फिलिप ह्यूजचे ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST)
मेलबर्न - खांद्याच्या दुखापतीतून बरा झालेला सलामीचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला. त्याच वेळी मनगटाच्या दुखापतीने त्रस्त ब्राड हॅडिन याने भारत दौऱ्यासाठी अनुपलब्धता कळविली.
पुढील महिन्यात होणाऱ्या भारताविरुद्धच्या दौऱ्यासाठी निवड समितीने हॅडिनच्या जागी टीम पेनी याची यष्टिरक्षक म्हणून निवड केली. हॅडिनच्या दुखापतीत झपाट्याने सुधार होत असला, तरी अजून त्याने पूर्ण क्षमतेने सरावाला सुरवात केलेली नाही. क्लब क्रिकेट खेळण्यास सुरवात केल्यावर त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा घेता येईल. त्यानंतरच भारत किंवा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात येईल, असे निवड समितीने स्पष्ट केले.
भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलिया दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून, वेगवान गोलंदाज पीटर जॉर्ज आणि जोश हॅजेलवूड यांचा संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
संघ - रिकी पॉटिंग (कर्णधार), मायकेल क्लार्क, डग बोलिंजर, पीटर जॉर्ज, नॅथन हौरिट्झ, जोश हॅझेलवूड, बेन हिल्फेनहौस, फिलिप ह्यूज, मायकेल हसी, मिशेल जॉन्सन, सायमन कॅटिच, मार्क्स नॉर्थ, टीम पेनी, स्टीव्हन स्मिथ, शेन वॉटसन.