Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

शेअर बाजारात अल्प घसरण
यूएनआय
Saturday, September 04, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - बड्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्याने आज शेअर बाजारात अल्प घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कालच्या तुलनेत 16.88 अंशांनी घसरून 18,221.43 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 6.75 अंशांच्या किरकोळ घसरणीसह 5479.40 अंशांवर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, टाटा मोटर्स, टाटा पॉवर व मारुती यांच्या शेअरला विक्रीचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे त्यांच्या भावात घसरण नोंदली गेली. मात्र, ओएनजीसी, भारती, इन्फोसिस, स्टेट बॅंक, हिरो होंडा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, सिप्ला यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांना खरेदीचा पाठिंबा मिळाला, असे शेअर दलालांनी सांगितले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: