Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

माहूरकरांना आता विकासाची स्वप्नं. (फोटोफिचर)
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:30 AM (IST)
देवीच्या साडेतीन पीठापैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर (जि. नांदेड) येथील परिसर सध्या निसर्गाने नटलेला आहे. या शहराला प्राचिन ईतिहासही आहे. सातवाहन, क्षत्रप, गद्यान, औरंगजेब, निझाम, राजे शिवराय, पोर्तुगाल, इस्ट इंडिया कंपनी या तत्कालिन राजवटीशी माहूरचा संबंध आलेला आहे. स्थानिक गोंडराजाने येथे रामगड किल्ला बांधला.

माहूर शहर आणि नजिकच्या परिसरात रेणुका मंदिर, भगवान दत्तप्रभूंचे जन्मस्थान व निद्रास्थान, महानुभाव दत्तमंदिर, परशुराम मंदिर, महासती अनुसया मंदिर, बाब सोनपीर दर्गाह, शेख फरीद दर्गाह व विशाल बौध्द पुतळा ही प्रमुख धार्मिक स्थळ आहेत. याशिवाय रामगड किल्ला, किल्ल्यातील महालक्ष्मी मंदिर, आदिवासी व बंजारा संस्कृतीचे जतन करणारे वस्तूसंग्रहालय, प्राचीन तलाव, प्राचिन लेणी आदी ठिकाणंही पर्यटकांना आकर्षित करतात.

धार्मिक पर्यटनाच्या शासनाच्या धोरणात माहूरचा समावेश झाला असून 79 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. निधीला मंजुरी मिळाल्यानंतर प्राधिकरणाची पहिली बैठकही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन विशाल असल्याने निधीची कमतरता पडणार नाही आणि येत्या चार-दोन वर्षांत माहूरचा चेहरामोहरा बदललेला असेल, अशा अपेक्षा माहूरकरांच्या गावगप्पातून ऐकायला मिळत आहेत. डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कामाची पद्धत पाहता, विकासाबद्दल माहूरकरांना आता गोड स्वप्नं पडू लागली आहेत.

माहूरचा इतिहास
माहूर हे धार्मिक शहर म्हणून प्रसिद्ध तर आहेच. शिवाय शहराला इतिहासही आहे. सातवाहन, क्षत्रप, गद्यान, औरंगजेब, निझाम, राजे शिवराय, पोर्तुगाल, इस्ट इंडिया कंपनी या तत्कालीन राजवटीशी माहूरचा संबंध आलेला आहे. स्थानिक गोंडराजाने येथे रामगड किल्ला बांधला. आता मोडकळीस आलेला हा किल्ला बाहेरून पाहिला तरी त्याच्या भव्यतेची कल्पना येते. येथील वस्तुसंग्रहालयात शस्त्रास्त्रांबरोबरच वाघनखी, विविध आकाराची, धातूंची भांडी, शोभीवंत वस्तू, प्राचीन खेळांची साधने पाहायला मिळतात. त्यावरून येथील प्राचीन संस्कृतीची कल्पना येते.

भौगोलिक वैभव
निसर्गसमृद्ध वनराई व सातपुड्याच्या डोंगररांगांत वसलेले हे तीर्थक्षेत्र विदर्भ व मराठवाड्याच्या हद्दीवर आहे. दहा हजार हेक्‍टर विस्तीर्ण जंगलाची झालर या परिसराला आहे. त्यात वाघ, रोही, अस्वल, हरणं, राष्ट्रीय पक्षी मोर, कोल्हे, लांडगे, रानडुकरं यांचा विहार आहे. वार्षिक पर्जन्यमान 1240 मिलिमीटर एवढे प्रचंड आहे. डोंगरावरील जंगल, खळाळत वाहणारे झरे, पक्ष्यांचा किलबिलाट हे मनोहारी वैभव पर्यटकांना खिळवून ठेवते. याशिवाय याच परिसरात काही अंतरावर गरम पाण्याचे कुंडासाठी प्रसिद्ध असलेले उनकेश्‍वर हे देखील निसर्गरम्य स्थळ आहे. पुढे लांबच लांब अंबाडी घाट, तिथून पुढे गेल्यावर दीड तासाच्या अंतरावर सहस्रकुंडचा सहस्रधारांनी कोसळणारा धबधबाही खुणावतो. या परिसरातून लवकर पाय निघतच नाही.

माहूरमधील प्रेक्षणीय ठिकाणं
माहूर शहर आणि नजिकच्या परिसरात देवीच्या साडेतीन पीठापैकी एक रेणुकामाता मंदिर, भगवान दत्तप्रभूचे जन्मस्थान व निद्रास्थान, महानुभावांचे दत्तमंदिर, महासती अनसूया मंदिर, बाबा सोनपीर दर्गाह, शेख फरीद दर्गाह व विशाल बौद्ध पुतळा ही प्रमुख धार्मिक आकर्षणे आहेत. याशिवाय रामगड किल्ला, किल्ल्यातील महालक्ष्मीची मनोहारी मूर्ती, आदिवासी व भटक्‍या विमुक्तांच्या संस्कृतीचे जतन करणारे वस्तुसंग्रहालय, प्राचीन तलाव, प्राचीन लेणी आणि समृद्ध वनपरिसर पर्यटकांना आकर्षित करतो.

सामाजिक स्थिती
माहूर शहराची लोकसंख्या 15 हजारांच्या वर आहे. सध्या येथे ग्रामपंचायत असून लागून असलेली खेडी समाविष्ट करून येथे नगरपंचायत स्थापण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. आदिवासी व बंजारा या समाजाची संख्या येथे अधिक आहे. याशिवाय हिंदू धर्मातील अन्य जाती, मुस्लिम, बौद्ध यांचीही संख्या लक्षणीय आहे. पर्यटन व्यवसायाबरोबरच हस्तकला, वनऔषधी, रानमेव्यातून उपजीविका, जळतन याबरोबरच आता पगारदार आणि हॉटेलिंगही रोजगाराची साधने बनली आहेत. येथील दरडोई उत्पन्न कमी असून कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि त्याखालची वर्गरचना येथे वास्तव्य करून आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या दंडकाप्रमाणे लोकसहभागाचा वाटा भरणे येथील नागरिकांना शक्‍य नसल्याने विविध योजनांच्या लाभापासून माहूरकर वंचित आहेत.

विकास आराखड्यात आहे काय?
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार 79 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. पैकी 19 कोटी रुपये प्राप्तही झाले आहेत; पण विकास आराखडा म्हणजे नेमके काय आणि यातून काय काय कामे होणार असा प्रश्‍न माहूरकरांबरोबर तमाम भाविक आणि धार्मिक पर्यटकांच्या मनात रुंजी घालतो आहे. या आराखड्यात धार्मिक स्थळ विकासासाठी 13 कोटी 70 लाख, नैसर्गिक व सांस्कृतिक पुरातन स्थळ विकासासाठी 11 कोटी 75 लाख, परिवहन व्यवस्था (रस्ते, बसस्थानक, हेलीपॅड, केबलकार) यासाठी 44 कोटी 25 लाख, पूरक पायाभूत सुविधा (पथदिवे, पाणीपुरवठा) चार कोटी 30 लाख व आस्थापना, प्रशासन संकीर्ण यावर पाच कोटी रुपये खर्च होणार आहेत.

आव्हाने
माहूर या तीर्थक्षेत्राचा विकास करताना पहिली अडचण येते ती पाणी पुरवठ्याची... उशाला पैनगंगा नदी आहे. पावसाळ्यात ती दुथडी भरून वाहते. पण पावसाळा संपताच पात्र कोरडे पडते. त्यामुळे या नदीवर गोदावरीप्रमाणे बंधाऱ्यांची मालिका निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे. याशिवाय प्राचीन तलावातील गाळ उपसल्यास जलसाठा आणि पर्यटन या दोन्ही दृष्टीने फायदेशीर ठरेल. माहूरला रेल्वेने जोडण्याची घोषणा लालूप्रसाद यादव यांनी केली होती. पण, पुढे तो विषय रखडला. माहूरला जाण्यासाठी रस्ते हाच एकमेव पर्याय आहे. पण, त्याची रुंदी व दर्जा चांगला नाही. यात सुधारणेची गरज आहे. जनतेचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. अतिक्रमणाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत व राजकीय नेत्यांचा समन्वयही महत्त्वाचा आहे.

आराखड्यातील उणिवा
माहूरचा विकास आराखडा मार्गी लावताना रस्ते डांबरीकरणाने नव्हे तर कॉंक्रिटीकरणाने बांधावेत. माहूर तीर्थक्षेत्रावर वर्षाकाठी 35 ते 40 लाख यात्रेकरू येतात. पण, आराखड्यात केवळ दहा लाख लोक येतात अशी गफलत झाली आहे. यात्रेकरूंच्या संख्येवरच सोई सुविधा पुरविल्या जाणार असल्याने आराखड्यावर विपरीत परिणाम होण्याची साधार भीती प्राधिकरणातील सदस्य नामदेवराव केशवे यांच्यासह पुजारी चंद्रकांत रिठे, दीपक काण्णव, रवींद्र काण्णव यांनी व्यक्त केली.
 
कसे जावे - माहूर हे तीर्थक्षेत्र नांदेडपासून 133 किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद येथून किनवटपर्यंत रेल्वेने जाता येते, व तेथून बसने प्रवास करावा लागतो. तसेच नांदेडपासून एस.टी. महामंडळ व खासगी बसची व्यवस्था आहे. येथून जवळच सहस्त्रकुंडचा धबधबाही पर्यटकांना श्रावण महिन्यात खुणावतो.


रामगड किल्ल्याची विस्तीर्ण तटबंदी (सर्व छायाचित्र - बालाजी कोंडे, माहूर)
-------------------------------------------------------------------------

रेणुकामातेची प्रसन्न मूर्ती
-------------------------------------------------------------------------

रामगड किल्ल्याचे भक्कम असे उत्तर प्रवेशद्वार
-------------------------------------------------------------------------

मातृतीर्थ तलाव
-------------------------------------------------------------------------

परशुरामाचे भारतातील केवळ दोन मंदिरांपैकी एक मंदिर
-------------------------------------------------------------------------

अनसूया माता मंदिर
-------------------------------------------------------------------------

पांडवलेणी
-------------------------------------------------------------------------

सोनापीर दर्गा
-------------------------------------------------------------------------

गडावरून टिपलेले माहूर शहराचे छायाचित्र.
-------------------------------------------------------------------------

पायथ्यापासून रेणुकादेवीच्या गडावर जाण्यासाठी अस्ताव्यस्त थाटलेली दुकाने.
-------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
On 9/5/2010 1:14 PM shripad joshi said:
आता मात्र माहूरच विकास प्रामाणिकपणे zala पाहिजे thank you
On 9/4/2010 7:45 PM Yogesh Joshi said:
@ अविनाश नेवे - "नाशिक रोड" रेल्वे स्थानकातून "नंदीग्राम एक्सप्रेस", "तपोवन" व "देवगिरी" या गाड्या थेट नांदेडपर्यंत आहेत. मनमाडवरून तर नांदेडला पुष्कळ गाड्या आहेत. नांदेडवरून ST मिळू शकेल व राहण्याचीहि सोय नांदेडला आहे. नांदेडपासून 2 तासावर "बासर"ला देशातील एकमेव "सरस्वतीदेवीचे" मंदिर आहे, जमल्यास तिथेही अवश्य जा. शटल रेल्वेचे वेळापत्रक erail व indiarailinfo वर मिळेल. - योगेश
On 9/4/2010 7:14 PM R G Masram said:
ई सकाळ व बालाजी कोंडे यांचे हार्दिक अभिनंदन !! हि बातमी वाचून अत्यंत आनंद झाला. माहूर शहराची व रमणीय परिसराची एय्तिहासिक माहिती सर्व मराठी भाषिकांना उपलब्ध केल्यामुळे भक्तगण, निसर्ग प्रेमी या स्थळास भेट दिल्या शिवाय राहणार नाही. महुर्गादाचा संपूर्ण विकास होवो हि प्रार्थना ..........बोरीवली, मुंबई
On 9/4/2010 5:28 PM Nilesh Chirde said:
Hi maahiti mhanje janu ekhada swapnach pudhil karyasathi shubhechha ! & Rahul Bhagat yanchya pratikriyela maze anumodan aahe. thanks !
On 9/4/2010 5:04 PM pradip mody said:
खूपच छान आहे निसर्गाच सौदर्य पाहून खूप मनाला आनंद झाला.
On 9/4/2010 2:19 PM Avinash Neve said:
ही एक चांगली माहिती मिळाली रेणुका देवी हे आमचे कुलदैवत आहे लवकरच आम्ही माहूर येथे जाण्याचा विचार करीत आहोत त्या साठी बहुमोल मार्गदर्शन मिळाले कसे पोहचल यावर विस्तृत माहिती दिल्यास बरे होईल आम्हाला नाशिक येथून रेल्वेने कसे जाता येईल याबद्दल ई-मेलवरून माहिती मिळू शकेल काय ?
On 9/4/2010 1:21 PM shaikh said:
सोनापीर दर्ग्याचे आणि त्याच्या बाजूचा निसर्ग दोन्ही फोटो आवडले
On 9/4/2010 1:15 PM a.b.khole said:
it's a great plesure thanks!
On 9/4/2010 12:42 PM vijaykumar kadam said:
पाहण्यासाठी योग्य ठिकाण आहे .
On 9/4/2010 12:09 PM Tejaswi Bidkar said:
नमस्कार..माझ नाव तेजस्वी...आमची कुलदेवी रेणुका माता आहे...तुम्ही खूपच चांगली माहिती दिली आहे...परंतु माझी अशी अपेक्षा आहे कि जे कागदोपत्री आहे अस्तिवात यावे...आणि माहूर हे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस यावे....धन्यवाद आपण घेतलेल्या पुढाकाराबाबत....
On 9/4/2010 11:55 AM Ishwar Rathod said:
माहूर शक्ती पीठाचे छायाचित्रातून दर्शन झाले धन्य झालो. फोटोग्राफर बालाजी कोंडे यांचा अभिनंदन......व शुभिच्या धन्यवाद दादा
On 9/4/2010 11:06 AM shanta sabnis said:
the article is good and informative,also the photographs are beautiful.only one suggestion that the garbage including plastic bags at present is being disposed openly on the hillside downwards,the developement plan shd include proper garbage management to protect the beautiful jungle and its flora and fauna and to maintain the sanctity of Mahurgad
On 9/4/2010 10:44 AM santosh vaidya said:
very good photo. jai renuka mata
On 9/4/2010 9:58 AM Madhubala_A said:
खरच अपर्तिं आहे....श्री रेणुकामाता कि जी ..!!
On 9/4/2010 9:44 AM sharadchandra said:
!!!!!अवर्णनीय!!!!!!!!!!
On 9/4/2010 8:38 AM Dr. Dilip B. Boralkar said:
Congrats. Approach roads, water and power supply along with accommodation facilities for pilgrims are required urgently to meet growing demand. I trust Development Plan is implemented well in time.
On 9/4/2010 7:40 AM sanjeevan said:
कर लागला तरी चालेल पण योजना लवकर पूर्ण करा श्री रेणुकामाता कि जी
On 9/4/2010 7:39 AM Sanjay Godbole said:
Best Photo of Mahur
On 9/4/2010 5:07 AM Gareeb Manus said:
Nicely illustrated and informative -- nice job! Who has written this article? Just have one suggestion: Can you please include a map of the route?
On 9/4/2010 4:50 AM Saurabh Sawant said:
माहूर हे एक ऑलराऊंडर पर्यटनस्थळ आहे. :P इथे जंगल आहे, इथे ट्रेकिंग करता येते, हे धार्मिक ठिकाण आहे, इथे किल्ला आहे, इथे वस्तुसंग्रहालय आहे, लेण्या आहेत, सुंदर तलाव आहे. अजून काय हवंय ?
On 04-09-2010 04:44:56 Naresh said:
फार छान!!! माताचे दर्शन झाले. फार फार आभारी आहोत.
On 9/4/2010 3:31 AM avinash said:
रेणुका मातेच्या दर्शनाने माणूस धन्य होतो.
On 9/4/2010 2:48 AM Prasanna said:
Thank you for beautiful pictures and useful information!
On 9/4/2010 12:44 AM मस्तच said:
खूप सुंदर माहिती दिलीत तुम्ही माहूर ची.. धन्यवाद !!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: