Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पाच वर्षांच्या मुलीसह दोघे स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:38 AM (IST)
कोल्हापूर - एका पाच वर्षांच्या मुलीसह दोघे जण स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आज आढळून आले. या दोघांनाही छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज जिल्ह्यातील विविध केंद्रावर 493 जणांची तपासणी करण्यात आली. आज एका दूषित रुग्णाला बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सीपीआर रुग्णालयात 11 संशयित व 1 दूषित अशा एकूण 12 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आज 2 रुग्णांच्या घशाचा स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: