Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

"जनरल मोटर्स'चा तळेगावात इंजिन प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:07 AM (IST)
Tags: talegaon,   business
पुणे - जनरल मोटर्स इंडियाने तळेगाव येथील मोटार उत्पादन प्रकल्पात इंजिन उत्पादन प्रकल्प उभारला असून, येथे डिझेल आणि पेट्रोल इंजिनचे उत्पादन होणार आहे. यासाठी वीस कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी येथे दिली. प्रकल्प नोव्हेंबरपासून कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ""सुरवातीस स्थानिक पातळीवर इंजिनचा पुरवठा केला जाणार असून, याची उत्पादन क्षमता वर्षाला १.६० लाख युनिट आहे. सुरवातीस एका शिफ्टमध्ये १७८ ते २०० इंजिनचे उत्पादन केले जाईल. एक लिटर ते १.६ लिटर क्षमतेचे पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे उत्पादन होणार आहे. कंपनी स्थानिक पातळीवरील ६० ते ८० टक्के सुटे भाग वापरत आहे. सध्या एक पेट्रोल आणि एक डिझेल इंजिनचे उत्पादन नोव्हेंबरपासून सुरू केले जाईल. सध्या त्या संदर्भातील काम सुरू आहे.''

पुढील एक ते दोन वर्षांत कंपनी हलक्‍या व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेत उतरणार आहे. या संदर्भात ते म्हणाले, ""कंपनी तीन व्यावसायिक वाहने बाजारात सादर करेल. यातील एक वाहन हे एक टनापेक्षा कमी क्षमतेचे असेल, तर एक "टूरिस्ट' आणि "मल्टिपर्पज व्हेईकल' प्रकारातील असेल. यांचे उत्पादन कंपनीच्या गुजरात येथील हलोल प्रकल्पात केले जाणार आहे. कंपनी या व्यवसायासाठी स्वतंत्र वितरक नेमणार असून, या संदर्भातील काम सुरू झाले आहे.''

""कंपनी दोन मोटारी बाजारात उपलब्ध करणार असून, यातील एक मोटार ही "अल्टो'च्या श्रेणीतील, तर एक "सेदान' श्रेणीतील असेल. यांचे मॉडेल पूर्णपणे नवीन असेल. मोटार विकसित करण्याचे काम सुरू आहे. तवेराचे नवे मॉडेल लवकरच सादर केले जाणार आहे,'' असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ""पावसाळ्यात विक्री मोठ्या प्रमाणात होत नाही. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नव्या योजना जाहीर करणार आहे. साठ टक्के विक्री ही छोट्या शहरांत आणि ग्रामीण भागातून आणि चाळीस टक्के विक्री मोठ्या शहरांतून होत आहे.''

व्याजदरवाढीचा विक्रीवर परिणाम शक्‍य
""रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ केली. त्यामुळे बॅंकांनीही कर्जावरील व्याजदर वाढविले आहेत. मात्र, या वाढीचा परिणाम अजून विक्रीवर झालेला नाही. पुढे जाऊन व्याजदरात वाढ झाल्यास विक्रीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे पी. बालेंद्र यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 9/5/2010 4:38 PM Mangesh said:
कंपनी व्यवस्थापनाला विनंती व्यवसाय वाढल्यावर मनुष्यबळाची कमतरता भासते हे खरे आहे त्यामुळे बेरोज्गारानला नोकरी ची संधी द्या
On 9/4/2010 3:51 PM chandrashekhar said:
Proud for sharad pawar lot of co came in pune
On 9/4/2010 5:02 AM Velankar Anil V. said:
जनरल मोटर्स ला हार्दिक सुबेच्छा: वेल. अनिल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: