusha said:
खरच june divas athavale. ani kharokhar espresso coffee farach chhan ahe.
On 8/3/2010 4:20 PM ashu said:
या मस्त थंड पावसात गरम गरम पावभाजी वाः विश्वनाथ काय कल्पना आहे भन्नाट...
On 8/3/2010 4:07 PM अमेय जांभेकर said:
@ Kedar मुंबई मध्ये सगळ्यात फेमस म्हणजे CST स्टेशनच्या बाहेर 'कॅनन'ची पावभाजी
On 8/3/2010 3:20 PM Ishwar Kashid said:
relax chi pav Bhaji + Tava Pulav + Cold Cofee. Hey Samikarn Lai bhari ahe ekda nakki jaun ya ... agdi Ratri 12 la jaun khanyat maza kahi aurch. Khup Maza keli amhi
On 8/3/2010 3:17 PM khavaiyya said:
खरेच इथली पाव भाजी आणि तवा पुलाव फारच छान असतो. प्रत्येकांनी इथली टेस्ट नक्कीच घेतली पाहिजे.
On 8/3/2010 2:55 PM kedar said:
पुण्यात १ ) रौनक पाव भाजी - काका कुवा mansion २) शिव सागर - जंगली महाराज रोड ३) जयश्री - टिळक रोड ४) गिरीजा - टिळक रोड तर मुंबईत १) सुखसागर - चौपाटी २) सद्गुरू - चेंबूर स्टेशन इथे उत्तम पाव भाजी मिळते. मुंबईत अजून कुठे मिळते हे बाकी कुणी खवैय्ये प्लीज सांगा.
On 8/3/2010 2:31 PM राजश्री said:
मला कोण खावू घालणार ???
On 8/3/2010 2:25 PM Gaphur said:
pav bhaji mhanje relax sch hooooooooooooo..............
On 8/3/2010 2:04 PM patron said:
wah मजा आली वाचून. पुण्यात असताना Relax च्या पाव भाजीची चव चाखली नाही असा एकही महिना जात नाही. college च्या वेळचा हा आमचा अड्डा पण अजूनही कोणीतरी ओळखीचा भेटतच relax ला. पाव-भाजी, तवा पुलाव, पिठलं भाकरी, कॉफ्फी, कोल्ड कॉफ्फी, मसाला पाव एकदम तोडच नाही!
On 8/3/2010 1:50 PM patron said:
wah मजा आली वाचून. पुण्यात असताना Relax च्या पाव भाजीची चव चाखली नाही असा एकही महिना जात नाही. college च्या वेळचा हा आमचा अड्डा पण अजूनही कोणीतरी ओळखीचा भेटतच relax ला. पाव-भाजी, तवा पुलाव, पिठलं भाकरी, कॉफ्फी, कोल्ड कॉफ्फी, मसाला पाव एकदम तोडच नाही!
On 8/3/2010 1:37 PM vivek said:
ह्या पेक्षा ही चविष्ट पाव भाजी इतरत्र मिळतात .. कौतुक करावं.. पण तुलना नको .. बर्याचदा दहा लोकांनी डोक्यावर घेतल कि अकरावा ही घेतो.. स्वत:ची अक्कल गहाण टाकून.. कारण आपण एकटेच वेगळं काही बोललो तर उगीच लोक आपल्यालाच चिडवतील .. त्या पेक्षा म्हणून टाका 'लई भारी' .. इथली पाव भाजी नक्कीच चांगली असते.. पण फार भारी वगेरे नसते..
On 8/3/2010 1:28 PM Puneri said:
Relax पेक्षा जयश्री टिळक रोड ची पाव भाजी खूपच स्वादिष्ट , छान, नैसर्गिक, आणि रुचकर आहे.
On 8/3/2010 1:13 PM Pipers said:
Bibewadi cha DAL TADKA relax madhe Awesome!!! milto!!! Bibwewadicha relax suddha cchan aahe!!
On 8/3/2010 12:51 PM dhumukkk said:
बाकी सुधा पुण्यात काय काय मस्त मिळत ते लिहा कि राव कल्पनाची भेल खाल्ली आहे का टिळक रोडची ती गणेश भेल kalyan भेल कल्पनाच्या आसपास पण फिरकत नाही. मी रेलक्ष्चि पभाजी नाही खाली पण यम्मी म्हणावी अत्वणीत rahavi बह्जी या जगात आहे जुहू चौपाटीची पाव्भाई जी मी लहान असताना एकदा खाली होती
On 8/3/2010 12:46 PM Amrut said:
बेडेकरांची मिसळ: नारायण पेठ श्री उपहागृह ची मिसळ: सदाशिव पेठ प्रभा विश्रांती गृह चा बटाटे वडा, साबुदाणे वडा: नारायण पेठ सुजाता मस्तानी: सदाशिव पेठ गिरीजा भेळ: टिळक रोड जयश्री पाव भाजी: टिळक रोड वाडेश्वर ची इडली आणि पराठा भाजी असे अनेक ..
On 8/3/2010 12:45 PM suresh_topkar said:
मी रेलक्ष चा आणि डांगी patice चे पत्ते लिहून ठेवलेत . बघूया कधी योग येतोय कोल्हापूरहून जायला .
On 8/3/2010 12:01 PM som said:
हडपसर, मगर पट्टा येथे S Kumar वडा-पाव एक number मिळतो. त्याची सुद्धा दखल घ्या.
On 8/3/2010 11:48 AM FZ said:
हडपसर मध्ये चांगले हॉटेल्स नाहीत हे हडपसर वासियांचे दुर्दैव आहे. कृपा करून हडपसर ला हॉटेल टाकता आले तर बघा.
On 03-08-2010 11:31:33 विलास सरगर said:
आपण खमंग मध्‍ये पुण्‍याच्‍या रिलॅःक्‍सची ओळख खवैय्यांसाठी आपल्‍या खमंग मध्‍ये करुन दिलीत, त्‍याबद्दल धन्‍यवाद. आम्‍ही पुण्‍याला कायमचे राहण्‍याचा विचार करत आहोत, आपल्‍या एवढया स्‍तुतीने आम्‍ही या रिलॅक्‍सची निवड आमच्‍या आवडीच्‍या हॉटेलमध्‍ये केली आहे. त्‍यामुळे आम्‍ही पुण्‍याला आल्‍या आल्‍या पहिल्‍यांदा रिलॅक्‍सची पाव भाजीच चाखणार.... वाह.... क्‍या बात है!‍
On 8/3/2010 10:25 AM Dheeraj said:
The taste of Pavbhaji at Relax is really excellent. If they could improve upon the quality of water served there i.e. instead of normal water if filtered water is served, it will be really great.
On 8/3/2010 10:11 AM Onkar said:
Relax chi Pav Bhaji is THE best!! Me and my friends are regular Relaxees :) Apart from Pav Bhaji all other food is also verry testy!!
On 8/3/2010 10:07 AM Marathi Wachak said:
सहकारनगर मधील असेल पण बिबवेवाडी भागातील relax एवढे खास वाटले नाही...
On 8/3/2010 10:04 AM Shailesh Limaye said:
घराजवळच असल्याने मी अनेक वेळेला गेलोय इथे! येथील पिठलेभाकरी सुद्धा उत्तम असते.
On 8/3/2010 9:48 AM harsh said:
हे सदर वाचताना आणि मुख्य करून प्रतिक्रिया वाचताना मला पु ल च्या 'मुंबईकर पुणेकर आणि नागपूरकर ची आठवण येते. पुणेकर होण्यासाठी तुम्हाला पुण्यातील एखाद्यातरी गोष्टीचा जाज्वल्य स्वाभिमान असला पाहिजे, मग ती गोष्ट मिसालेपासून ते पार गल्लीपर्यंत. ती गोष्ट प्रतिक्रिया वाचल्यानंतर चटकन ध्यानात येते. हे पुणेरी पदार्थ चविष्ट असतिल हि परंतु हि चव पुण्याबाहेर हि गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर ह्याचे branding झाले पाहेजे. p.s मी पुणेकर नाही, मराठवाडामधला आहे, बर्याच वर्ष्यापासून U S मध्ये आहे,
On 8/3/2010 9:27 AM Ek Shubhchintak said:
पण दर खूप आहेत ते सामान्य लोकांना परवडण्यासारखे नाहीत. टेस्ट तर खरच भन्नाट आहे तिथली पण दर जर कमी केले तर आणखी फायदा होईल सगळ्याच खावायांना.
On 8/3/2010 8:52 AM TruptiD said:
त्यादिवशी सहकारनगर ला गेले होते तेव्हा हे हॉटेल मी पहिले होते. आता पुन्हा जाऊन तिथे पाव भाजी खायला हवी :). Thanks सकाळ!!!
On 8/3/2010 8:36 AM Sameer Abhyankar said:
It is really a great pleasure to see this article. This is a fact that Mr. Nitin has taken tremendous efforts to reach this stage. we wish him best wishes for his future.
On 8/3/2010 7:49 AM makya said:
I Like it !!
On 8/3/2010 7:29 AM Sanjay Godbole said:
I like pav bhaji very much. But I am always eat it at home only . But I defenately tried at relax at once. I like pulav too.
On 8/3/2010 7:04 AM Amrut said:
विश्वनाथ गरुड यांनी परत एकदा पुण्याबाहेरील लोकांना त्रास द्यायला सुरवात केलेली आहे
On 8/3/2010 6:57 AM Shaukin, USA said:
Esakal, when will you publish on Bedekar misal..?You cant miss this man..! Also dont forget to write the incidence where the workers@bedekar went on strike, he laid them off(no salary hike) and made it self service..! This is the real Puneri zatka-dont miss this folks..! I think it's the 4th Bedekar generation now..
On 8/3/2010 6:41 AM Mandar said:
कोथरूड मध्ये लवकर शाखा चालू करा ऑल द बेस्ट.
On 3/08/2010 6:32 AM Manisha said:
ha lekh vachun aj punha ekda "Relax" chya athvani tajya jhalya!! Amcha sagla college life ikdech gela! Ghar sahakarnagar No1 madhe jaicha rasta hacch. nidan ithli expresso pyayla thamna vhaychach!! vah lajavab!! ata geli 6 varsha pardeshi ahe so nahi jana jhala...pan athvani matra nakki tajya jhalya!
On 8/3/2010 6:03 AM kdchitnis said:
धन्यवाद' रिलॅक्‍सची ओळख करून दिल्याबद्दल.चांगल्या चवीची ठिकाण शोधावी लागतात. अस्सल खवय्ये उदराग्नी शमवण्यासाठी कितीही अंतर कापायला तयार असतात.मात्र ठिकाण शोधायला आधी तपस्या करावी लागते कित्येकदा भ्रमनिरासही होतो पण त्याला इलाज नाही. 'रिलॅक्‍स आमच्या घराजवळ असून माहित नव्हते!आता आश्रयाला जाणे आले!पुण्यात हॉटेलमध्ये खाण्याची संस्कृती फोफावली आहे इतकी की काही घरांमध्ये रात्रीचे जेवण शिजत नसावे अशी शंका येण्याएव्हडी हॉटेले गच्च भरलेली असतात. पुन्हा एकदा धन्यवाद.
On 8/3/2010 5:04 AM Gaurav said:
येथे उत्तम पाव भाजी आणि मसाला पाव मिळतात आणि कॉफ्फी पण मस्त असते. आम्ही कॉलेज मध्ये असताना नेहमी जात असू.
On 8/3/2010 4:50 AM Amit said:
वा क्या बात है! Relax ची पाव भाजी आणि तवा पुलाव, आरे मला वाचतानाच तोंडाला पाणी आले रे. मी कित्येक वर्षे तिथे जावून पाव भाजी आणि पुलाव खायचो. रात्री १२ ला पण काही खायचे ठिकाण म्हणजे Relax. आम्ही काही मित्र almost दररोज रात्री ११.४५ ला तिथे जायचो. भन्नाट दिवस होते ते. धन्यवाद Relax च्या पाव भाजीचे दर्शन दिल्याबद्दल.
On 8/3/2010 3:57 AM RK said:
आता पर्यंतच्या खमंग पेक्ष्या यावेळचे वेगळे आहे हॉटेल निवडले आहे
On 8/3/2010 3:24 AM Yogesh said:
'खमंग' वर नवीन एन्ट्री पाहून आनंद झाला. बरेच दिवस वात पाहत होतो. 'Relax' च्या पावभाजी चा फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं. तिथला मसाला पाव पण मस्त आहे !


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: