Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अमिताभ बच्चन हेच माझे गुरू - रजनिकांत
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 16, 2010 AT 11:58 AM (IST)
मुंबई - खरं तर दाक्षिणात्य चित्रपटरसिकांच्या मनातला तो देव, पण चित्रपट क्षेत्रात तो बिग बी अमिताभ बच्चन यांना आपला गुरू मानतो. नव्हे, तर अमिताभ त्याचे प्रेरणास्थान.

दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीवर राज्य करणारा रजनिकांत अमिताभ यांच्याविषयी भरभरून बोलतो, तेव्हा तो माणूस म्हणूनही किती मोठा आहे, याचा प्रत्यय येतो. रजनिकांतच्या बिगबजेट रोबो या चित्रपटाचे संगीत रविवारी रात्री लॉंच झाले. त्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील या दोन्ही दिग्गजांना रंगमंचावर एकत्र पाहण्याची संधी रसिकांना मिळाली. रजनिकांतने तब्बल तीन वर्षांनंतर मुंबईत पाऊल ठेवले.

नव्वदच्या दशकांत झळकलेल्या हम या चित्रपटात अमिताभ आणि रजनिकांतची जोडी रसिकांनी एंजॉय केली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो आपल्या शिवाजी द बॉस या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी मुंबईत आला होता.

रोबो संगीत लॉंचच्या निमित्ताने अमिताभ यांना भेटून आनंदीत झालेला रजनिकांत त्यांच्याविषयी भरभरून बोलला. तो म्हणाला, अमिताभ हे माझे प्रेरणास्थान आहेत. तसेच, ते माझे रोल मॉडेल आणि गुरूही आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मी नेहमीच आदर करतो. अंधा कानून, गिरप्तार आणि हम या चित्रपटांमधून आम्ही दोघांनी एकत्रित काम केले. त्यावेळी त्यांनी मला जे प्रेम दिले. माझी जी काळजी घेतली, ती मी कधीही विसरणार नाही.

रजनिकांत यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमिताभ यांनी रजनिकांत इथल्या मातीचे सच्चे सुपूत्र असल्याची भावना व्यक्त केली. मी रजनिकांतबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे एक मित्र म्हणून आणि एक सहकारी म्हणून मला त्याचे महत्त्व वाटते. तो या मातीचा सच्चा सुपूत्र आहे, ज्यावर सर्व भारतवासी प्रेम करतात.

त्याची नम्रता आणि माणुसकीबद्दल मला कौतुक वाटते. त्याला मिळालेले प्रसिद्धी, मोठेपणाचा त्याने जमिनीवर राहूनच आनंद लुटला. त्याच्यातील नम्रता प्रत्येक भारतीयाने उदाहरण म्हणून डोळ्यासमोर ठेवण्याजोगी आहे. त्याच्या साधेपणाचा, प्रामाणिकपणाचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे, असेही अमिताभ म्हणाले.

हॉलिवूडच्या धर्तीवर रोबो हा चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेला चित्रपट आहे. जेव्हा एखादा रोबेट माणसाच्या शरीरात शिरकाव करतो, तेव्हा काय काय होते, याचे चित्रण या चित्रपटात केले आहे.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 01/07/2011 05:27 PM nitin said:
अमिताभ ला येते तरइ काय यार ! लोन्कानीच त्याला अमिताभ अबिथाभ करून वर आणला आहे'..... काय तर म्हणे अमिथाभ... म्हन्तारा कुठलां
On 02/10/2010 12:35 PM Ashwin said:
Rajni ki to kuch baat hi nirali hai, jai maharashtra'
On 28/09/2010 03:10 PM Om said:
pratikriya detana-tika kartana ti jara hi vichar na karta dili jate...bindok panache aani knowleage nahi aahe-yachech pradarshan kartayet...he so cold tikakar...aso...
On 21/09/2010 09:42 PM dnyaneshwar said:
दोघामध्ये काही विशेस नाही .रजनीकांत मराठी असून मराठी नाही अमिताभ महाराष्ट्रात राहून कधी आपला वाटला नाही . सारी दुनिया (पैसे के लिय पागल) किती पैसा आहे आणि किती पैसा समाजसेवेसाठी दिला जातो .................................................
On 9/16/2010 2:58 PM Nikhil Nhalve said:
हि तर मराठी माणसा साठी अभिमानाची गोष्ट आहे आता कळेल कि मराठी माणसांचे संस्कार काय आहेत ते. कारण रजनीकांत सुद्धा एवढे मोठे कलावंत असून त्यांनी अमिताभ सारख्या फार मोठ्या कलावंताला फार मोठ पद दिलेलं आहे. अशा या दोन्ही कलावंताना आमचा सलाम.
On 9/11/2010 2:11 AM ganesh said:
not only rajanikant but also amitabh is good actor
On 9/6/2010 10:26 PM Sachin said:
Both are superstar of india no one can compete with them
On 9/6/2010 3:56 PM prashant gorakh said:
raj इस very पोपुलर फिल्म स्तर
On 9/3/2010 10:01 PM Santaji said:
रजनीकांत नि तमिळ भाषा शिकली आणि त्या भूमीशी एकरूप झाला. अमिताब तर महाराष्ट्र मध्ये ४० वर्ष राहून सुद्धा मराठी शिकला नाही. हेच दाखवते कि रजनीश अमिताभ पेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे उगीच ह्या उत्तर भारतीयांची प्रसंशा करू नका. अनेक मराठी कलाकार सुद्धा अमिताभ पेक्षा श्रेष्ठ आहेत. अमिताभ तर tax बुडवताना स्वताला NRI म्हणवतो आहे. पैसे कामावयासाठी कोणच्याही जाहिरातही सुद्धा करतो. हा कुठला आहे श्रेष्ठ नट . जय महाराष्ट्र.
On 9/3/2010 12:32 AM Raviprakahi pawar said:
अमिताब हे अमिताब आहेत आणि शिवाजी गायकवाड हे शिवाजी गायकवाड(रजनी )आहेत .................
On 8/28/2010 5:01 PM Rsantoshkumar said:
rajneekant and amitab is don in acting world.
On 8/27/2010 8:15 PM mrudul bhosalepatil said:
rajanikant is a great actor & we are proud that he is maharashtran.
On 8/27/2010 5:08 PM Rashmi Patil said:
let's try to change , why are we still in tags of state/ religion/ language ? They are great because they have struggled, they have taken efforts for years. Live and let live. Do not count their money , their charity. Nobodody stops nobody from any achivement.Humanity is the only greatest God of life. Be positive.
On 8/26/2010 8:45 PM suhas marathe said:
अमिताभ बच्चन हा फार मोठा कलावंत आहे त्याची तुलना कोणाशीच करू नये
On 8/26/2010 7:02 PM sunil kende said:
अमिताभ & रजनीकांत combination जबरदस्त आहे .
On 8/26/2010 3:36 PM mayuresh ( punekar ) said:
अहो गायकवाड साहेब अस काहीतरी बोलू नका , कुठल्यातरी तमिळ नटाच नाव घ्या .. नाहीतर तिकडे पिक्चर पडेल तुमचा , आधीच नाव बदलायला लावलय सिनेमाच .'रोबो'च 'इंधीर्ण' वगैरे केल्या अस ऐकलय.
On 8/26/2010 9:43 AM Ganesh Jadhav said:
नमस्कार शिवाजीराव तुम्हाला नवीन movie साठी हार्दिक शुभेछा...............
On 8/25/2010 3:28 PM ASHOK said:
मी पियू च्या मताशी सहमत आहे अमिताभ ने श्रेष्ठ अभिनेत्याबरोबर एक श्रेष्ट माणूस पण बनायला पाहिजे
On 8/25/2010 11:35 AM Piyu said:
अमिताभ एक खरा कलावंत असेल पण तो पक्का व्यवहारी आहे , या वयात देखील तो चांगले कमावतो आहे पण त्यातले १० % तरी दान करतो का ? समाजजागृती साठी वेळ देण्यापेक्षा चांगु मंगू जाहिराती करून पैसा कमावतो आहे, आपल्यासारखे त्यांना idol मानतात पण काय फक्त acting चा बादशाह आहे म्हणून जीवनात देखील काही तरी कर लोकांना क्रेझ आहे अमिताभची त्याचा चांगल्या कामासाठी निश्चीत वापर व्हावा, रजनीकांत कडे बघा सौउथ मधील लोक विनाकारण देव मनात नाही त्याला ,पण त्याला अजिबात गर्व नाही त्याचा
On 8/25/2010 10:34 AM Kashinath said:
रजनीकांत हा चांगला कलाकार आहे हे त्यांना माहित आहे.आणि सर्वाना माहित पण माहित आहे. व ते मला व माझ्या मित्रांना पण माहित आहे. आपला सोलापूर
On 8/24/2010 12:05 PM SKiran said:
"दोन हिरे भारतभुमीचे!"
On 8/24/2010 10:55 AM asmita said:
आणि सर्व मराठी लोकां तर्फे रजनीकांत एक मागणी कि त्याने एक तरी मराठी चित्रपट करावा....
On 8/24/2010 10:54 AM asmita said:
हे वाचून खूप आनंद झाला कि रजनीकांत हा एक अस्सल मराठी फामिलीत जन्मलेला आहे पण त्याची कर्म भूमी तामिळनाडू आहे आणि तो त्याच्या कर्मभूमीशी १००% प्रामाणिक आहे आणि म्हणूनच तिथले लोक त्याला देव मानतात...कारण त्याने जिथे जे कमावला ते त्या लोकांमध्ये शेअर पण केला तसा अमिताभ किंवा अन्य परराज्यातील कलाकारांचा नाहीये महाराष्ट्राने त्यांना मोठा केला पण हे गुण गातात ते त्यांच्या राज्याचे .... हे मान्य आहे कि ते आता इतके मोठे झालेत कि कोणत्या एका राज्याचे ते नाहीयेत तरी देखील त्यांनी कृतज्ञता तरी दाखवावी
On 8/23/2010 11:26 PM Parag Mahitkar said:
अमिताभ आणि रजनी चे एकदमच काय प्रेम उफाळून येत आहे? हे सगळे 'promotional stunts' आहेत.... खरी गोष्ट म्हणजे... जरी हे महापुरुष महाराष्ट्राशी संबंधित असले तरी त्यांनी एकाही मराठी चित्रपटात काम केले नाही .....
On 8/22/2010 5:06 PM Keshav said:
जय शिवाजी राव गायकवाड .....जय कोल्हापूर .!
On 8/21/2010 4:58 PM ajit said:
अमिताब्जी इस great
On 8/20/2010 11:31 PM ajay jodmote said:
रजनी ने महाराष्ट्रावर पण तेवढेच प्रेम केले पाहिजे आम्हाला रजनी च गर्व वाटतो . जय महाराष्ट्र
On 8/19/2010 9:30 AM shrikant said:
Rajinikanth was born as Shivaji Rao Gaikwad in a Maratha-family, mother Jijabai and father Ramoji Rao Gaekwad, on December 12, 1949 .Mind It
On 8/18/2010 6:59 PM satyawan awaghawde said:
दोगेही आपल्या जागेवर बरोबर आहेत आणी महान आहेत
On 8/18/2010 4:13 PM Ameya said:
रजनीकांत व अमिताभ दोघे खरे कलाकार आहेत आणि कलेला जात धर्म देश य्यची गरज नाही आपण सर्व भारतीय आहोत हे महत्वाचे आहे जय भारत
On 8/17/2010 7:54 AM Pramod said:
बादशाह खूप असतात, पण शहंशाह एकच असतो. अमिताभ बच्चन सर्वोतम्म. सगळ्याच बाततीत. He is best of the best . दोघेही चांगले मित्र आहेत. रजनी सरांचा मोठेपणा कि ते प्रेरणा स्थान म्हणून मानतात. आणि दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत रजनी सरांना खूप मानतात. पण शेवटी मराठी "गायकवाड" आहे. मराठी पण त्याच्या रक्तातच आहे. मला दोघांचा "हम" चित्रपट खूप आवडतो. जय महाराष्ट्र!
On 8/17/2010 6:34 AM Prasad B said:
त्याची नम्रता आणि माणुसकीबद्दल मला कौतुक वाटते. रजनीकांत एकदम ग्रेट माणूस !
On 8/17/2010 6:30 AM mamu said:
येक से भले दो! दो से भला येक! रजनी! Mind it!
On 8/16/2010 5:39 PM karadkhedkar ajay said:
अमिताभ व रजनीकांत हे आपपल्‍या भाषीक क्षेत्रात सर्वश्रेष्‍ठ आहेतच यात मुळीच वाद नाही.रजनीकांतचा हा मोठेपणा आहे. दोघांचा हम चित्रपट तर सर्वश्रेष्‍ट आहे.
On 8/16/2010 5:26 PM Ganesh said:
रजनीकांत खूप हा चांगला माणूस आहे - जय महाराष्ट्र
On 8/16/2010 5:25 PM yogesh said:
उत्तर प्रदेश येथून अमिताभ इकडे येऊ शोक्तो तर रजनीकांत ने दक्षिण मध्ये का जाऊ नये ?
On 16/08/2010 16:41 Marathi said:
मराठमोळा रजनीकांत! तिकडे कशाला गेलास? मराठी अभिमान नाही का तुला मित्रा?
On 8/16/2010 4:10 PM pallu said:
for your kind information रजनीकांत महाराष्ट्रातला नाही.
On 8/16/2010 3:23 PM s rsje said:
रजनीकांत गायकवाड आपल्या मुळ गावाला पुरंदरला एकदा तरी भेट द्या मराठी माणसाला बरे वाटेल .
On 8/16/2010 2:53 PM kanadev said:
जै रजनी देवा आणि जै अमिताभ.
On 8/16/2010 1:22 PM विश्वनाथ रूपे Vishwanath said:
अस्सल मराठ मोळा कलावंत रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) .. आम्हाला तुमचा आभिमान आहे ...
On 8/16/2010 12:19 PM Raj Patil said:
रजनी तू खरोखरच ग्रेट तर आहेच पण तेवढाच प्रामाणिक हि आहेस...!
On 8/16/2010 12:18 PM abhijeet said:
रजनीकांत & अमिताभ खरच सॉलिड आहेत दोघे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: