Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा व सुनेची आत्महत्या (व्हिडिओ)
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 03, 2010 AT 11:38 AM (IST)
Tags: suicide,   police,   crime,   malad,   mumbai,   saam tv,   sakaalpapers,   sakaal

मुंबई  -  सुरक्षा आणि बंदोबस्त शाखेतील सहायक पोलिस आयुक्त मधुसूदन कुरणे यांच्या मुलाने त्याच्या पत्नीचा रिव्हॉल्व्हरने गोळी घालून खून केला. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. यासाठी त्याने वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा वापर केला. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास मालाड येथे घडली. दोघांचे याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. या प्रकारामागील कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामराव पवार यांनी दिली.

मालाड पश्‍चिमेला असलेल्या राजनपाडा परिसरात रॉयल अपार्टमेंटमध्ये सहायक पोलिस आयुक्त कुरणे त्यांची तीन मुले आणि पत्नीसह राहतात. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या कुरणे यांचा एक मुलगा अभिजित (वय 27) याने काल मध्यरात्रीनंतर पत्नी अश्‍विनी (21) हिची गोळी झाडून हत्या केल्यानंतर स्वतःवर एक गोळी झाडून आत्महत्या केली. अभिजितचा कॉल सेंटरसाठी गाड्या पुरविण्याचा व्यवसाय आहे.

अभिजित याने घराचा दरवाजा आतून बंद केल्याने हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला नाही. सकाळी अभिजितच्या खोलीतून बराच वेळ कसलाच आवाज येत नसल्याने कुरणे यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजा तोडला असता अभिजित आणि सून अश्‍विनी दोघेही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले.

हा प्रकार पाहून सुन्न झालेल्या कुरणे कुटुंबीयांनी घटनेची माहिती मालाड पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात पाठविले आहेत. कुरणे यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केले आहे. त्यातून दोन गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
 
अभिजित याने सुरवातीला पत्नीला गोळी घातली आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे रामराव पवार म्हणाले. कुरणे कुटुंबीय शोकाकुल असल्याने या घटनेमागील कारणाबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आलेली नाही. अभिजित आणि अश्‍विनी यांच्या खोलीतूनही आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असा पुरावा सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
प्रतिक्रिया
On 9/3/2010 9:24 PM MAJOR RAVI JOSHI ( Retd ),MIAMI ( FLORIDA ),USA. said:
आदरणीय DG POLICE महाराष्ट्र ,हे पटतच नाही . सर्विस RIVOLVER DUTYVARIL व्यक्ती घरी सोडून जाते . काही दिवसांपूर्वी कामशेत -तळेगाव जवळ दरोडेखोरांवर गोळी चालवायला काढलेले पिस्तोल पण ऐनवेळी LOCKED झाले ( म्हणजे MAINTENANCE च्या बेपर्वाई मुळेच). अर्थातदरोडेखोर पकडलेगेल्यावर ते पळवूननेलेले पिस्तोल परत मिळाल्यामुळे झालेली नाचक्कीकाही अंशीभरून तरी निघाली HOPE & PRAY YOUR ESTEEM OFFICES ENSURE CORRECT ( SOP ) STANDING OPERATING PROCEDUREs .सद्द्य परिस्थितीत आपल्याला नेहमीच सतर्क राहिले पाहिजे .


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: