Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

रात्री बुजविलेला खड्डा सकाळी दिसला नाही पाहिजे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 12, 2010 AT 01:00 AM (IST)

मुंबई  -  आज रात्री बुजविलेला खड्डा उद्या सकाळी पुन्हा खणलेला दिसला नाही पाहिजे इतके मजबूत काम कंत्राटदारांच्या पाठीशी लागून करून घ्या, असा सज्जड इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला. मलेरिया व साथीचे आजार वाढू नयेत म्हणून आपापले वॉर्ड स्वच्छ ठेवा, पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरा, प्रशासनाशी पाठपुरावा करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

रस्त्यांवरील खड्डे आणि मलेरियावर चर्चा करण्यासाठी उद्धव यांनी आज महापौर निवासस्थानी बैठक घेतली. महापौर श्रद्धा जाधव, पालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, केईएमचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे, सभागृहनेते सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. मुंबईच्या स्वच्छतेसाठी म्युनिसिपल मजदूर संघ व भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधींनाही पाचारण करण्यात आले होते.

मलेरियाचा जोर आता ओसरत चालला आहे; पण तापाची साथ अद्याप कायम आहे. त्यासाठी मुंबईची साफसफाई आवश्‍यक असून आपण नगरसेवकांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात जाऊन औषधांचा साठा पुरेसा आहे की नाही याची माहिती घ्या. धूरफवारणीकडे व्यवस्थित लक्ष द्या यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाला लावा, असे उद्धव यांनी सांगितले. साथीच्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी पालिका रुग्णालये दुथडी भरून वाहत असताना सरकारी रुग्णालये मात्र ओस पडली आहेत. याचा अर्थ मुंबईकरांचा विश्‍वास पालिकेवर आहे सरकारवर नाही हे स्पष्ट आहे, असा टोला त्यांनी मारला.

अधिकारी उद्धव ठाकरेंना  चुकीची माहिती देतात तेव्हा...
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पाच लिटर पाण्यात किती एमएल ऑईल टाकले म्हणजे डासांना अटकाव करणारे औषध प्रभावी ठरेल? धूरफवारणीच्या जड पंपाऐवजी वजनाने हलके पंप कर्मचाऱ्यांना दिले तर चालतील काय? अशी माहिती कीटकनाशक विभागाचे प्रमुख अरुण बामणे यांना विचारली. त्यावर बामणे यांनी सध्या एमएल ऑईलचा साठा आणि इतर माहिती देत मूळ प्रश्‍नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा अश्‍विनी मते यांनी अधिकारी दिशाभूल करीत असल्याचे सांगून "उद्धवसाहेबांना वस्तुस्थिती देणारी माहिती सांगा. चुकीची माहिती देऊ नका' असे सुनावले. मात्र बामणेंकडे त्याचे उत्तर नव्हते.
 
 
प्रतिक्रिया
On 24/08/2011 11:31 PM parasnath said:
दुपारी दिसला तरी चालेल.मुनिसिपल कमिशनर,इंजिनिअर्स काय BMC मध्ये नाहीत.नागरासेवांचा आणि खड्डे दुरुस्तीचा संबध काय?उह्या सोनियाने म्हणायचे रेल्वे रूळ व्यवस्तीत ठेवा,मध्य प्रदेशात गडकरींनी सांगायचा पूल मजबूत ठेवा,सारवाज्निक मुताऱ्या स्वच्छ ठेवा.नोकरशहा कशासाठी आहेत जर लोकप्रतिनिधी ह्या नाक खुपसणार असतीलता? केंद्राविरुध्दा भांडा.ममता बनेर्जी बंगाल राज्य कर्मचार्यांच्या पगारावाधीकारिता मानामोहानासिंघ्न यांना पैसे मागते.लोकाच्या कल्याणाकरिता केंद्राशी झगडा.महाराष्ट्रात दुष्काळ आहे,अतिवृष्टी आहे.
On 09/04/2011 11:52 PM M N Dhokale said:
अधिकारी दिशाभूल करीत असतील तर वेळीच सुनावने आवश्यक असते आरोग्य समितीच्या अध्यक्षा अश्‍विनी मते यांनी बमानेना वेळीच सुनावल्या बध्ढाल अश्‍विनी मते यांचे अभिनंदन


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: