Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'समाजकार्यासाठी तरुणांचा पुढाकार आवश्‍यक '
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 23, 2010 AT 12:30 AM (IST)
टिळक स्मारक मंदिर - पुणे - 'समाज सध्या अनेक प्रकारच्या दुखण्यांनी त्रस्त झाला आहे. ती दूर करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्‍यक असून त्यासाठी सातत्याने सतर्क आणि गुणवत्तेचा आग्रह धरणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी केले.

साप्ताहिक लाल महालतर्फे शिवशाहिरांना "पुण्यरत्न जीवनगौरव पुरस्कार' वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरविंद सावंत, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, सतीश जावडेकर या प्रसंगी व्यासपीठावर होते.

पुरंदरे म्हणाले, 'सध्या तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य धोक्‍यात आले आहे. चांगल्या सवयी रुजविण्यासाठी सातत्याने तरुणांनी गुणवत्तेचा आग्रह धरायला हवा. आपल्या देशात झालेल्या महापुरुषांनीही वेळोवेळी तोच संदेश दिलेला आहे. समाजाची दुखणी दूर करण्यासाठी तरुणांचा पुढाकार आवश्‍यक आहे.''

धारिया म्हणाले, 'महाराष्ट्राचा इतिहास सर्व देशासमोर मांडण्याचे काम शिवशाहिरांनी केले आहे. समाजासाठी झटताना त्यांनी सदैव विचारांना कृतीची जोड दिली.''

पाटील म्हणाले, 'पुण्याचा चेहरामोहरा बदलला, वाडा संस्कृतीही नामशेष झाली; मात्र पुणेकर आजही इथली वेगळी संस्कृती टिकवून आहेत. पुण्याच्या वैशिष्ट्यांची पाळेमुळे खोल रुजलेली असल्याने त्याबाबतचा अभिमान वेगळा आहे.''

"पुण्यरत्न' ग्रंथाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. अरविंद सावंत, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. म. वि. अकोलकर, आबेदा इनामदार, निर्मला केंढे यांना "पुण्यरत्न पुरस्कार' पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मिलिंद काची, सचिन जामगे, आर्या आंबेकर आणि समर्थ प्रतिष्ठान यांना "पुण्यरत्न युवागौरव' पुरस्कार देण्यात आला.
- डॉ. आरती दातार यांनी सूत्रसंचालन केले.आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: