Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

संशयित स्वाइन फ्लू रुग्णाचा घाटीत मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:30 AM (IST)

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (घाटी) स्वाइन फ्लू वॉर्डात उपचार घेत असलेल्या एका संशयित स्वाइन फ्लू बाधित रुग्णाचा शुक्रवारी (ता. तीन) मृत्यू झाला.

याविषयी घाटीचे वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले, की श्रीधर रतन बोंबले (वय 35, रा. राजुरा टाकळी, ता. खुलताबाद) यांच्यावर स्वाइन फ्लू वॉर्डात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे लाळनमुने (स्वॅब) पुण्यास तपासणीसाठी पाठविले आहेत. वॉर्डात सध्या 20 रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी सहा पॉझिटिव्ह आहेत. व्हेंटिलेटरवर चार रुग्ण आहेत. दरम्यान, आज प्राप्त झालेल्या अहवालातून दोन जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले.

दिवसभरात घाटी रुग्णालयात 14, महापालिका आरोग्य केंद्रांमध्ये 249, उपजिल्हा रुग्णालयात 26, ईएसआय 50 आणि जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांमध्ये 443 अशा एकूण 742 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा जणांचे स्वॅब घेण्यात आले. आजवर 20 जणांचा मृत्यू झाला तर 63 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पुण्याच्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेत 231 स्वॅब पाठविले होते. त्यापैकी 219 स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: