ठाण्यात जखमी गोविंदाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 11:37 AM (IST)
ठाणे - गुरुवारी झालेल्या दहिहंडीमध्ये चौथ्या थरावरून पडलेल्या किशोर कांबळे या जखमी गोविंदाचा आज (रविवार) उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
ठाणे येथे दरवर्षी दहिहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि सर्वाधिक उंचीवर दहिहंडी बांधून लाखोंची बक्षिसे लावण्यात येतात. या दहिहंड्या फोडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सराव करीत असतात. दहिहंडी फोडण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील ओम साई मित्र मंडळाचा कार्यकर्ता असलेला किशोर कांबळे हा चौथ्या थरावरुन पडून जखमी झाला होता. याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.