Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सिंगापुरातील गणेशोत्सव यंदा होणार धूमधडाक्‍यात
-
Saturday, September 04, 2010 AT 02:30 AM (IST)

पुणे - सिंगापुरातील 88 मराठी कुटुंबीयांमध्ये यंदा गणेशोत्सव खास उत्साहाने साजरा होणार आहे. याचे कारण म्हणजे उत्सवासाठीचा सारा सरंजाम त्यांच्या हाती असणार आहे; ज्यामध्ये फुलवातीपासून पूजेची समग्र माहिती देणाऱ्या "सीडी'चाही समावेश आहे. सिंगापूरस्थित मराठी उद्योजक यतीन दातार यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम प्रत्यक्षात आला असून त्यासाठी गणरायाही शुक्रवारीच (ता. 3) मुंबईहून रवाना झाले.

गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरामुळे गणेशोत्सव परदेशातही पोचला आहे. परदेशातील मराठीजन वैयक्तिकरीत्या मूर्ती आणि शक्‍य तेवढे पूजासाहित्य नेऊन उत्सव साजरा करतात. मात्र, दातार यांच्या प्रयत्नातून सिंगापुरात यंदा तो व्यापक प्रमाणात साजरा होणार आहे. "आतापर्यंत येथील मराठी माणसे गणेशोत्सवात घरातीलच एखाद्या गणेशमूर्तीची अथवा छायाचित्रांची पूजा करून गणेशोत्सव साजरा करत. त्यांची गणपतीविषयीची भक्ती पाहून भारतातून थेट गणेशमूर्ती मागविण्याचा निर्णय मी घेतला,' असे दातार यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. ते म्हणाले, 'सहा वर्षांपूर्वी मी पुण्याहून 15 गणेशमूर्ती मागविल्या. वर्षागणिक त्यात वाढ होत गेली. या वर्षी हा आकडा 88 झाला आहे. यंदा प्रथमच आम्ही गणेशमूर्तींसोबत गणेशाची षोडशोपचारे पूजा, आरती, प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या साहित्याचे कीटही देणार आहोत. त्यामुळे भक्तांना कोणत्याही प्रकारची धावपळ करावी लागणार नाही.''

पुण्यातील राजू गोडबोले यांनी, या मूर्तींच्या निर्यातीची जबाबदारी पार पाडली. 'सिंगापूरला पाठविण्यात येणाऱ्या 88 मूर्तींपैकी बहुतांश मूर्ती या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृती आहेत. मूर्तींबरोबर पूजेचे आणि सजावटीचे साहित्यदेखील यंदा पाठविले आहे. या सर्व मूर्ती तीन आकारातील असून, त्याच्या पॅकिंगसाठी विशेष खबरदारी घेतली आहे,'' अशी माहिती त्यांनी दिली.
 
'लिटल इंडिया'त पुढील वर्षी गणेश मिरवणूक

प्रतिक्रिया
On 9/4/2010 5:51 AM Jayant R. Chapekar (Dada) said:
उपक्रम स्तुत्य आहे. त्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन! सिंगापूर मध्ये एवढी मराठी कुटुंब गणपतीभक्त आहेत हे वाचून चांगले वाटले. अशी उत्तरोत्तर वाढ व्हावी ही सदिश्चा !! - जयंत रा. चापेकर, ज्येष्ठ नागरिक पुणेकर, सध्या अमेरिकेतून लिहीत आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: