Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'कॅम्पस इंटरव्हू'चा धडाका (तो आणि ती)
विजय लाड (vijay.lad@esakal.com)
Tuesday, August 31, 2010 AT 01:47 PM (IST)

आर्थिक मंदीचे सावट ओसरल्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये मल्टिनॅशनल कंपन्यांनी "कॅम्पस इंटरव्हू'साठी अक्षरशः उत्साही धडाका लावला. कॉलेजचे नोटीस बोर्ड विविध कंपन्यांच्या जाहिरातींनी ओसंडून वाहू लागले. कंपन्यांनी आकर्षक पॅकेज ऑफर केले होते. सुवर्णसंधी दारात चालून येत असल्याची अनुभूती होत होती. त्या दोघांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी नावे दिली. त्यांनीही अनुकरण केले. बघू या पुढे काय झाले ते...

दुपारची वेळ. पण, नचिकेतच्या खोलीत रात्रीला साजेसे वातावरण. खिडक्‍यांचे लांबलचक पडदे पाडले असल्याने भिंतींचा रंग अधिक गडद झालेला. तो कॉटवर पालथा निजलेला. केवळ घड्याळ आणि सीलिंग फॅनची तेवढी हालचाल सुरू. तेवढ्यात मोबाईल गुणगुणायला लागला. डोळे किलकिले करून तो मोबाईल शोधायला लागला. टेबलावर... उशीखाली... खिडकीच्या कपारीत... आवाज येतोय खरा. पण, मोबाईल कुठे ठेवलाय हे त्याला झोपेच्या भरात समजत नाही. थोडंसं सावध होऊन त्यानं पुस्तकात ठेवलेला मोबाईल कानाला लावला.

"अरे हॅलो... आहेस कुठे तू... आज कॉलेजला का नाही आलास... आपल्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर पुण्यातल्या दोन मल्टिनॅशनल कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्हूसाठी नोटिसा लागल्या आहेत. तू नोटीस बोर्ड चेक केला होतास का?'' मिथिला अगदी घाईत मोठमोठे उसासे टाकत बोलत होती. तिला थोडी धापही लागली होती. तिने कॉलेजच्या पार्किंगमधूनच नचिकेतला फोन केला होता.

"अगं नाहीना... मी दररोज ठरवतो; पण माझ्याकडून नोटीस बोर्ड चेक करायचे राहूनच जाते आणि आज तर कॉलेजला जायचा जाम कंटाळा आला होता,'' नचिकेत डोळे चोळत म्हणाला.

थोडंसं सावरून तो बोलायला लागला. ""अगं... पण तू खरंच सांगत आहेस ना... नाही म्हणजे माझा तुझ्यावर विश्‍वास नाही, असा मुळीच गैरसमज करून घेऊ नकोस... पण, काही दिवसांआधीच कॅम्पस इंटरव्हूसाठी नोटिसा लागल्या होत्या ना...! आता पुन्हा नोटिसा लागल्या असतील, तर आपल्या बॅचची चांगली चंगळच आहे म्हणायची. थांब वेट कर मी आशय आणि ऋतुजाला कॉन्फरन्स कॉलवर घेतो. तू पप्प्या आणि प्रिंसेसला लाइनवर घे. त्यांनाही ही गुड न्यूज देऊयात,'' नचिकेत उत्साहाच्या भरात झोप गाळून बोलत होता.
त्यांनी ग्रुपच्या सर्वांना कॅम्पस इंटरव्हूची बातमी दिली.

त्या दिवसापासून त्यांनी कॅम्पस इंटरव्हूची कसून तयारी सुरू केली. एकमेकांना ऍप्टीसाठी मदत केली. कॉलेजच्या कॅन्टीनमधील वाफाळणाऱ्या कॉफीसह एकमेकांचे डमी जीडी-पीआय घेतलेत. कुणालाही ही संधी दवडायची नव्हती. त्यांचे रेझूमी आधीच तयार होते. तरीही त्यावर शेवटचा हात मारला. पप्प्यानं तर कॉलम्सची सेटिंग बदलून पाहिली. टेक्‍स थोडा एडिट करून बघितला. शेवटी आहे तोच रेझूमी बरोबर असल्याचे समजल्यावर डावा हात डोक्‍यावर ठेवून "अन डू'चा ऑप्शन वापरला.

"कॅम्पस इंटरव्हू'चे इन्चार्ज असलेल्या सरांना रेझूमी दिल्यावर त्यांनी अगदी परीक्षेचा पेपर सुटल्याच्या आर्विभावात सुटकेचा निःश्‍वास टाकला. एका मोठ्या संकटातून सुटल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. वातावरणातील ताण कमी करण्यासाठी कॅन्टीनला जाऊन गरमागरम वडापाव फस्त केला. त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्यांकडे बघून सुमार बुद्धी आणि बोजड शरीराचा पप्प्या म्हणाला, ""अरे काय हे चेहरे पडलेले. थांबा तुम्हाला एक मस्त चटपटीत पीजे सांगतो.''

सर्वांनी चेहरे वाकडे केले. मिथिला आणि ऋतुजाने तर कानावर हात ठेवले. पण, त्यांचे ऐकेल तो पप्पू कसला. त्याने जोक सांगायला सुरवात केली.
"हत्ती आणि मुंगी इंटरव्हूला गेलेत. हत्तीचे सिलेक्‍शन झाले. मुंगीचे का झाले नाही...? सांगा...? सांगा पाहू...?''
आशय म्हणाला,"मुंगीने जीडी-पीआयची तयारी केली नसेल.''
"नाही...'' पप्पू लागलीच म्हणाला.
नचिकेत, ""मुंगीने ऍप्टीच क्‍लिअर केले नसेल.''
"बिलकूल नाही...''पप्प्याने उत्तर उडवून लावले.
"मुंगी तुझ्यासारखी माठ असेल...'' ऋतुजाचे उत्तर ऐकून सगळे पोट धरून हसायला लागले.
"ऐ ऋतू... मार देईल हं... अरे सांगा ना उत्तर...'' पप्प्याने अगदी काकुळतीला येऊन विनंती केली.

शेवटी सगळ्यांनी पप्प्याला आग्रह केल्यावर तो म्हणाला, ""मुंगीचा रेझूमीच इंटरव्हूव्हरला वाचता आला नाही. कारण ती आकाराने ऐवढीशी, तर तिचे अक्षरं किती लहान असतील... आणि विशेष म्हणजे इंटरव्हूव्हने जेव्हा प्रश्‍न विचारले तेव्हा तिनं ऋतू आणि मिथीसारखे कानावर हात ठेवले होते. हाऽऽऽ हाऽऽ हाऽऽऽऽ''

पप्प्याचा पीजे ऐकून ऋतुजा आणि मिथिलाच्या चेहऱ्यांवरील हावभाव भराभरा बदलले. संतापाने डोळे लालेलाल झाले. पण तरीही पप्प्याचे संततधार हसणे सुरूच होते. त्याच्या कानाखाली एक द्यावी, असे दोघींच्या मनात येऊन गेले. पण त्याने जराही फरक पडला नसता. निगरगट्ट मनाच्या पप्प्यावर कशाचाच काही परिणाम होत नसे.

पप्प्याचे हसून झाल्यावर सर्वांनी घरचा रस्ता धरला.
शेवटी कॅम्पस इंटरव्हूचा दिवस उजाडला. सर्वांना धाकधूक लागली होती. आत्मविश्‍वास डळमळीत होत होता. कधी नव्हे ते त्यांनी भल्यापहाटे अंघोळी आटोपल्या. देवघरात जाऊन देवाचे नमन केले. नोकरी लागली तर हे करेल..., ते करेल... अशी चार, दोन बेगडी आश्‍वासने सोडली आणि लागलीच सगळे कॉलेजमध्ये जमले.

"अरे तुमची तयारी झाली का... मला तर रात्रभर झोप आली नाही. कुठला अभ्यास करावा तेच सुचत नव्हते. एक प्रश्‍न वाचला, तर दुसरा महत्त्वाचा वाटत होता आणि तो वाचायला गेलो, तर भलताच विचारला जाईल असे वाटत होते,'' पप्प्याने सर्वांच्या मनातली शंका प्रातिनिधिकपणे बोलून दाखविली.
त्यावर आशय म्हणाला, ""बघू रे काय होतंय ते... असे घाबरून थोडीच चालेल. जो डर गया सो मर गया... माहीत आहेना... मग... अरे भीतीवर मात करायला शीक. आपल्या सर्वांना हा इंटरव्हू क्रॅक करायचाच आहे. सर्वांनी अगदी प्रखर आत्मविश्‍वासाने सामोरे जायला हवे.''
"खरे आहे तुझे... सर्वांनी अगदी कॉन्फिडन्ट राहायचे... चला आता वर्गात जाऊ,'' नचिकेतने चर्चेला पूर्णविराम दिला.

त्या कंपनीचे तब्बल पाच एचआर कॉलेजमध्ये आले होते. त्यांनी ऑडिटोरीअममध्ये ऍप्टी घेतली. त्यानंतर ऑडिटोरिअमच्या बाहेर लावलेल्या नोटीस बोर्डवर इलिमिनेशन राउंडमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे लावण्यात आली होती. त्यात त्यांच्या ग्रुपच्या सर्वांची नावे झळकली होती. पण तरीही पप्प्या आणि मिथिलेचे इंग्रजी थोडे कच्चे असल्याने त्यांना कदाचित डच्चू मिळेल, अशी सर्वांना भीती वाटत होती. ग्रुपच्या इतरांनी इंटरव्हूत विचारण्यात येणारे संभाव्य प्रश्‍न आणि उत्तरांचा फावल्या वेळात त्या दोघांकडून सराव करून घेतला.

जीडी-पीआयची अवघड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सगळा ग्रुप कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जमला. त्यांच्या चेहऱ्यावरचा वाढता तणाव अचूक दिसून येत होता. कुणीच कुणाशी फारशे बोलत नव्हते.

प्रिन्सेस वातावरणातील तणाव छेदत म्हणाली, ""बघूयात रे काय होतंय ते... आता उगाच टेन्शन घेऊन काय होईल. आपल्या हातात आता काहीच नाही. यात नाही सिलेक्‍शन झाले, तर दुसरा कॅम्पस इंटरव्हू फेस करू. त्यातही काही नाही झाले, तर डिग्री पूर्ण झाल्यावर पुन्हा प्रयत्न करू. प्रयत्नांती परमेश्‍वर...''
तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव काही निवळत नव्हता. पुण्याची कंपनी असल्याने सिलेक्‍शन झाल्यावर त्यांना पुण्यातच काम करायला मिळणार होते. शिवाय कंपनी मोठी असल्याने पॅकेजही चांगला मिळेल, अशी आशा होती.

थोड्या वेळात नोटीस बोर्डावर नावे लागल्याची बातमी येऊन धडकली. पण, ती नोटीस बघण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. सगळे एकमेकांकडे बोटं दाखवत होते. नावे बघण्यासाठी एकमेकांना विनवण्या करीत होते. शेवटी प्रिन्सेस उठली. तरातरा कॅन्टीनच्या बाहेर पडली.

पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावर तणावाचे सावट पसरले. सगळे अगदी शून्यात बघत होते. त्यांना कशाचीच भ्रांत नव्हती. पप्प्या टेबलावर ठेवलेल्या कॉफीच्या रिकाम्या मगाशी उगाच खेळत होता. नचिकेतने टेबलाला बेड समजून त्यावर मान टाकली होती. डोक्‍याच्या केसांमधून वारंवार हात फिरवून आशय मनाची चलबिचलता व्यक्त करीत होता. तर मिथिला आणि ऋतुजा उगाच रुमालाशी चाळा करीत होत्या.

तेवढ्यात प्रिन्सेस धावत आली आणि कॅडबरीच्या जाहिरातीतील मुलीप्रमाणे अगदी वेडावाकडा डान्स करायला लागली. सगळे जागेवर उभे झाले. प्रिन्सेल य झाले, कुणालाच काही कळेना. शेवटी मिथिला म्हणाली, ""ये... काय लावलं हे... तुझं सिलेक्‍शन झालंय ते कळलंय आम्हाला... पण, आमचं काय झालंय ते सांगणार आहेस की नाही...''

"गेस व्हॉट... गेस... इफ एनिबडी गेस मी, आय विल गिव्ह एक बीग पार्टी... ढॅंणटणॅग... ढॅंणटणॅग...'' कुणालाच काही कळेना प्रिन्सेसला काय सांगायचे आहे ते.

"मूर्खांनो बघताय काय मुजरा करा... मी तुमच्यासाठी सॉलीड न्यूज आणलीय... वुई ऑल गॉट सिलेक्‍डेड... आपल्याला तीनचा पॅकेज मिळालाय... ढॅंणटणॅड... ढॅंणटणॅड...'' प्रिन्सेस कंबर वेडीवाकडी हलवत, चेहऱ्यावर नकळत अगदी अश्‍लील हावभाव आणून सांगत होती.

ही बातमी कानावर पडताच सर्वांनी एकच जल्लोष केला. जोरजोरात शिट्ट्या वाजवल्या. ज्या टेबलावर ताणतणावांचा काळोख पसरला होता त्याभोवती उत्साही घेर करीत ताल धरला. बोजड शरीराचा पप्प्या तर चक्क पाण्याचे कुंड भरलेल्या महिला स्वतःला सांभाळत जशा चालतात, तसे पोटाचे वेटोळे सांभाळत टेबलावर उभा राहून नाचायला लागला. आनंद व्यक्त करून झाल्यावर, एकमेकांना शुभेच्छा देऊन झाल्यावर सर्वांनी घरी फोन करून निवड झाल्याची बातमी आई-वडिलांना दिली. काहींनी काही मोजक्‍या नातलगांनाही आपल्या आनंदात सामावून घेतले. खरंच निवड झाल्याचा आनंद अवर्णनीय होता. सर्वांचाच...
(क्रमशः)
 
(या लेखाच्या लेखकाशी तुम्हाला संवाद साधायचा असेल किंवा आपल्या समस्या मांडायच्या असतील, तर तुम्ही  vijay.lad@esakal.com या इ-मेल आयडीवर इ-मेल पाठवू शकता. तुमच्या मतावर योग्य ती प्रतिक्रिया पाठविली जाईल. धन्यवाद.)
प्रतिक्रिया
On 19/09/2011 02:47 PM sameer said:
एकदम कॉल्लेगे कॅम्पूस इंटर विएव ची आठवण करून दिली...खूप मस्त आहे लेख i like द मोस्ट.......हि कहाणी माझाशी निगडीत वाटते . ......
On 16/09/2011 12:35 PM kalpana mohite said:
I miss my collage and my collage friends. kharach collage che divas kiti sundar asatat na. pan collage la asatana te kadhi kalatach nahi. collage sampalyanantar te apalyala kalate.
On 15/09/2011 02:43 PM amolsawant said:
As like real story guess
On 30/08/2011 10:55 AM Monali Tobre said:
मी स्वतः HR असल्यामुळे interview घेताना असेच मुलांचे चेहरे असतात त्यामुळे इथून पुढे मी त्यांचे तेन्तिओन कमी कशे करता येतील याकडे लक्ष देईल थान्क्स विजय
On 09/07/2011 04:48 PM ADITYA said:
khup chan aahe mla pan maze COLLAGE che divas aathavale
On 11/03/2011 01:40 PM bhagwat watane said:
खरच हे माझा बर्यात पण असच घडले होते ती आठवण मी कधीच विसरू शकत नाही
On 10/03/2011 05:13 PM jyoti Borgaonkar said:
हा लेख खरच खूप मस्त आहे. माझ्या कॅम्पूस चा दिवस माझ्या समोरून गेला. मला कॉल्लेगे सोडून आज तीन वर्षे झाली. सगळ्या आठवणी पुसत झाल्या होत्या पण लेखा तून त्या सगळ्या आठवणी इतक्या त्याज्या झाल्या कि असा वाटत आहे माझा कॅम्पूस सेलेक्टीओन काल चा झाला आहे....l
On 08-03-2011 10:09 PM Amar said:
खूपच छान!!!!!!!!! First time select झालो होतो त्या दिवसाची आठवण झाली.....
On 18/02/2011 06:18 PM tejaswini said:
मस्त आहे लेख ,मज्जा वाटली वाचताना.
On 11/02/2011 01:48 PM rushikesh said:
very nice Story about campus interview Dha te Nan khupach avadal.
On 02/02/2011 10:14 AM Mukesh Mohite said:
wow gr888888888 miss my college dayssssssss
On 30/01/2011 05:16 PM Priyanka said:
मला माझा क्मापास interview आठवला.खूपच छान लेख आहे हा एकदम आवडला... अंगावर शहारे उभे राहिले.
On 20/01/2011 03:09 PM sandip said:
भाषा शैली उत्तम आहे. मितीला खूप छान वाटली .
On 15/01/2011 04:44 PM Sachin said:
I too miss COEP. आम्ही पण असच नाचलो होतो आमचं selection झाल्यावर.
On 07/01/2011 05:43 PM Dhiraj said:
हे COEP मध्ये actually घडतं.... Really COEP डोळ्यांसमोर उभं राहिलं.... Miss you all guys...आणि COEP too...
On 05/01/2011 03:31 PM Namrata said:
I miss my collage days. thanks
On 22/12/2010 05:49 PM Amol said:
Best.!! पण interviewचा एखादा seen टाकायला पाहिजे होता
On 16/12/2010 08:34 AM Dinesh said:
wow its too good yar .................................... DInesh 09049008131
On 06/12/2010 01:37 PM Ranphool said:
I like this m actuly go through this
On 30/11/2010 06:18 PM AMOL said:
कॉलेज चे दिवस आठवले ... खरच मी पण अशा condition मधून गेलो आहे ......खूपच छान ...........
On 29/11/2010 03:57 PM anjali said:
खूप चं छान कॉल्लागे मदले दिवस अत्तावले.
On 22/11/2010 05:25 PM kavita said:
very nice khup ch chan ahe article...................
On 15/11/2010 05:39 PM Sarika Deshpande said:
खूप मस्त लिहिलंय मजा आली वाचताना आणि suspense कायम ठेवत स्टोरी पुढे जातेय मस्त मस्त...
On 11/11/2010 01:29 PM deepali said:
KHUPACH CHAN AAHE HE VACHUN MALA MAZYA COLLAGE CHE DIVAS AATHAVALE
On 10/11/2010 04:23 PM Rupali said:
It's Realy gud... Plz continue....All D best...
On 29/10/2010 09:06 AM Sagar said:
Pudhil shikshanache divas dolyasamor aale
On 12/10/2010 11:26 AM manjiri said:
कॉल्लेगे . चे दिवस आठवले. खूप मज्जा आली असाच vachayala milel ashi apekha karate..
On 05/10/2010 01:49 PM Sathe said:
अरे कुंद भरलेल्या महिला Kay... अशक्य आहात लाड तुम्ही!!!! :द
On 29/09/2010 09:50 AM Asmita said:
मलाही छान वाटलं. पण अजून थोडा इंटरेस्टिंग करता आला असतं........!! please पुढचं लवकर सांगा.
On 28/09/2010 10:49 AM Yogesh deshmukh said:
अनिकेत आणि मिथिलाचे काय झाले त्यांनी एकमेकांना स्वीकारले काय ? लवकर रिप्लाय द्या
On 28/09/2010 09:44 AM Prakash D. Zende said:
खूप चांगले होते लेख कॉलेज जीवनाची आठवण आली...खूप सही आहेत.
On 23/09/2010 08:54 AM Ajit more osmanabad said:
अनिचेत & मिताली यांचे काय झाले?plz tell, i'm waiting ...
On 21/09/2010 08:40 PM Sach_in said:
1 नो. लेख आहे रे लय भारी ..........
On 9/14/2010 12:29 PM vishnu said:
आठवणीना उजाळा मिळाला !
On 9/12/2010 12:55 PM Shankar Mane said:
मस्त! coep मधल्या आठवणी ताज्या झाल्या.....
On 9/12/2010 10:56 AM Don said:
Thats Great!!!!! Pan Mitila & Nachiketach Pudhe Kay Zal??????
On 9/11/2010 8:41 PM Mangesh said:
पण मितीलाचा प्रपोसे चा काय झालं? ते सांगीलातच नाही.. मी वाट बघत आहे ..............................
On 9/11/2010 3:21 PM priya said:
खूप चान वाटले जुन्या आठवणीना उजाळा मिळाला .पुन्हा एकदा ते दिवस आठवले .मस्त
On 9/11/2010 1:44 PM sagar mungase said:
asha artical chi khoop garaj ahe.
On 9/11/2010 5:23 AM mahesh said:
खूपच छान लेख आहे..कॉलेजचे दिवस आठवले ...पण कॅम्पस मध्ये निवड झाली नवह्ती येवडाच काय तो फरक :)
On 9/10/2010 1:26 PM Akolkar Ganesh said:
आशी कोणती कंपनी आहे कि ,ती सगळ्या ग्रुप ला सिलेक्ट करते .आम्ही पण त्या कंपनीला आमच्या कॉलेज मद्दे बोलावतो .
On 9/10/2010 1:26 PM Akolkar Ganesh said:
आशी कोणती कंपनी आहे कि ,ती सगळ्या ग्रुप ला सिलेक्ट करते .आम्ही पण त्या कंपनीला आमच्या कॉलेज मद्दे बोलावतो .
On 9/10/2010 6:17 AM योगेश said:
पण मिथिलाच्या प्रपोजचे काय झाले ते सांगीतले नाही आपण
On 9/9/2010 4:50 PM Ashwini said:
पण मितीलाचा प्रपोसे चा काय झालं? ते सांगीलातच नाही..
On 9/8/2010 2:13 PM Manoj said:
एक number आहे लेख...........कॉलेज चे दिवस आठवतात.... ऑफिस मध्ये बसून... ओस्सम.......
On 9/8/2010 10:29 AM ajit said:
Very nice story but the time is changed there is no campus interview held in any colleges so i missed out the fun of campus interview
On 9/8/2010 10:01 AM vidyasagar said:
एकदम झक्कास आसे माझ्या सोबत पण झाले आहे .
On 9/8/2010 9:38 AM amol said:
chan aahe article.
On 9/8/2010 9:36 AM aruna said:
Its just wonderful article. khup chan watle
On 9/8/2010 3:22 AM swati said:
सुंदर एकदम....एकदम माझाच अनुभव असल्यासारखे वाटत आहे...
On 9/7/2010 8:30 PM dighe bala said:
खरच छान आहे.
On 07-09-2010 20:29:00 bhagyashree said:
मलाही असाच अनुभव घ्यायचा आहे.......
On 9/7/2010 5:18 PM Ritesh said:
मस्त re
On 9/7/2010 2:46 PM Ratnesh said:
हे करेल..., ते करेल... ??? कि हे करेन ..ते करेन!!!!
On 9/7/2010 6:40 AM gajanan said:
खूप छान लेख आहे, कारण आमच्या इन्तेर्विएव च्या वेळस असेच घडयेचे
On 9/6/2010 2:37 PM a said:
Ok story
On 9/6/2010 9:03 AM sagar dhaygude said:
मला माझा क्मापास interview आठवला . चं लेख आहे.
On 9/5/2010 3:09 PM Navdeep Deshmukh said:
छान लेख आहे. i have experienced at TATA MOTORS
On 9/5/2010 8:10 AM vinod said:
chan artical aahe.i m also an engineer.
On 9/4/2010 10:09 PM mangesh said:
खरच mast. i wanna experience this ..........:)
On 9/4/2010 8:15 PM एक अनुभवी said:
एका ४-५ जणांच्या ग्रूप मधले सगळे निवडले जाणे शक्य आहे. मी कित्येक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर पहिले आहेत. एकदम छान लेख लिहिला आहे. अंगावर अगदी रोमांच उभे राहिले आठवणींनी.
On 04-09-2010 16:49:41 Kalyani said:
सगळे select झाले......!!! ह्या एका गोष्टीने कथेत काल्पनिकता आलीये.
On 9/3/2010 11:30 PM ketan said:
really cherishd my coll days and recruitment moments.realy those were too tense bt at same time gave new dimension to our life!
On 9/3/2010 12:28 PM snehal samant said:
धन्यवाद ! कॉलेजचे दिवस आठवले
On 9/3/2010 12:23 PM snehal said:
खूप चं लेख आहे पण संगल्यांच सिलेक्टिव होण हे जरा कठीण आहे पण वाचून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला
On 9/3/2010 9:49 AM Rajesh said:
हि खरच चांगली स्टोरी आहे मला हे अनुभवायला आवडेल कारण मी एक इंगीनीरिंग विद्यार्थी आहे ज्या प्रकारे Apurava
On 9/3/2010 8:51 AM Amol said:
स्टोरी वाचत असताना माझे कॅम्पूस चे दिवस आठवले आणि खरोखर अंगावर शहारे आले. really a very god story specially for those who are yet to pass through this situation.
On 9/3/2010 8:46 AM kishor pardhi said:
very nice,,... this is real story .... It would be happen again with my group.---------------ALL IS WELL-------------------
On 9/2/2010 7:40 PM S said:
माझ्या पण आठवणी जाग्या झाल्या :)
On 9/2/2010 5:20 PM Apurva said:
खूपच छान लिहिले आहे.मला हे अनुभवायला आवडेल.कारण मी एक engineering student आहे.
On 9/2/2010 4:06 PM sc said:
छान लिहील आहे.. म्हणजे सगळ एकदम cute cute वाटत वाचून.. आणि सगळे select होऊ शकतात mass recruitment असेल तर त्या companychi ..
On 9/1/2010 7:29 PM Suresh Chitte said:
good story after long time.
On 9/1/2010 6:54 PM me aani me said:
खरच छान आहे आणि मी हि अनुभवले आहे ..................................
On 9/1/2010 5:01 PM sagar sankpal said:
इट्स nice स्टोरी .अल्वेस be possitive .
On 9/1/2010 3:11 PM Vidya Desai said:
this articles remembered me my campus selection day....It was realy nice...
On 9/1/2010 12:34 PM mani mau said:
सगळे सिलेक्ट होणे परीकाठेतच शक्य आहे. कधी वास्तविक जीवनात असा झालेला पहिला नाही. तुम्ही काहीही लिहिता. अगदीच बालिश आणि पाचकळ आहे.
On 9/1/2010 10:27 AM rohan said:
this articles remembered me my college days.really good article. college days r very different.
On 9/1/2010 9:41 AM Pratibha said:
खूपच मस्त लेख आहे... वाचून ....आमच्या Collage campus ची aatahvan आली.....
On 9/1/2010 9:35 AM keshwar sanjay said:
गुड news :::::::::
On 8/31/2010 11:25 PM madhuri said:
chan ahe pan utstukta tananara kiva khilvun thevnara nahi
On 8/31/2010 11:19 PM ajinkya said:
मला एक खटकले ...म्हणजे लेखातले नाही comment केलेल्या लोकांचे अहो ३ चे pkg पण सध्या च्या काळात फ्रेशर आणि degree झालेल्यांसाठी ठीकच आहे .....eng लोकांचे pkg पण याच भोवती फिरत आहे सध्या ....आणि आमच्या college मधेही विप्रो ची ऑफर आली आहे.....उद्याच आहे....सो हे वाचून मन फ्रेश झाले.
On 8/31/2010 7:10 PM Swati said:
khup ch chan ahe article.Mi swataha hya prasangacha anubhav ghetala ahe.
On 8/31/2010 6:17 PM Jagdish said:
सर्वांचे selection होणे हे चुकीचे आहे. Campus Interview एवडा सोपा नसतो. आता तर हि लेखा सुरवात आहे. अजून असे किती अशक्यप्राय गोष्टी दिसणार आहेत ह्या मालिकेत ते फक्त लाड साहेबांनाच माहित.
On 8/31/2010 6:17 PM Pavan said:
खूपच छान .....
On 8/31/2010 6:09 PM swapnil banglore said:
खूप छान ..... थोडे प्रसंग सोडले तर मस्त जमली भट्टी ... आता next episode मध्ये love story असणार .. कंपनी चे नाव नाही दिले ह्या मध्ये ...अजून थोडे realastic वाटले असते .. खूप दिवसा ने चांगली कथा सुरु झाली .. keep it up ...
On 8/31/2010 4:48 PM Poonam said:
Article vachtana, swataha select zhale aahe asa bhas zhala.........अंगावर शहारे उभे राहिले .........Owesome article aahe...very nice. Keep it up....!
On 8/31/2010 4:39 PM Satish said:
आमचं राव कुठल्याच कॅम्पस मध्ये सिलेक्शन नव्हतं. बेकार राहिलेलो कितीतरी दिवस. हे जे लिहिलंय तसंच असता का सिलेक्ट होणार्यांच ?
On 31-08-2010 16:06:18 @Shriram said:
तीन चे प्याकेज म्हणजे कमी नाही भाऊ.. फ्रेशर साठी ठीक आहे.. ह्यांना द्या १० चे प्याकेज म्हणजे लगेच हे २ रुपयाचा कटिंग पिणारे ४० रुपयाची कॉफी पिणार.. वडापाव सोडून पिझा खाणार..
On 8/31/2010 3:35 PM Kanchan said:
खूप छान लेख लिहिला आहे. ...
On 8/31/2010 3:18 PM Ishwar Kashid said:
खूपच छान लेख आहे हा एकदम आवडला...
On 8/31/2010 2:55 PM Shriram said:
आपल्याला तीनचा पॅकेज मिळालाय... ढॅंणटणॅड... ढॅंणटणॅड... -------------------------------------------------------------------- तीनचा पकेज मिळाला म्हणून आनंदी व्हायचे दिवस गेले आता!
On 8/31/2010 2:48 PM nilesh said:
kuchh maja nahi hai story me.Dum nahi hai dost.
On 8/31/2010 2:43 PM snehal said:
पहिल्या लेखाची सुरुवात पण आशीच काहीशी होती का ? लक्षात येत नाही. दोनीही सारखेच वाटत आहेत ???????????????????????????
On 31-08-2010 14:27:27 Varsha said:
सही आहे लेख एकदम.... मी हि गेलीये अशा अनुभवातून त्यमुळे १ नो वाटले वाचून लेख............... वर्षा


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: