Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

"मातोश्री', "कृष्णकुंज'वर उद्या काढणार मूकमोर्चा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:43 AM (IST)

मुंबई  -  शिवसेना-मनसेच्या दुहीमळे मराठी माणसाचे नुकसान होऊ नये व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोमीलन व्हावे, यासाठी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा' ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्याची निर्णायक लढाई 5 सप्टेंबरला दिसणार आहे. राज आणि उद्धव यांच्या निवासस्थानी जाऊन चळवळीचे कार्यकर्ते भूमिका मांडणार आहेत.

चळवळीचे संस्थापक सतीश वळंजू यांच्यासह शशी सावंत, दीपक भोसले, अरविंद पावसकर, योगेंद्र चेंबूरकर व प्रतीक मंत्री हे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येतील. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते मूकमोर्चाने राज ठाकरे यांचे निवासस्थान "कृष्णकुंज'च्या दिशेने जाणार आहेत. याची पूर्वकल्पना आजच "कृष्णकुंज' निवासस्थानी निवेदनाद्वारे देण्यात आली. राज ठाकरे यांनी म्हणणे ऐकून घ्यावे, हीच आमची इच्छा असल्याचे श्री. वळंजू यांनी सांगितले.

"कृष्णकुंज'वरून मूकमोर्चा वांद्रे कलानगर येथील "मातोश्री' निवासस्थानी जाणार आहे. "मातोश्री'वरही आजच निवेदन पोहोचविण्यात आले आहे. या मोर्चात मराठीप्रेमी व मराठी अस्मिता कायम राहावी असा "पण' करणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मूकमोर्चात कुठल्याही रंगाचा झेंडा दिसणार नाही; तसेच कोणतीही घोषणा करण्यात येणार नाही. मात्र, "केवळ मराठी मनोकामना... हे चित्र पुन्हा दिसावे...' असे फलक प्रत्येकाच्या हाती देण्यात येणार असून याच माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

पत्रक, बॅनर, माध्यम, एसएमएस; तसेच सह्यांच्या मोहिमेद्वारे आमच्या चळवळीचे उद्दिष्ट मुंबईतच नव्हे; तर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात आले आहे. कालच्या दहीहंडीच्या निमित्ताने विविध गोविंदा पथकांशी संपर्क साधून हा विषय त्यांच्यापर्यंत नेण्यात आला आहे. आता पाच सप्टेंबरच्या निर्णायक मूकमोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहायचे आहे. नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, चिपळूण आदी ठिकाणांहून कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत. सुमारे 10 हजार लोक यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज वळंजू यांनी व्यक्त केला.
 
 
प्रतिक्रिया
On 20/12/2011 04:52 AM vasant said:
हे होणे नाही यासाठी मागे जाऊन जर शोध घेतला तर हे होने नाही यावर उपाय नाही आता परत नाही
On 16/11/2011 04:38 PM kad said:
शिवसेना प्रमुखान साठी हे होणे गरजेच आहे
On 04/10/2011 02:28 AM kdchitnis said:
मुकी बिचारी कुणी हाका!
On 02/06/2011 11:01 AM dhanaji shedage said:
राज आणि उद्धव यांनी एक येउन बाळासाहेबांना एक अनमोल भेट द्यावी हीच मराठी प्रेमीँची इच्छा.
On 25/09/2010 07:14 PM शंकर र. बोकडे said:
खूप छान होईल पण कोण कुणाचे ऐकणार! !!!!जय हिंद जय महाराष्ट्र.!!!!
On 9/17/2010 2:58 PM MANOJ LONARI said:
ALL THE BEST... MAKE IT LARGE
On 9/17/2010 9:30 AM srpatil said:
आत्तापर्यंत इतर कोणत्याही "दुही" बद्दल अशा भावना नसतील खरच १ कच सेना असावी हि लाखोंची इच्छा आहे पण वयक्तिक फायद्या पुढे यांना काही दिसत नाही
On 05/09/2010 10:36 प्रसाद said:
राज आणि उद्धव यांनी एक येउन बाळासाहेबांना एक अनमोल भेट द्यावी हीच मराठी प्रेमीँची इच्छा.
On 9/4/2010 5:29 PM Moha said:
मोर्चात सहभागी होणे शक्य नाहीये पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. आगे बढो....जय महाराष्ट्र
On 9/4/2010 4:07 PM Rajesh Shelar said:
मराठी माणसाच्या हिताचा विचार आहे. ठाकरे बंधूनी एकत्र यावे हि मराठी माणसाची कळकळून इच्चा आहे. हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्र सुखावेल ह्यात काही शंखा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र!!!
On 9/4/2010 2:45 PM avinash said:
जय महाराष्ट्र . वैचारिक पातळीवर दोघांनी एकत्र येऊन आपसातले मतभेद संपुष्टात आणावेत आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी , मातीसाठी ,आपल्या आईसाठी एकत्र यावे
On 9/4/2010 2:38 PM avinash said:
आपली चळवळ यशस्वी होवो यासाठी आमच्या हार्दिक सदिच्छा
On 9/4/2010 12:07 PM Nilesh Panpatte said:
Jai Hind Jai Maharashtra
On 9/4/2010 11:17 AM prashant mandhare said:
त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी सगळ्यांनी एक झालं पाहिजे.. जय महाराष्ट्र
On 9/4/2010 10:41 AM purushottam said:
मराठी माणसांन एकत्र येणे खूप गरजेचे आहे . राजकारण थांबवा एकत्र या आणि एक नवा महाराष्ट्र घडूया .सतीश तुम्हाला मना पासून शुभेचा जय महाराष्ट्र
On 9/4/2010 10:26 AM Vishram Deshpande said:
देवा 'उद्धवा', 'बाळ' पणापासून सक्ख्या भावाप्रमाणे राहिलेल्या या भावांमधील 'राज' कारण मिटविण्यासाठी तूच आता उभा 'ठाक' रे !
On 04/09/2010 09:54 sachin said:
सतीश साहेब मनोमिलन नाही झाले तर तुम्ही तिसरा पक्ष काढा. आमच्या शुभेच्छा
On 9/4/2010 9:54 AM amol said:
लोकांना सामील होण्यासाठी वेळ, ठिकाण, सर्व माहिती जास्तीत जास्त पब्लिश करा. हि चळवळ यशस्वी झालीच पाहिजे.
On 9/4/2010 9:36 AM swapnil nalawade said:
त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी सगळ्यांनी एक झालं पाहिजे.. जय महाराष्ट्र
On 9/4/2010 9:32 AM Ganesh Thite said:
मोर्चात सहभागी होणे शक्य नाहीये पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. आगे बढो....जय महाराष्ट्र
On 9/4/2010 6:42 AM datta bhagwat said:
हे जितक्या लवकर होईल तितके ते मराठी जनतेच्या दृष्टीने हिताचे होणारा आहे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: