Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आकाशभरारी - गिरीश ठकार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 12, 2010 AT 12:45 AM (IST)
देवावरील श्रद्धेनेच संकटावर मात
मुंबईच्या व्हीजेटीआयमधून 1982 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचा विचार घोळत होता. परंतु खर्चाचा प्रश्‍न उभा होताच. वडील वकिली व्यवसायात. आई-वडिलांनी अपार कष्ट करून बी. ई.पर्यंतचे शिक्षण व्यवस्थित पार पाडून दिल्याने त्यांच्याकडे उच्च शिक्षणाचाही अपार खर्च मागणे घरच्या परिस्थितीमुळे शक्‍य नव्हते. शैक्षणिक गुणवत्तेमुळे नोकरीची संधीही उभी होती. तेव्हा ताबडतोब नोकरी धरली. सहा महिन्यांतच दुबईला जाण्याची संधीही मिळाली. तिथे आलेला एक अनुभव खटकला. माझ्याएवढेच शिक्षण असलेल्या इंजिनिअर्सना केवळ अमेरिकन किंवा ब्रिटिश डिग्री होती, म्हणून तिप्पट पगार होता. मग ठरवले, की अशी पदवी मिळवायचीच. दोन वर्षे आखाती देशात काम करून एका वेळेच्या विमानाचे भाडे व एका सेमिस्टरपुरते पैसे वाचवून अमेरिकेतील ओकलाहोमा येथील युनिव्हर्सिटीमध्ये येऊन धडकलो. निघताना अमेरिकेत स्थायिक असलेल्या परिचित व्यक्तीने उद्‌गारलेले शब्द कानात घोळत होतेच.... "वेळी कपबश्‍या, भांडी विसळून किंवा पिझ्झा शॉपमध्ये काम करण्याची तयारी असेल तरच हे धाडस कर!' त्या भीतीने म्हणा, की नामुष्की पदरात येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करणे हा एकमेव मार्ग डोळ्यासमोर दिसू लागला. कॉलेज सुरू झाल्यावर दुसऱ्याच दिवशी कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी पचवणे व पैशाअभावी परत जाऊ न शकणे, या गोष्टी मनावर विलक्षण आघात करून गेल्या. दुसऱ्या देशात, दुसऱ्या भाषेत, अपरंपार थंडीत, मायेची व आप्तजनांची ऊब नसताना, वेळी-अवेळी न आवडणारे पदार्थ खाऊन किंवा उपाशी राहूनदेखील केवळ अभ्यासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याने आणि देवावरील व आई-वडिलांवरील श्रद्धाच या सगळ्या संकटांवर मात करू शकली. कडक थंडीमध्ये व सवय नसलेल्या बर्फावर सपशेल पाय घसरून पडल्याच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. शेवटची बस चुकल्यावर थंडी-बर्फात लायब्ररीतून घरी एक-दीड मैल चालत जाण्याची सवयच झाली होती. या सगळ्या जिद्दीमुळे व कष्ट व मार्क्‍स बघून सेमिस्टर संपायच्या दोन महिने आधीच माझ्या प्रोफेसरने स्कॉलरशिप देऊ केली तेव्हा आनंदाला सीमा नव्हती.

उच्च शिक्षणापाठोपाठ साहजिकच नोकरीच्या मोठ्या संधी चालत आल्या. या संधी स्वीकारतानाच स्वतःच्या व्यवसायाची संकल्पना घट्ट होत होती. फायदेशीर गुंतवणूक करण्याचा सल्ला देणारी स्वतंत्र कंपनी अमेरिकेत पिट्‌सबर्गमध्ये सुरू केली. आज अनेक प्रथितयश व मान्यवर व्यक्तींचा, तसेच संस्थांचा आर्थिक सल्लागार म्हणून कामगिरी पार पाडत असतानाच पुण्यातील नवम, आपले घर, जीवनज्योत इत्यादी संस्था व दापोलीतील श्री साईमहाराज ट्रस्ट या धर्मादाय संस्था, तसेच अमेरिकेतील कित्येक चॅरिटेबल संस्थांना आर्थिक मदत करून सामाजिक कार्यातदेखील सहभागी होतो आहे. अशाच एका अमेरिकेतील मान्यवर सामाजिक संस्थेने बृहन्‌ महाराष्ट्र मंडळ, अमेरिका याचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही मिळाला.

('आकाशभरारी' मालिकेतील यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी 'ई सकाळ'च्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा akashbharari)
 
प्रतिक्रिया
On 19/12/2010 11:07 AM Girish Nille said:
I am proud of your success and attitude, I hope, I am also will do such type of achievement
On 20/09/2010 04:57 PM Santosh Narvekar said:
मेहनत रंग लाती है......
On 9/16/2010 5:48 AM s.w.fadnavis said:
Dear Girishji, I am very proud of your achievement.Probably you may not remember me at the moment but I remembered you very well. I am Secretary of 'Apala Ghar' at Pune.Presently I am staying with my son-in-law at San Ramon,SFO.I talked to Vijay Phalnikar on reading your article and felt very much that I should respond to you. I wish you all the success in future. We shall meet sometime in Pune.
On 9/9/2010 9:30 AM Kishor Shende said:
It is very difficult to reach at this position where u are those who have gone through only can understand. As u said we can survive with these pressures only with blessings of Parents .Great - Kishor Shende
On 8/15/2010 8:44 PM Girish Thakar said:
Swapni, Swarada, and others, तुम्ही मला gsthakar@gmail.com वर contact करू शकाल. - गिरीश ठकार
On 8/15/2010 7:23 PM Balasaheb said:
Such accomplishments of persons who became successful in adversity are numerous. But I find stories of achievements by Prakash & Mandakini Amte, Dr. Vikas & Mrs. Amte, Drs Ajay & Rani Bangs and Dr. Bawaskar much more inspiring. May be it is time to compile suh stories and make them available to the younger generation.
On 15/08/2010 16:07 swapnil dhaykar said:
YOU ARE SOURCE OF INSPIRATION FOR MANY STRUGGLING INDIAN STUDENTS . PLEASE GIVE E MAIL ID.
On 8/15/2010 12:20 AM ANand said:
Girish, Thank you for sharing your story. You might understand as well as help out similar marathi people coming to US who undergo such stuggle. This is also inspiring to those who want to hang on and go ahead in US.
On 8/14/2010 10:22 AM Swarada Chitnis said:
Really inspiring article for graduating mechanical engineers like us.. Can you please give your email id?
On 8/12/2010 10:27 PM pallavi said:
inspiring... कष्टांना पर्याय नाही, हे खरे आहे.
On 8/12/2010 7:56 PM SUHAS said:
घ्या, आणि मी सकाळी लवकर उठून कामाला जावे लागते म्हणून वैतागत असतो...खूपच प्रेरणादायी आहे तुमचे यश..अभिनंदन
On 8/12/2010 4:57 PM rajaram bhise. said:
तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.तुमचा आम्हाला अभिमान वाटतो ...
On 8/12/2010 4:04 PM Prachi Nikam said:
अभिमानास्पद ...... खरच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
On 8/12/2010 3:57 PM Prasad said:
Is this hard work really a big deal - going in snow and all. In India we go on scooter with a family of 4 in 40 Deg C and no one talks about it! Living in India itself is a far bigger challenge - competition is much tougher - So people, respect people living in India much more.
On 8/12/2010 11:56 AM go ahead said:
तुमचा आम्हाला अभिमान वाटतो ...
On 8/12/2010 10:27 AM chandrakant said:
खरी लढाई इथे आसते ....जीवना मध्ये अपार कष्टा शिवाय मजाच येत नाही.....आशीच प्रगती करत राहो हीच श्री कडे ईश्चा ........काळजी घ्या...
On 8/12/2010 10:04 AM जनार्दन चिंचपोकळीकर said:
गिरीश, तुझे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.. म्हणून करतच नाही. का रे पण एक गोष्ट सांग.. असं कुठल्याही शहरात जाऊन धडकल कि त्या शाळेत प्रवेश मिळतो का रे? कि आधी विनंती करावी लागते? तू पूर्ण आणि विस्तृत नाही का लिहू शकत? आम्हा लोकांना त्याचा फायदा होईल. तू अजून शिक आणि भारदस्त हो हीच माझी इच्छा. अजून काय.
On 8/12/2010 8:38 AM Amit said:
Hats Off to you !!!
On 8/12/2010 7:12 AM rahul said:
तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
On 8/12/2010 3:55 AM Raj said:
Did not elaborate about the business and how you managed it. How big is your company now.
On 12/08/2010 02:22 Udarmatwadi said:
स्वतः साठी पैसे मिळविण्यासाठी परदेशी जाणाऱ्या लोकांच्या कथा आपण नेहमीच वाचतो पण हा मनुष्य स्वतः बरोबर धर्मदाय संस्थांना मदत करतो हे विशेष आहे. प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देऊन हे ठकार साहेब उच्चपदी पोहोचले हे आम्हा तरुण व्यावसायिकांना प्रेरणादायी आहे.
On 8/12/2010 1:05 AM sameer said:
तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तुमच्यासारखी लोकं लक्षावधी लोकांची प्रेरणास्थाने आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: