Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आणखी काही प्रकरणांवर प्रकाश पडणार
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 12:30 AM (IST)
कराची - क्रिकेट विश्‍वात खळबळ उडवून देणाऱ्या "स्पॉट फिक्‍सिंग'च्या प्रकरणातील संशयित सलमान बट्ट, महंमद आसिफ आणि महंमद आमीर या तिघांना शनिवारी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी कुठलाही आरोप न ठेवताच सोडून दिले. मात्र, यानंतरही या पाकिस्तानी खेळाडूंवरील संकट संपत नाही. येत्या काही दिवसांत त्यांना आणखी काही प्रकरणांवर खुलासा करावा लागेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि बुकी महंमद माजीद यांच्या कथित संबंधाचा पर्दाफाश करणाऱ्या "दी न्यूज ऑफ दी वर्ल्ड' दैनिकाकडे असेही अजून काही पुरावे आहेत की, ज्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि मंडळाला लाजेने मान खाली घालायला लावेल, अशी माहिती एका सूत्राने दिली. 

या दैनिकाने आता पोलिसांकडे पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि माजीद यांच्यातील प्रदीर्घ संभाषणाची "ऑडियो' टेप सादर केली असून, यात दोघांमध्ये विश्‍वकरंडक ट्‌वेंटी-20 आणि श्रीलंकेतील झालेल्या आशिया करंडक स्पर्धेदरम्यान झालेल्या संभाषणाचा समावेश आहे. यात एक पाकिस्तानी खेळाडू आशिया करंडक स्पर्धेत लवकर बाद होण्याविषयी चर्चा करत असल्याचे ऐकू येते. त्याचबरोबर काही "एसएमएस'बाबतही या तिघा खेळाडूंनी पुन्हा चौकशी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या दैनिकानेच "आयसीसी'कडे सादर केलेल्या पुराव्यानंतर या खेळाडूंविरुद्ध कारवाई करण्याचे पाऊल आयसीसीला उचलावे लागले. त्यामुळे आता आयसीसीच्या प्रश्‍नांना त्यांना सामोरे जावे लागेल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: