नवी दिल्ली - सलग दोन आठवड्यांत घसरण नोंदविल्यानंतर अन्नधान्याच्या चलनवाढीत पुन्हा वाढ झाली आहे. 21 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात डाळी, फळे व दूध महागल्याने अन्नधान्याच्या चलनवाढीचा दर 10.86 टक्क्यांवर पोचला. त्याआधीच्या आठवड्यात तो 10.05 टक्के होता.