Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात किरकोळ वाढ
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 03, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - कालच्या मोठ्या उसळीनंतर शेअर बाजारात आज सावधपणे व्यवहार झाले. अवघ्या 32.44 अंशांच्या वाढीसह मुंबई निर्देशांक 18,238.31 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातही 14.30 अंशांची वाढ झाल्यामुळे निफ्टी 5486.15 वर बंद झाला.

ंमुंबई निर्देशांकाने काल तब्बल 200 हून अधिक अंशांची वाढ नोंदवली होती. यामुळे सेन्सेक्‍स महिन्यानंतर पुन्हा एकदा 18,200 च्या पुढे गेला होता. जागतिक शेअर बाजारातील वाढीचे सावट आजही बाजारावर दिसून आले. त्यामुळे बाजारात आज वाहन, पोलाद, बॅंक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. सकाळच्या सत्रात तर निर्देशांक 150 अंशांनी वधारला होता.

बांधकाम क्षेत्रात एसीसी, जयप्रकाश असोसिएट्‌स, तर वाहन क्षेत्रात टाटा मोटर्सच्या शेअरचे भाव वधारले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच बॅंक निर्देशांकही आज वधारला होता. एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक यांच्या शेअरची आज खरेदी होत होती.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: