Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

'भगव्याखाली मराठी माणसाने एकत्र यावे'
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 02:51 PM (IST)

मुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्यासाठी आज (रविवार) मुकमोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मराठी माणसाच्या विकासासाठी भगव्या झेंडाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र चळवळतर्फे आज सकाळी शिवाजी पार्कपासून या मुकमोर्चाला सुरवात झाली. चळवळीचे प्रमुख सतीश वळंजू यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सुरवातीला मोर्चा राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' याठिकाणी गेला. राज ठाकरे बाहेर गेले असल्याने त्यांची राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर मोर्चा 'मातोश्री'कडे रवाना झाला. तिथे त्यांची भेट उद्धव ठाकरे यांच्याशी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मोर्चा काढून प्रयत्न वाया घालविता मराठी माणसाच्या कल्याणासाठी भगव्याखाली एकत्र येण्याचे सांगितले. तसेच त्यांनी शिवसेनेला कोणाची गरज नसल्याचे सांगितले.
प्रतिक्रिया
On 05/01/2012 08:51 PM vishwasrao said:
मराठी माणसे आपसात भांडून दुसराचा फायदा होईल असेच वागतात हा इतिहास होता १९६६ साली यात श्री बाळासाहेब ठाकरे यांनी बदल घडवून समस्त मराठी जणांना एकत्र घेवून शिवसेना स्थापन केली तेव्हापासून मराठी माणसाने सांस्कुतिक, आर्थिक, व्यावसायिक,यश संपादन केले . त्याच बरोबर मराठी अस्मिता जागवली . जे शिवसेना सोडून गेले ते सर्व स्वताच्या स्वार्था साठी गेले त्यांना मराठी कार्ड वेगळ्या कारणासाठी हवे आहे . उदा: छगन भूजवळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे इत्यादी .
On 19-11-2011 07:45 PM swapnil said:
उद्धव साहेब म्हणतात कि भगव्या खाली एकत्र यावे. पण मराठी माणसाच्या हित साठी तुम्ही राज सोबत एकत्र का नाही होत? दुसर्यांना उपदेश करण्या पेक्षा जरा मराठी माणसाच्या हित साठी एकत्र या.
On 24/08/2011 05:19 PM sudhir sandhanshi said:
काँग्रेस व इतर पक्षातल्या मराठींनी काय करावे?
On 24/08/2011 04:07 PM नितीन शिंदे said:
मराठी माणसाने एकत्र यावे हीच इच्छा ,पण त्यासाठी पक्षाचे महत्व वाढवू नये. शिवसेना असो वा मनसे, कोणाही एका पक्षाखाली एकत्र व्हावे हि इच्छा कारण मराठी माणूस पाय खेचण्यात जग प्रसिद्ध आहे... हीच आपली प्रतिमा बदलायची वेळ आली आहे.राज किवा उद्धव यांनी आपले पक्ष वाचवण्याच्या प्रयत्नांत मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे अस्तित्व हरवू नये हीच कळकळीची विनंती....
On 04/11/2010 11:26 PM satyajit said:
पियुष मी १०० % agree आहे तुझ्या मताशी
On 05/09/2010 23:34 vijay said:
मराठी माणसाने या दोघांच्या विरुद्ध एकत्र यावे ,आणि आधुनिक विचारसरणी अंगीकृत करून आपला विकास करावा
On 9/5/2010 11:31 PM milind said:
ते आता कधीच शक्य नाही.उद्धव यांनी जरा नमते धोरण घेतले पाहिजे नाहीतर शिवसेनाच अस्तित्व खरच खूप कठीण आहे.काय एकेकाळी शिवसेनेची ताकद होती...आणि आता .....उद्धव यांनी कितीही नाकारले तरी राज ठाकरे हेच भविष्याचे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे.
On 05-09-2010 23:16:46 kiran said:
अरे यांचावर टीका करणार्यांनो ज्यांनी गेली ४५ वर्ष सतत सत्ता उपभोगली केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांना विचारा जाऊन .त्यांनी काय केले ते
On 05/09/2010 9:40 PM umesh said:
स्वताच्या फायद्यासाठी मराठी माणसाचा उपयोग बंद कर ! मराठी माणूस व्यवसाय कर आणि पैसा कमव , ते महत्वाचे आहे !
On 9/5/2010 9:27 PM RS said:
कॉंग्रेस दिवसेंदिवस परप्रांतीयांना महाराष्ट्रात थारा देवून आपली खुर्ची मजबूत करत आहे. आणि इथे मराठी मते दुभंगली आहेत आणि ह्या पुढे हि तसेच होणार आहे. इथिहासाचे बोध ह्यांनी कधीच घेतले नाही आणि घेणार नाहीत. कॉंग्रेसने मराठी ह्या नावाचे तीन तुकडे केले आहेत. एक तुकडा शिवसेना, दुसरा मनसे आणि तिसरा स्वाभिमान संघटना. पण फरक पडणार तो मराठी माणसाला. नुकसान मराठीचेच होत आहे आणि होणार आहे.
On 9/5/2010 9:24 PM JIT said:
एकाचा संयमी कारभार तर दुसऱ्याचा बेधडक. एका गाडीला संथ आणि वेगवान चाक लावले तर काय होईल. गाडी गोल गोल फिरेल. मराठी माणूस गोल गोल फिरला नाही पाहिजे. एकच उद्दिष्ट असेल तर दोघे आपोआप एकत्र येतील. मात्र त्यासाठी शिवसेनेला हिंदुत्व आणि भाजप यांना दुय्यम स्थान द्यावे लागेल. ते जमेपर्यंत सर्व अनिश्च्छित राहील. बघूया काय होते.
On 9/5/2010 7:33 PM Aniruddha Marathe said:
प्रथमच मी शिवरामपंतांशी सहमत आहे.
On 9/5/2010 7:14 PM thanthanpal said:
मराठी माणसा आता तरी जागा हो! या दोघांना हि मराठीचे जे प्रेम आहे ते पुतना मावशीचे प्रेम आहे. मराठीच्या राजकारणावर या दोघांना स्वत:ची राजकारणाची दुकानदारी चालवायची आहे. एकदा महानगर पालिकेची निवडणूक येवू द्या मग पहा हे दोन बोके कसे एकत्र येतात ते? आणि नाही आले तरी निवडणुका झाल्यावर जागा कमी पडू लागल्यावर हेच दोघे बोके सत्तेचे लोणी खाण्या साठी कोणाच्या हि मध्यस्थी शिवाय एकत्र येतील. आणि मराठी, मुंबईकरांच्या भल्या साठी आम्ही यापुढे एकत्र सत्ता(वाटून खावू) राबवूत,अशी मानभावी घोषणा करतील मूर्ख बनव
On 9/5/2010 7:02 PM vinit said:
उद्धव साहेब बरोबर बोलले भगवा हा मराठी मनाचे ,अस्मितेचे प्रतिक आहे . राज व उद्धव यांनी सर्व मतभेद विसरून मराठी माणसासाठी भगव्याखाली एकत्र यावे , तो दिवस लवकर यावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना . जय शिवसेना .जय महाराष्ट्र .जय हिंद .
On 9/5/2010 6:59 PM SHIVRAM VAIDYA said:
मुंबईत मराठी माणसाचाच नव्हे तर भारतावर प्रेम करत असलेल्या नागरिकांचे हित जपायचे असेल तर हिंदू-मुस्लीम आणि इतर धर्मियांनी सुद्धा या भगव्याखाली एकत्र येणे गरजेचे झाले आहे. देशभक्त मुस्लीम सुद्धा हिंदू धर्मियांइतकेच या देशाचे सन्मान्य नागरिक आहेत हे शिवसेनेने आणि मनसेने लक्षात घेतले पाहिजे.त्यासाठीच उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. मात्र त्यासाठी उद्देश साफ हवा. जनतेलाच साफ करायचा उद्देश असता कामा नये.
On 05-09-2010 18:17:20 beedkar said:
शिवसेना संपणार, मनसे च राज येणार
On 05/09/2010 18:01 Kiran said:
Doghani ekatra ale tar marathi manasache bhavish sudharel
On 9/5/2010 5:59 PM yogesh said:
हीच वेळ आहे एकत्र येण्याची आता जर एकत्र झाले नाही तर ....राज आणि उद्धव यांनी मराठी माणसाकडे मते मागू नये....राज साहेब जरा आवरा स्वतःला शिवसेना हि सोन्याची कोंबडी आहे आणि मराठी माणूस म्हणजे अंड आहे, अंड च खा कोंबडी कापु नका ..राज साहेब तुम्ही तुमचा तर घात करालच पण त्याबरोबर मराठी माणसांचा पण घात कराल .......राज साहेब आपणास कडून खूप अपेक्ष आहेत .........आणखी एक कळकळीची विनंती आहे . ह्या वयात आमच्या परमेश्वराला (बालासाहेब) दुख देवे नका .काही चुकीचे बोललो असल्यास माफ करा . जय महाराट्र.
On 9/5/2010 4:41 PM kulkarni said:
काही गरज नाहीये दोघांनी एकत्र यायची, कारण तशीही शिवसेना संपलीच आहे फारतर हि पुढची शेवटची निवडणूक असेल त्यांच्यासाठी आणि मग मनसे च राज्य करेल महाराष्ट्रावर...
On 9/5/2010 4:10 PM हेमंत आठल्ये said:
नक्कीच दोघांनीही एकत्र यावे. सर्वांच्याच तशा इच्छा आहेत
On 9/5/2010 3:25 PM satish-nagpur(9822369198) said:
बरोबर आहे! मराठी माणसाने भगव्याखाली एकत्र यावे! मनोमिलन करायचे असेल तर फक्त राज यांना मानवाव लागले. कारण तेच शिवसेना सोडून गेले होते. ते परत आले कि झाल मनोमिलन! राज ठाकरे घरी नव्हते कि घरी असूनसुद्धा ते भेटले नाही?
On 2010/09/05 15:21 piyush said:
गरिबी,महागाई,भ्रष्टाचार,बेरोझ्गारी काढून टाकणारे सरकार हवे आहे , मग ते हिटलरचे सरकार पण चालेल. .
On 9/5/2010 3:12 PM punekar said:
निदान पुढाकार नाही पण विचार तरी करा. नाही तर आम्हालाच विचार करावा लागेल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: